Sachin Mahamuni

Inspirational

3  

Sachin Mahamuni

Inspirational

संयमी चातुर्य

संयमी चातुर्य

4 mins
183


अनिल आणि आकाश दहावी पर्यंत सोबतच होते आणि दहावीला दोघही फर्स्ट क्लासने पास झाले, पुढे मग अनिलच्या वडिलांनी अनिलला पॉलीटेकनिक ऍडमिशन घेण्याचे ठरवले तर आकाशच्या वडिलांनी 12वी सायंन्स आणि कॉमर्स चा फॉर्म भरला होता. पण आकाशने अनिलला सांगितले " अरे आपण पॉलीटेकनिक पूर्ण केल की वयाच्या 18 व्या वर्षीच नोकरी लागून लवकर स्वतःच्या पायावर उभा राहू शकतो आणि तुला इंजिनीरिंग होण्यासाठी 11वी -12वी करून मग B.E ला ऍडमिशन त्याची फी भरपूर असते. आता सध्या पॉलीटेकनिक केल, की कुठे ही लवकर जॉब लागतो "

हे मग आकाशच्या वडिलांनाही पटले. त्या दोघांनी Diploma in Automobile engg ला ऍडमिशन घेतलं. अनिलच्या वडिलांची मिळकत चांगली असल्याने ते फी सहज भरू शकले परंतु आकाशचे वडील कामगार असल्यामुळे त्यांनी मग सोसायटी कढून फी भरली. प्रथम वर्षाला दोघेही चांगल्या मार्कने पास झाले. अनिलच्या वडिलांनी त्याला बाईक घेऊन दिली. आकाश अनिल दोघेही बाईक वरून कॉलेजला, व कधी कधी फिरायला जायचे. आकाश व अनिलने ठरवलं की दुसऱ्या वर्षाच्या परीक्षा नंतर सरावासाठी गॅरेज मध्ये काम करून शिकूया. पण अनिलच्या वडिलांनी साफ नकार देऊन design कोर्सला टाकलं मग महिनाभर आकाश एकटा मेहनतीने शिकत शिकत काम करत होता. त्याला त्याचे पैसे ही मिळाली. त्याने ते आई वडिलांना दिले त्यांच्या डोळ्यात पाणी आले, त्यांनी ते पैसे तसेच बचत म्हणुन ठेऊन दिले व स्व कमाई त्याची शेवटच्या वर्षाची फी भरली. भरपूर अभ्यास मेहनत आकाशला 75% मिळाले तर अनिलला 73%, पण आकाशने मग जॉब करण्याचा विचार केला. पण आकाशला फी परवडणारी नव्हती आणि वडील 2 वर्षांनी रिटायर्ड होणार होते, मोठया बहिणीच्या लग्नात आणि पॉलीटेकनिक खर्च मुळे त्यांची आता ऐपत नव्हती, त्याची आकाशला पूर्ण जाणीव होती. तो गॅरेज मॅनेजर झालता कामाचा उत्तम अनुभव घेत होता. मालकाला त्याचा नेहमीच अभिमान कौतुक वाटायचं तु खूप मोठा माणूस होणार. आकाश ला प्रॅक्टिकल ज्ञान भरपूर मिळत होत तर अनिलला theory ज्ञान. दोघेही भेटलं की त्यावर चर्चा करायचे. अनिलला त्याच्या कॉलेज मध्ये अंकिता नावाची मुलगी मैत्रीण म्हणुन भेटली होती. अनिलची तिच्या सोबत मैत्री झाली. नकळत अनिल तिच्या प्रेमात पडला एकदा अनिलने आकाश सोबत ओळख करून दिली. नंतर अनिल आकाशला सांगितलं " यार मला ही खूप आवडते हिच्या प्रेमात पडलोय मी "

