न्याय
न्याय
रवी एका नामंकित कन्स्ट्रकशन कंपनीत सिव्हिल इंजिनीरिंग म्हणून काम करत होता. प्रोजेक्ट वर्क पूर्ण झाल्यावर, 4-5 दिवससाठी सुट्टी घेऊन डोंगरभाग आणि निसर्गाचा सानिद्यात त्याचं मन रमवण्याचा विचार होता. सायंकाळी फिरायला गेलेलं असताना, रवीला एका आडठिकाणी गाडी बंद पडलेली दिसली. जवळ जाऊन पाहिल्यावर गाडीत एक स्त्री व तिची मुलगी बसलेली होती. तिने जवळ जाताच तिने हात जोडून विनंती मागितली " कृपया मदत करता का माझी गाडी बंद पडली " रवीने " का नाही जरूर " म्हणून मग जसं जमेल तस गाडी दुरुस्त करून दिली आणि कार चालू झाली. तिने " Thank you so much सर माझी खूप मोठी मदत केलीत, माझं नाव आशा ही माझी मुलगी पियू, तुम्ही चला ना चहा प्यायला माझ्या घरी, इथे जवळच माझा बंगला आहे " " पुन्हा कधीतरी " असं रवी बोलून निघणार तोच तिने त्याचा फोन नंबर घेतला.
एकदा सकाळी landline वरून फोन आला
" Hello रवी बोलताय का? "
रवीने " हो बोलतोय आपण कोण? "
" मी आशा बोलते, आज माझी मुलीचा वाढदिवस आहे,
Please, तुम्ही संध्यकाळी नक्की या! "
" मी नक्की प्रयत्न करेन आणि हातातली काम उरकली कि नक्की येईन " असं बोलून रवीने फोन ठेऊन दिला.
लहान पियुला बर वाटव म्हणून रवी मग रात्री 9 वाजता पोहोचला पण पाहतो तर कुणीच नव्हतं. आशा आणि पियू पांढऱ्या शुभ्र ड्रेस मध्ये छान दिसत होत्या दोघीनी हसून स्वागत केल आणि केक उघडून मेणबत्ती पेटवली छोटया पियूने " thanks काका आल्याबद्दल " म्हणून आभार मानले. केक कापल्या नंतर त्याला सर्व फारच वेगळं वाटात होतं. आशाने आग्रह केला " जेवण करून जा, तुम्ही व्हेज खाणार कि नॉनव्हेज?"
रवी " व्हेज चालेल " बोलला आणि अचानक एक बाई जेवण घेऊन आली, ती सर्व लोकं रवीला वागण बोलणं चेहरा वरून निरागस वाटत होती. रवीने छान बाहुली पियुला गिफ्ट दिली त्यावर पियुने " thanks काका" बोलून रवीला छानसा गालावर मुका दिला बोलली "
please काका नेहमी येत जा भेटायला मला खूप आवडेल!" तिच्या आपुलकीने रवीच मनभरून आलं.
जेवताना गप्पा टप्पा करताना कळलं कि आशा एक architect आहे आणि हा बंगला तिनेच बांधला. तोही सिव्हिल इंजिनीरिंग असल्यामुळे दोघांच्या गप्पा छान रमल्या त्याची आदरणीय वागणूक, तिला त्याच्या प्रेमात पाडत होती. 3-4 वेळा दोघांची मिटिंग झाल्या आणि अचानक ऑफिस कामासाठी त्याला परत जावं लागलं तो मग 15 दिवसांनी त्या ठिकाणी आल्यावर कळलं कि गेली 3 वर्षा पासून इथे कुणीच राहत नाही. ऐकल्यावर मात्र रवीचा थरकाप उडाला घरी गेल्यावर तर तो सुन्न झाला कसं तरी थोडं जेवून झोपणार होता पण झोप येईना. गाड झोप लागल्यानंतर आशा रवीच्या स्वप्नांत आली बोलली " माझ्या नवराने इस्टेट साठी रागाच्या भरात माझा आणि आमच्या मुलीचा खून केला आणि सर्व मालमत्ता आणि दागिने घेऊन पळाला, त्यापूर्वी त्याने कुठला पुरावा मागे राहू नये म्हणून मला माझ्या मुलीला आणि खून पाहताना पाहिलेल्या माझ्या नोकर रखमाला मारून बॉडी बंगल्याच्या मागच्या बाजूस गाडून टाकली. Please मला न्याय द्या " आणि रवी झोपेतून उठल्यावर खूप रडला. सकाळी तो तडक पोलीस स्टेशनला जाऊन त्याने FIR केली. पोलिसांनी search वॉरंट काढलं आणि बॉडी ताब्यात घेऊन पोस्टमॉर्तुम केला. पोलीस तपासाला यश मिळालं आणि तिचा नवरा सापडला. त्याला फाशीची शिक्षा झाली. रवीला त्याबाबत खूप आंतरिक समाधान वाटलं.
एक दिवस आशाचे आई वडील आले आणि त्यांनी रविचे आभार मानून. स्वप्नांतली आशाची शेवटची इचछा म्हणून बंगला रवीच्या नावावर केला.
अश्या प्रकारे खऱ्या अर्थाने एक अनोळखी व्यक्तीने उत्तम अंतःकरने न्याय मिळून दिला

