लॉकडाऊन दिवस-19
लॉकडाऊन दिवस-19
लोकडाऊन जाहीर होऊन सुमारे 18 दिवस झाले होते. बघायचे झाले तर 18 दिवस, हा फार मोठा कालावधी होता. या काळावर तिचा फायदा त्या विषाणूला थोपवण्यासाठी फारच ,मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला झाला होता. पण ती लढाई आपल्यासाठी संपलेली नव्हती, कारण आता सुरुवातीला सुरुवात करून आपण त्याविरुद्ध एक प्रकारे युद्ध पुकारलं होतं. हे सर्व करत असताना, आपण वारंवार जिद्द, संयम आणि चिकाटी आपल्यामध्ये आत्मसात करणे फार महत्त्वाचे होते . कारण हे तीनच शस्त्र होते ज्याने आपण त्या विषाणूला रोखू शकत होतो.
मुख्यमंत्री ,तसेच विविध त्यांचे सहकारी अनेक सामा
जिक संस्था आणि खुप सारे लोक अतिशय मेहनत घेत होते .आणि खरच त्यांचे प्रयत्न पाहिले , आपले सुद्धा या देशासाठी काहीतरी कर्तव्य आहे. याची जाणीव प्रत्येक नागरिकाच्या मना मनामध्ये निर्माण होत असेल. यासाठी आम्ही सुद्धा एक एक उपक्रम राबवला . गावपातळीपर्यंत तोंडाला लावण्यासाठी मास फार कमी प्रमाणात उपलब्ध होते . आम्ही यावर उपाय म्हणून आता टाकाऊ पासून टिकाऊ म्हणजेच कपड्यापासून मास निर्मिती करण्यासाठी सुरू केले. खूप साऱ्या आशा बचत गटाच्या महिला यासाठी पुढे आल्या सर्वजण अतिशय अशा योग्य प्रमाणे त्याच्याशी लढत होते असंच वाटत होतं.........