लॉकडाऊन दिवस - १५
लॉकडाऊन दिवस - १५


काल रात्री झोपच नीट लागत नव्हती, लागेल तरी कशी झोप नीट. कारण कालच्या दिवसाची परिस्थिती बघायची झाली फार गंभीर अशी स्थिती झाली होती. विशेषता आता मुंबईमध्ये त्या विषाणूने आपले जग जणू स्थापन केले होते. रुग्णांचा आकडा आता हजारच्या पुढे गेला होता . यावरून तुमच्या लक्षात येईल परिस्थिती कोणत्या स्थितीत आली होती.
याचं गांभीर्य लक्षात घेऊन, मी आणि माझ्या काही सहकारी आणि पोलीस यांच्या मदतीने आता गावा गावामध्ये जाऊन त्या विषाणू बद्दल जनजागृती करण्यास सुरुवात केली. या कार्यामध्ये आम्हाला सरकारी कर्मचारी तसेच आरोग्य कर्मचारी ,यांनी यांनी खूप मोलाच सहकार्य केलं. आपण कोणत्या काळजी घेतल्या पाहिजेत, आपण काय केलं पाहिजे. त्या विषयांवर आपण काय केल्यामुळे रोखू शकतो. असे सर्व पद्धतीची माहिती प्रत्येक गाव, प्रत्येक घराघरांमध्ये जाऊन सोशल डिस्टन्स पाळून देण्यासाठी सुरुवात केली.
बघायचं झालं तर ते काही एवढ मोठं कार्य आम्ही समाजासाठी करत नव्हतो. तर एक समाजाचं देन आणि आपले समाजाबद्दल कर्तव्य ही प्रत्येक नागरिकाची असतात त्या भानातुन करत होतो...