त्यावर आकाश सांगितलं की सध्या अभ्यास कडे लक्ष दे पोरी काय करिअर झालं की भेटतील की. ना राहून शेवटी अनिलने तिला प्रपोज केल, तिने स्पष्ट नकार दिला बोलली मला तु मित्र म्हणुन आवडतोस पण प्रेम प्रकरण नको त्याचा परिणाम अभ्यास वर होतो.अनिलला प्रेमभंगमुळे सतत उदास वाटू लागलं त्यामुळे त्याच अभ्यासत मन लागत नव्हतं त्याचं टेन्शन मुळे तो दुसऱ्या वर्षाला नापास झाला. आकाशाने त्याला धीर दिला. सायकलिंग कर घरीच जिम कर reading कर जास्तीत जास्त आणि अभ्यासवर लक्ष दे आणि मग अनिलने ट्युशन लावली मग सर्व विषयात नापास झालेला आता ATKT मिळाली आणि पुढच्या सेम ला फर्स्ट क्लासने ऑल क्लिअर झाला. सलग दोन वर्ष तो मग मेहनत घेऊ लागला. शेवट वर्ष म्हणुन मग अनिल आणि आकाशला आकांक्षा भेटली आणि मागचं विसरून बोल म्हणुन मग परत तिघांत मैत्री झाली. तिने दोघांना पार्टी दिली कारण तिला मोठया कंपनी चांगल्या पगार जॉब भेटला होता. आकाश शो रूम मध्ये मॅनेजर पोस्ट काम करतो याचं तिला ही कौतुक वाटलं. आकाश एक project चालू केला होता त्यावर तिने त्याला अगदी कसलीही मदत लागली तर नक्कीच कळावं म्हणुन त्याला नंबर दिला. तुला यश नक्की मिळेल मला खात्री बोलली, मोठा माणूस झालास की मला तु विसरू नको हं! ती गेल्यावर अनिलने आकाशला तिला तूझ्या बद्दल प्रेम आहे हे डोळ्यातून कळत यार.. त्यावर आकाश ने अनिलला आता तरी यातून बाहेर यें असं सुचवलं त्यावर मग पुढे अनिल काहीच नाही बोलला. अनिलला फॉरेन ट्रैनिंग मिळाली आणि आकाश मात्र इकडे जॉब करता करता सलग दोन वर्ष प्रोजेक्टसाठी मेहनत घेत होता. एक दिवस तिने त्याला फायनान्स मदत केली, पार्टनर म्हणुन रिस्क माझी म्हणुन आकाशला आकांक्षाने प्रोत्साहन दिल

शेवटी खूप मेहनत घेऊन आकाश fly कार project यशस्वी झाले. दोघेही खूप खूष झाले project patent रजिस्टर केला. दोन कंपनी त्याने प्रेसेंटेशन दिल पण deal यशस्वी नाही झाली. आकांशा पुन्हा आधार देत तिसऱ्या कंपनी ला तिच्या सांगण्यावरून प्रेसेंटेशन दिल व डील यशस्वी होऊन 50 कोटी ऍडव्हान्स मिळाला वर business पार्टनरशिप.

दोघेही खूप आनंदी होते न राहून आकांक्षाने आकाशला मिठी मारली . आज पार्टी म्हणुन आकांक्षा आकाश मन मोकळ केल प्रपोज केल. आकाशने घरच्याशी बोलून 2-3 विचार करून निर्णय घेतला. अनिल आता फॉरेन कंपनी 50 लाख package मिळालं होतं. तिथे NRI मुलीशी घरच्या लग्न ठरवलं.

आकाश आणि आकांक्षा सोबत अनिलने लग्नात good smile selfie घेतला.

एका interview मध्ये आकाशला यशाचं रहस्य विचारलं तर त्याने सांगितलं आई वडील आशीर्वाद सोबत बायको संमयी प्रेमळ सोबत मी लावलेली चातुर्य सतत मेहनत.

        


Rate this content
Log in

Similar marathi story from Inspirational