STORYMIRROR

Raj Mohite

Drama Tragedy

4  

Raj Mohite

Drama Tragedy

ऑनलाइन लव्ह

ऑनलाइन लव्ह

3 mins
263

(एक वर्षापूर्वी)

मस्त मुसळधार पाऊस होता. सन्डे असल्याने घरीच होतो. फेसबुकवर टाईमपास करताना एक प्रोफाईल आवडली स्टेटस सिंगल असल्याने मी फ्रेन्ड्स रिक्वेस्ट पाठविली. पंधरा दिवसाने मला तीने ऍड केले. मी थैंक्यू पाठविला आणि तिकडून वेलकम रिप्लाय आला.

तिचे नाव राधा पाटील रोजच्या चॅटिंग ने तिच्या बद्दल बरेच काही जाणू लागलो आणि तीही माझ्या बद्दल. अगदी छान मैत्री झाली होती. वारंवारं एकमेकांना मैसेज करायचो. एक दिवस मी तिच्या जवळ तिच्या फोटोचा हट्ट धरला. तिने सरळ नाही म्हणून सांगितले. एकमेकांच्या फोटो पेक्षा तिने भेटण्याची ईच्छा सांगितली. मीही होकार दिला. "निदान तुझा नंबर तरी???तिने परत नकार दिला. मी नाराज होऊन माझा नंबर सेन्ड केला आणि चॅटिंग बंद केली. दोन दिवस तीचा काहीही रिप्लाय नव्हता.तिसर्या दिवशी एक SMS आला हाय राधा पाटील हिअर. त्या संध्याकाळी मी तीला कॉल केला खूप काही बोललो. तिचा आवाज ऐकून कधी भेटतो असे झाले. खरेतर तिला पाहण्यासाठी ही तेवढाच आतुर होतो. ठरले ऊद्या संध्याकाळी सात वाजता कॉफी शॉप अंधेरी.

तिने तिच्या ऑफिसमधून निघताना फोनगी केला. पण मला काम जास्त असल्यामुळे निघता येत नव्हते. sorry next time yaar..... मेसेज पाठवला. रिप्लाय शून्य.

एक शनिवारी मग फोन केला आज भेटू या का??? वेळ ठरली संध्याकाळी चार वाजता त्याच ठिकाणी. सारे काही आवरून मी चार वाजता अंधेरीच्या कॉफी शॉप मध्ये पोहचलो. थोडी वाट पाहुन फोन केला. sorry yaar बस निघते आहे फक्त पंधरा मिनिटे बस.

पाच वाजले तरीही तिचा पत्ता नव्हता. मी परत फोन केला Not answering सहा पर्यंत वाट पाहीली.

परत फोन केला Currently Switch Off.

गप्प निघालो घरी गेलो. त्या नंतर ती कधी online दिसली नाही.आणि नंबर Switch Off.

नक्की फेक आयडी आणि कुणी तरी आपली गंमत केली ऐवढे खरे.

तरीही आधूनमधुन तीचा नंबर ट्राय करायचो. आचानक पंधरा दिवसांनी नंबर लागला."हैलो कौन??? तीकडुन आवाज आला "मी राज मोहिते. "कौण पाहिजे???

राधा पाटील....!" माफ करा राधा वारली मी तीची चुलती"

तिचा पंधरा दिवसा अगोदर अपघात झाला अंधेरीला एका कार ने तिच्या स्कूटी ला धडक दिली.

ज्या वेळी अपघात झाला त्या वेळी तीच्या जवळ एक पार्सल होते तूमच्या नावाचे त्या साठी फोन केलात का???

हो मला मिळेल का ते??


पत्ता लिहुन घ्या.

दुसऱ्या दिवशी मी त्या साठी कामाला न जाता तिथे पोहचलो. ज्या वेळी मी भिंतीवर फोटो पाहीला आभाळ कोसळले कारण तीच मुलगी होती राधा जीचा अंधेरीत कॉफी शॉप जवळ अपघात झाला होता.

मी दुर्लक्ष करून घरी निघालो होतो त्यात आली नाही म्हणुन आधीच मुड अॉफ होता काहीजण मदतीसाठी धावले पण मी नाही गेलो आज त्याचा पश्चाताप

तिच्या मावशीने विचारले तुमची कशी ओळख??

मी तिच्या जुन्या आॉफीसचा मित्र खोटे सांगुन पार्सल घेतले आणि निघालो

त्यात एक सूंदर मनगटी घड्याळ आणि एक चिठ्ठी

राज

तुला कॉफी शॉपमधे सांगायचे धाडस नाही म्हणुन हि चिठ्ठी

तु खूप श्रीमंत आहेस मला माहीत आहे

मी एक साधारण घरातील मुलगी आहे. माझे आई वडील मी लहान असतानाच वारले माझा संभाळ माझ्या चुलता चुलतीने केला. आणि ते आता माझ्या साठी स्थळ शोधता आहेत त्यांची ईच्छा आहे माझे लग्न एका चांगल्या घरात व्हावे आणि चांगला जोडिदार मिळावा. तेच माझे सर्वस्व आहेत.

आपण खुप चांगले मित्र आहोत. आणि हळुहळु का होईना मलाही तु आवडु लागला आहेस. जर तुलाही मी जोडिदारीण म्हणून पसंत असली तर माझ्या घरी लग्नाची बोलणी करायला तुझ्या फॅमिली सहित ये

पसंत नसली अन्यथा माझ्या बद्दल तसला विचार नसला तर प्लीज ही आपली शेवटची भेट.

पैशाने श्रीमंत म्हणून नाही मनाने श्रीमंत आहेस म्हणुन पसंत केले

तुझी मैत्रीण

राधा

नकळत अश्रू चिठ्ठीवर पडू लागले

तीने दिलेल्या घडयाळाने

वेळेचे महत्व पटवून दिले

ऑनलाइन जमाना असताना तिने लिहलेली ती चिठ्ठी मनाला भिडली ऐवढे सत्य


Rate this content
Log in

Similar marathi story from Drama