Swarup Sawant

Romance Tragedy

2  

Swarup Sawant

Romance Tragedy

पहिले प्रेम

पहिले प्रेम

4 mins
5.2K


प्रेमाची व्याख्या अगाध आहे हृदयापासून केलेले समर्पण म्हणजेच प्रेम मग ते आईचे, बहिणीचे, पित्याचे, एखाद्या अगाध नात्यांचे, निस्वार्थ बुद्धीने केलेले प्रेयसीचे. प्रेम हाे मुक्या भावनांचे भुकेले असते. ज्याचे वर्णन शब्दात केले जात नाही. ती एक अबोल भावना आहे. अशी अबोल प्रेमज्योत घेऊन येत आहे पहिलं प्रेम...

राधा आयटी इंजिनिअर झाली घरातील सर्व सुसंस्कृत सुशिक्षित असल्यामुळे प्रेमात फसणे वगैरे कुणाच्या कल्पनेतही नव्हते शिक्षणाचे ध्येय सर्वात मोठे कर्तृत्व व विचारही तर्कसंगत हृदयापेक्षा मेंदूला मान. तिचे वडील तिला नेहमी सांगत, "हृदयाची हाक ही भावनेने ओथंबलेली असते त्यामुळे काही निर्णय चुकूही शकतात. भावनेच्या आहारी गेलेली व्यक्ती ही नुकसान किंवा फायदा याचा विचार करीत नाही त्यात माया ओथंबून वाहात असते. तर डोक्याने विचार करणारी व्यक्तीच उत्कर्ष साधू शकतेअतुच्य शिखर गाठते".

अगदी लहानपणापासून या गोष्टी राधाचा तना-मनावर बिंबवल्याने तिच्या व्यक्तिमत्त्वाची जडणघडणही तशीच झाली होती. ती एकुलती एक असली तरी अवास्तव लाड तिचे झाले नाही आई बाबांच्या बोलण्यातही फक्त नि फक्त बौद्धिक छटा दिसत होती. टिपिकल पांढरपेशी आयुष्य ती जगत होती.

असो. ती मेरिटमध्ये पास झाल्याने नोकरीसाठी धावण्यापेक्षा ,मोठमोठ्या कंपन्यांच्या गलेलठ्ठ पगाराच्या नोकऱ्या तिच्यापुढे हात जोडून उभ्या होत्या .निवड तिला करायची होती .याचा सार्थ अभिमान तिच्या आई वडिलांना वाटत होता .लाइफ एन्जॉय करणे ही संकल्पनाच नसल्याने उत्तमातल्या उत्तम नोकरीची निवड होऊन तिच्या तोडीच्या जीवनसाथीची शोध मोहीम सुरू झाली .

राधा एका नामांकित कंपनीत मोठ्या अधिकाराच्या जागेवर नियुक्त झाली .न्यायला आणायला तिच्या दिमतीला अगदी लहानपणापासून स्वतंत्र कार होतीच त्यामुळे जाण्या येण्याचा त्रास दिला नव्हता

कॉलेजमध्ये मिळणारे ज्ञान व प्रत्यक्ष नोकरीतील कार्यवाही यात फरक असल्याने ती थोडीशी भांबावून गेली होती .परिणामी एकदा तर तिच्या हातून खूप मोठी चूक झाली .ती लगेच सुधारली गेली नाही तर कंपनीला कोटी रुपयांचा फटका बसला असता व तिची नोकरीही गेली असती .ती घाबरली गोंधळल्यामुळे तिला काही सुचेना.ती अगदी रडकुंडीला आली .आपल्यामुळे कंपनीला होणारा तोटा तिला सहन होणारा नव्हता थरथरणाऱया हाताने तिने स्ट्राँग कॉफी मागवली. कॉफी घेऊन आलेल्या मुलाच्या लक्षात आले की काही तरी गोंधळ आहे .त्याने लगेच जाऊन तेथील कारकून किशनच्या कानी ही गोष्ट घातली .

किशन हा हरहुन्नरी दिसायला एकदम स्मार्ट व इतरांना सतत मदत करणारा एक हुशार मुलगा होता .घरची परिस्थिती गरीब असल्याने तो उच्च शिक्षण घेऊ शकला नाही, परंतु तो ज्ञानपिपासू असल्याने त्याला खूप चांगले ज्ञान होते .तो दबकत दबकत तिच्या केबिनमध्ये गेला कारण समोरासमोर दोघांचे बोलणे कधीच झाले नव्हते.तो साधा कारकून राधाचे बोलणे तिचा असिस्टंटशीच व्हायचे. ती इतरांना मॅनेज करतअसे.त्या दिवशी ती रजेवर होती .

