लोकडाऊन दिवस-१६
लोकडाऊन दिवस-१६
आजच्या दिवशी पुन्हा तेच कार्य हातामध्ये घेऊन सकाळी आम्ही सर्वजण पुन्हा एकदा जोमाने सुरुवात केली. खरंच खूप आनंद वाटला काल, आम्ही ज्याच्या लोकांपर्यंत माहिती पोहोचवली अशिक्षित असून सुद्धा ते आता शिक्षित आहेत जणू असच वाटत होते. पण मला एक गोष्ट मात्र समजत नव्हती, शहरांमध्ये लोक सुशिक्षित असून सुद्धा एकाच जागी गर्दी का करतात . आत्ता या सर्वांमध्ये खऱ्या अर्थाने बघायचं झालं तर शिक्षित आणि अशिक्षित पण तुम्हाला समजलं असेल. एकेकाळी हेच लोक त्या गावाकडच्या लोकांना अशिक्षित म्हणत असायचे हीच लोक आज खऱ्या अर्थाने शिक्षित आहेत हे दाखवून देत होते.
सुरुवातीला शासनाच्या सहकार्यातून, ज्या काही गोष्टी आवश्यक आहेत. आपल
्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी उदाहरणार्थ मास्क, सेनिटाइजर ह्या गोष्टींचे आम्ही टप्प्याटप्प्याने गरजू लोकांपर्यंत गावागावांमध्ये सुरुवात केली. हे सर्व करत असताना या गोष्टींचा तुटवडा आता, जाणवण्यास सुरुवात झाली. याची खबरदारी म्हणून आम्ही आमच्या पातळीवर कपड्याचा उपयोग करून बचत गटाच्या लघुउद्योगांच्या माध्यमातून, शिवणकाम करून हे मास्क तयार करण्यास सुरुवात केली. जेणेकरून त्या गोष्टींची कमतरता भासू नये. त्या मागचं उद्दिष्ट एकच होतं या विषाणूचा प्रसार गावांमध्ये होऊ नये कारण आपली गावातली वर असणारी आरोग्यसेवा , या पद्धतीने योग्य नाही त्या विषानू चा सामनासाठी त्यासाठी लागणारे वेनतीलेटर्स आपल्याकडे नाहीयेत.......