फेसबुकवर मैत्री...
फेसबुकवर मैत्री...
साशंकच होतो सुरुवातीला मैत्री तुमच्याशी( फेसबुकवर) करतांना
प्रश्न मात्र गंभीर होता. उत्तर मात्र सापडत नव्हतं...
खरं कोणत, खोटं कोणतं? अकाउंट कसं ओळखू ?
नंतर मात्र रुळत गेलो .. खऱ्या खोट्याची समज आली
अधाशासारख वागत गेलो ... मित्र सारे जोडत गेलो
चांगले वाईट अनुभव आले , त्यांनीच शहाणपण दिल...
आता पाच हजार झालेत तरी ... अजूनही आसवेच वाटते
प्रत्यक्ष , अप्रत्यक्षरीत्या गुरु ,मार्गदर्शकही तेच होते
कित्येक जण आले - गेले ,फालतू हिशोब कोणी ठेवले
जत्रेला येतात तसे हौशे, नवशे, गवशे भेटले ...
कुणी म्हणाले माझीच लाल, अन मीच आहे ग्रेट
मिश्कीलपणे हसून म्हणालो बाराच्या नंतर स्वप्नात भेट
वास्तव जगापेक्षा आभा
सी जग जरा बरं वाटलं कारण ...
पटलं तर बरं नसता लगेच करता येत अनफ्रेंड ...
वास्तवात तसं ऑप्शनच नसत, माणूसघाणे भोवताली
हवी - हवीशी माणसं मात्र इच्छा नसताना दुरावतात
आपल कसं नगद सगद , उधार उसनवारीच गणित नसतं
सर्वकाही रोखठोक, कशाला हवं ओठात एक पोटात एक
मनस्वी स्वागतच करतो ज्यांचा इरादा नेक असतो ..
कुणी नडला,, नाहक भिडला त्याला मात्र नारळ देतो
मित्र ,मैत्रिणींनो , बंधू भागिनिनो , सान थोरानो
मनापासून सांगतो ... भाग्य माझं थोर तुम्ही मला भेटले
आभार नाही मानणार कारण ऋणात तुमच्या राहावेसे वाटते
काहीही झालं तरी शेवटी तुम्ही सारे आमचे दि .. दा... मा. गुरुवर्य ...