STORYMIRROR

saru pawar

Drama Inspirational

3  

saru pawar

Drama Inspirational

पहाडातले देव!!

पहाडातले देव!!

2 mins
204

  आज तो मुसळधार बरसत होता , असा पूर्वी कधिच बरसला नव्हता ,ढगच फुटले होते जणू . डोंगरावरून पाणी धो-धो वाहत येऊन रस्त्यावर कोसळत होत ,सोबत मातीचे लोट ,कुठे तर दरडी ह कोसळल्या .

  घाटात ब-याच गाड्या अडकल्या होत्या ,ऐवढ्या शक्तिशाली पाण्याच्या प्रवाहात गाड्या कश्या थांबतिल याच चिंतेत गाडयानं मधे बसलेले सगळेच !!

    किती तास हा मृत्युला समोर बघायचा खेळ चालु होता ,गाड्यां मधे असलेली तान्हीं दुधासाठी तर थोडी मोठी भुक आणि भितीन रडत होती.

   आभाळात दाटलेले ढग दिवस चढत होता तसे अजुनच गडद वाटत होते ,आता रात्रच व्हायला लागली होती खरोखरीच .खरतर गेल्या कित्त्येक तासां पासनं अंधार दाटला होता पण आत्ता तर रात्रीच्या काळोखानं जास्तच भिती लहान मोठ्या सगळ्यानांच वाटत होती .

       याच दाटलेल्या काळोखात वरून कुणितरी हातात कंदिल आणि काही तरी घेऊन खाली उतरतानां दिपाला दिसल .

    हळु हळु ति व्यक्ती जवळ येत येत गाडिच्या दारापाशी आली आणि काचेवर टक टक करू लागली,मंगेशने काच जराशी खाली करून विचारल, "काय ?"

ती व्यक्ती ,"ये दादा ,हि घे जराशी बिस्किट आणि दुध हाये बघ याच्यात ,लेकर उपाशी असतिल ,दे दे त्यायला ."

हातातली ऐक पिशवी मंगेशच्या हातात देत तो परत पुढे चालत गेला ,ऐक ऐक करत लाईनीतल्या ब-याच गाड्यां मधे त्यान खाण्याच काही तरी जिन्नस दिल आणि पुढे असलेल्या म्हसोबा मंदिरा जवळ जाऊन बसला ,धो धो पावसात जिथे माणुस सुरक्षीत ठिकाणाहून बाहेर पडायचा जराही प्रयत्न करणार नाही त्यात हा बाबा आपला सहज अवतरतो आणि येवढ्या कठीण वातावरणात देवा सारखा येऊन लेकरांची भुक भगवतो .

     दिपाच्या मांडीवर बसलेल्या चिऊनं विचारल ,"मम्मा हे कोण होते ग!"

दिपा ,"ह, ह, पहाडातला देव !!"


Rate this content
Log in

Similar marathi story from Drama