Best summer trip for children is with a good book! Click & use coupon code SUMM100 for Rs.100 off on StoryMirror children books.
Best summer trip for children is with a good book! Click & use coupon code SUMM100 for Rs.100 off on StoryMirror children books.

Priya Satpute

Comedy


4.9  

Priya Satpute

Comedy


Onion पोहे

Onion पोहे

3 mins 1.2K 3 mins 1.2K

पोहे म्हटलं कि कसं तोंडाला पाणी सुटत...गरम गरम पोहे आणि चहा....

अरेच्या कांदे पोहे, आधीच्या काळात रीतच होती, मुलगी पाहायला आले कि पाहुण्यांना कांदे पोहे दिलेच पाहिजेत. मग तो पोह्यांचा ट्रे, मुलगी घेऊन येईल...सगळ्यांना देईल, मुलाकडे देताना लाजून चूरर होईलं, आणि मधोमध बसून, मान खाली घालून सगळ्यांच्या प्रश्नांना सामोरी जाईल, गाणी गाऊन दाखवावी लागतील, चालून दाखवाव लागेल,....हे सार कशासाठी? मुलगी कशी गाते? आवाज कसा आहे? नीट चालते का? आणि बरंच काही तपासलं जायचं.


पण, आता कांद्याचे Onion पोहे झाले आहेत....ते कसं काय? विचारात पडलात?? 

अनघा, आताच्या काळातली स्वतःच्या पायावर उभी असलेली एक सामान्य युवती. इंजिनियर बनून, चांगल्या कंपनीत नोकरीला होती. लग्नाच्या उंबरठ्यावर उभ्या असलेल्या अनघाच्या घरातल्यांना तिच्या लग्नाचा घोर लागला होता...अनघा ऑफिस संपून बराच वेळ निघून गेला होता पण ती घरी जाण्याच्या मूड मध्ये दिसत नव्हती. आज तसं तिला तिच्या ग्रुपला भेटायला जायचं होत, सारखे फोन येत होते पण, ती उचलतच नव्हती, शेवटी वैतागून तिने उचलला, सगळ्यांचा ओरडा सुरु झाला होता तसं ती नाईलाजास्तव उठली....ग्रुप मध्ये तसं कोणाच लग्न नव्हत झाल...सारे बेचलरस...सगळ्यांच्या गप्पा रंगात आल्या होत्या...अचानक तिने गोप्यस्फोट केला कि ती प्रोजेक्टसाठी अमेरिकेला जातेय...सगळ्यांचा जोरात ओरडा सुरु झाला...सगळे एकदम धमाल मूड मध्ये होते.

अचानक, थोड्यावेळाने तिने ग्लास फोडला, आणि ती जोरजोरात रडू लागली....कोणालाच समजेना काय झाल अचानक?

डोळे पुसून अनघाने मोठ्ठा श्वास घेतला आणि ती बोलू लागली....

" मी अनघा, वय २५, एका मोठ्या कंपनीत काम करतेय, दिसायला सुंदर, रंग गोरा, उंची ५ फूट ६ इंच, कोणतच व्यसन नाही, ना काही अफेयरस, जेवण सुद्धा छान बनवते, पगार सुद्धा छान आहे, मोठ्यांचा आदर, लहानांना प्रेम करणं हेच मला लहानपनापासून शिकवलं आहे, आणि मी तशीच आहे, ना मी कोणाला कधी दुखावलं ना मारलं....माझी चूक आहे तरी काय?? कि मी एक मुलगी आहे? खेळण आहे का मी सगळ्यांच्या हातातलं...?? इतकी शिकून सावरून, माझ लग्न होत नाहीय? का? मी हुंडा देणार नाही म्हणाले म्हणून...माझ्या आईच मी पण एकुलत एक पाखरू आहे, मला पण भावना आहेत, मला नाही घ्यायचा विकत नवरा. तिला बरचं काही बोलायचं होत पण, ती अचानक गप्प झाली."


अशा अनेक अनघा आपल्या आजूबाजूला आहेत. काही, सहन करत आहेत तर काही....


अनघा नंतर भेटूया मोनिकाला, आधुनिक विचारांची तरुणी, आई वडील सुद्धा तितकेच आधुनिक आहेत, इंटरनेट या नव्या मार्गाने त्याचं वर संशोधन सुरु आहे. प्रत्येक पोर्टलवर तिचा प्रोफाईल अपलोड आहे. अधून मधून तिच डेटिंग पण चालूच असत...आणि त्यात काही गैर आहे असं मला तरी वाटत नाही. पण, रोज नवीन मुलांसोबत बोलून तिचं मानसिक संतुलन बिघडलं होत. अपेक्षा आणि वास्तव यातला फरक तिला करता येईना. याच रुपांतर चिडचिड करने, रात्री मध्यरात्री मद्यधुंद होऊन मित्र-मैत्रिणीच्या घरी थांबण,...नकार पचला नाही कि पबला जाण...योग्य काय आणि अयोग्य काय हे समजण्याची तिची क्षमता कुठेतरी हरवून गेली होती.


योग्य आणि अयोग्य यामध्ये जास्ती फरक असतोच कुठे? तो तर आपणच ठरवतो, प्रत्येक जण आपापले ठरवतात काय योग्य आणि काय अयोग्य.


आजकाल मी पण ठरवतेय कि मी कोणता मार्ग घेऊ?

मनामध्ये कधी कधी विचार येतात आणि ते पंख लाऊन उडून देखील जातात पण, मी त्यांच्या मागे धावत नाही, कारण ते पुन्हा माझ्याच ओंजळीत येऊन विसावणार हे मला माहित असत, म्हणून मी ठरवलंय, मी मध्य साधणार दोन काळांचा मध्य आणि तो आहे Onion पोहे.


बघा विचार करा मित्रहो, तुम्हाला कोणते पोहे खायचे आहेत? आणि बनवणाऱ्या माझ्या मैत्रिणीना, कोणते पोहे बनवणार आहात तुम्ही?


Rate this content
Log in

More marathi story from Priya Satpute

Similar marathi story from Comedy