लॉकडाऊन दिवस-२०
लॉकडाऊन दिवस-२०
रात्री मला नीट झोपच लागत नव्हती. बघायचे झाले तर, लॉक डाऊनलोड आजचा दिवस झाल्यावर एक दिवस शिल्लक राहणार होता. पुढे काय होईल याचा विचार सतत मनामध्ये येत होता . तशी परिस्थिती बघायची झाली, तर एक प्रकारे आपण काही प्रमाणात त्या विषाणूला थोपविण्यासाठी यशस्वी झालो होतो. पण युद्ध अजून संपलेलं नव्हतं.
झोप नीट लागत नसल्यामुळे , थोडा डोळा लागला आणि सकाळी लवकरच जाग आली. आम्हीसुद्धा गावपातळीवर रोज वेगवेगळे उपक्रम covid-19 , या आजारावर राबवत होतो. सकाळी लवकर झोपल्यावर मी आणि माझ्या काही मित्रांनी सगळीकडून मिळतील तेवढे पेपर, कार्डबोर्ड, स्केच पेन , गोळा करण्यास सुरुवात केली आणि सर्वांनी कामास प्रारंभ केला.
त्या covid-19 ची लक्षणे काय असतात. आपण काय
केले पाहिजे. कोणती काळजी घेतली पाहिजे. कशाप्रकारे शासनाचे नियमांचे पालन केले पाहिजे. विविध गोष्टी त्या पेपरवर लिहून, पूर्ण करून गावागावांमध्ये जाऊन विविध ठिकाणी लावल्या आणि लोकांना त्याबद्दल माहिती देण्यास सुरुवात केली. खरं बघायचे झाले तर, ग्रामीण भागामध्ये अत्याधुनिक सुविधा एवढ्या चांगल्या नव्हत्या . त्यामुळे आपल्याला विशेष खबरदारी घ्यायलाच पाहिजे. जर हा विषाणू गावामध्ये आला, तर फार थैमान घालेल याची कल्पना मला आणि माझ्या सहकाऱ्यांना होतीच. त्यामुळे आम्हाला जेवढे शक्य होईल, त्या पद्धतीने आम्ही सर्व गोष्टी अतिशय संयमाने ,जिद्दीने, चिकाटीने आणि शासनाचे नियमांचे पालन करून जेवढे करता, येईल तेवढे योगदान आपल्या गावासाठी आपल्या देशासाठी देत होतो.....