लॉकडाऊन दिवस-18
लॉकडाऊन दिवस-18


बघता बघता लॉक डाऊन चे दोन आठवडे, त्यांच्यापेक्षा जास्त कालावधी होऊन गेला होता. तसं बघायचं झालं तर, आज तो अठरावा दिवस होता. आणि सध्याची परिस्थिती बघायची झाली तर रुग्णांची संख्या झपाट्याने एका बाजूने वाढत होती . पण दुसऱ्या बाजूने दिलासा देणारी गोष्ट म्हणजे, तेवढेच रुग्ण बरे सुद्धा होते. हे सर्व घडत असताना काही लोक आपल्या स्वार्थापायी, समाजामध्ये नको ते अफवा पसरवत होते. पण त्यांना ही गोष्ट समजत नव्हती ही वेळ राजकारण करायची नसून, समाजाला माणुसकी दाखवण्याची आणि आपल्या मध्ये त्या गोष्टीची जाणीव निर्माण करण्याची होती.
त्या परीने अशा गोष्टींवर मात करण्यासाठी आम्ही, काही टीम सह प्रशासनाच्या मदतीने, गावागावांमध्ये जे काही त्या विषाणू बद्दल गैरसमज आहेत .ते दूर करण्यासाठी सर्व परीने प्रयत्न करत होतो आणि आम्हाला त्याचा आनंद देखील होता . तेवढ्याच पद्धतीने लोकांचा त्याला प्रोत्साहन देखील भेटत होता.
तसं बघायचं झालं तर परिस्थिती फार बिकट होती. पण त्या परिस्थितीवर आपल्याला मदत करायची होती. त्यासाठी प्रत्येकाने संयमाने आपल्या घरामध्ये बसणे, राहणे, अतिशय योग्य होते . कारण त्या भयानक आशा आजारावर अजून तरी कोणते औषध भेटले नव्हते. यासाठीचा मी खेड्यापाड्यांमध्ये जनजागृती करणे हे मुख्य उद्दिष्ट होते......