किशन केबिनमध्ये गेला. प्रथम त्यांनी तिची माफी मागितली व "आपण काही मदत करू शकतो का" अशी विचारणा केली .

ती त्यांच्यावर खूप चिडली तिने त्याचा अपमान केला व केबिन बाहेर घालवले .मग तिनं शांतपणे विचार केला ति कोणाशीच तर लगेच बोलू शकत नव्हती .तिने स्वतःहून किसनला परत बोलावणे पाठवले .आपण अधिकारी असून कारकुनाची मदत घेत आहोत याचा न्युनगंड होता पण परिस्थिती इतकी बिकट होती की मार्ग काढायचा असेल तर प्राप्त परिस्थिती स्वीकारणेच ठीक होईल म्हणून त्याला परत बोलावणे पाठवले .

किशनला आश्चर्य वाटले. परिस्थिती पाहता त्याने त्याकडे दुर्लक्ष केले।काही वेळा शिक्षणापेक्षा अनुभव श्रेष्ठ ठरतो तिने सर्व हकिकत सांगितली .

त्यांनी विनयशीलतेने तिच्याकडून लॅपटॉप मागून घेतला .जवळजवळ दोन तीन तास तो झुंजत होता अखेर त्याला यश मिळाले. अनुभवाच्या जोरावर त्यांनी जिंकले।तिला संकटातून पूर्णपणे बाहेर काढले.ही गोष्ट कुणालाही कळणार नाही याचे वचन देताच आतापर्यंत राखून ठेवलेला बांध फुटला

त्याच्याही नकळत ती त्याच्या मिठीत जाऊन सुखावली .त्यालाही काहीच कळेना .काही काळ मी शांतचित्ताने गेला .तिची चूक कळताच ती पटकन मिठीतून बाजूला झाली. पण पहिल्या प्रेमाचे बिज तेथेच रुजले हे दोघांनाही उमजले नाही .

दोघे रोज ऑफिसमध्येच भेटत. जरुरीपुरते बोलत पण एकमेकांशी बोलल्याशिवाय त्यांना चैन पडत नसे .हेच ते निस्सीम प्रेम आहे ते दोघांनाही समजत नव्हते .

राधाला इथे चांगली चांगली स्थळे येऊ लागली .पण एक स्थळ तिला पसंत पडेना. आई वडिलांनाही याचे आश्चर्य वाटू लागले।राधाला स्वतःच्या वागणुकीचा अर्थ उमजेना.परंतु आई वडिलांच्या हट्टापुढे तिला एका स्थळाला होकार द्यावा लागला.जसजशी साखरपुड्याची तारीख जवळ येऊ लागली तसतशी तिची बेचैनी वाढू लागली .तिने ही गोष्ट किशनला बोलून दाखवली .त्यानेही त्याच्या मनातील हुरहुर तिला सांगितली. दोघांनी मनसोक्त गप्पा मारल्या.तेव्हा त्यांना कळले की दोघेही एकमेकांच्या प्रेमात पडले होते ते निस्सीम निस्वार्थ प्रेम होते .दोघांच्याही कौटुंबिक परिस्थितीत जमीन- अस्मानाचा फरक होता .

किशन आधीपासूनच समजदार होता. ह्रदयाची हाक ऐकणारा .आपल्या सारख्या मध्यमवर्गीय घरात राधाची कुचंबणा होईल तिला त्रास होईल .तिचे आई वडील कदाचित तिच्याशी संबंध तोडतील .आपल्यामुळे तिला आई वडिलांचा वियोग सहन करावा लागेल .हे त्याला नको होते.

त्याने तिच्याकडे पाहिले .शेवटचे प्रेमाने जवळ घेतले .असेही राधाकृष्ण कधीच एक झाले नाहीत. त्यांचे निस्सीम प्रेम आजही अजरामर आहे तसेच आपले आहे .आपण तसेच एकमेकांवर निस्सिम निस्वार्थ प्रेम करू पण आपल्या वाटा वेगळ्या असतील.

राधाला ते ऐकून खूप वाईट वाटले. निस्तब्ध पूर्णदिवस ते एकमेकांच्या हातात हात घेऊन बसले होते. सांजवेळी अतिशय कष्टाने हात सोडवत पण पहिल्या प्रेमाची पहिली ज्योत मनात तेवून आपापल्या मार्गाने दोघे निघून गेले. ती ज्योत सतत तेवत ठेवण्याची शपथ घेऊन. राधा कृष्णा सारख्या अमर प्रेमाची साक्ष ठेवून जड अंतःकरणाने दोघे दोन दिशांना निघून गेले.


Rate this content
Log in

Similar marathi story from Romance