STORYMIRROR

सचिन महामुनी

Fantasy Inspirational Others

3  

सचिन महामुनी

Fantasy Inspirational Others

ओळख

ओळख

2 mins
159

वंदनाच बी.ए शिक्षण पूर्ण झालं, पण तिला समाजात स्वतः ची ओळख निर्माण करायची होती. तिने त्यासाठी स्वतः मधील सुप्त गुणांनाची जाणीव करून घेत होती. आईकडून विणकाम, भरतकाम शिकली शिवाय आईला घरकाम व स्वयंपाकातही मदत करायची नवीन नवीन पदार्थ करून आई वडिलांना खूष करायची. लग्नानंतर ती एक उत्तम गृहिणी बनू शकते याचा आईला कौतुक वाटायचं. वंदना उर्फ वंदू जरी आई वडिलांची एकुलती एक मुलगी असली तरी राहणीमान अगदी साधी असली, दिसायला गोरीपान,नाके डोळे उत्तम होती. तिच्या आई वडिलांना आता तिच्या लग्नाची घाई झालती पण तिला मात्र नोकरीं करून वडिलांना पैशाचा हातभार लावायची इचछा होती. तिचं मन राखण्यासाठी वडिलांनी सुद्धा ठीक आहे बोलले. एकदा वंदू च्या वडिलांचे जुने मित्र घरी आल्यावर तिचं संस्कारी वागण पाहून खूष झाले. वडिलांन जवळ सरकारी कार्यालयात क्लास वन ऑफिसर मुलाच स्थळ सुचवलं. घरच्यांनी अगोदर जन्मपत्रिका पाहून बघण्याचा कार्यक्रम ठरवला. मनोमन दोघे एकमेकांना पसंद पडले. तिची कला आवड निवडी आणि रूप सौदर्य सोबत संस्कारीपणा मुलाच्या घरच्यांना पसंद पडली होती. पण नोकरी करायची नाही घर सांभाळून जे छंद म्हणुन करता येईल ते कर या एका अटीवर वंदनाने होकार दिला. नवरा मुलगा राजनचे वडील वारल्यानंतर आईनेच नोकरीं आणि घर सांभाळून मुलाला लहानच मोठं केलंत.

त्यामुळे आईला म्हातारपणी बायकोकडून आईला आधार देण्याची इचछा राजन ची होती.

       लग्नानंतर सासरच्या लोकांना वंदूने कसलीच तक्रार येऊ दिली नाही. असचं एकदा दुपारी घर आवरताना घरातील नको असलेल्या वस्तू आढळल्या. तिने त्या वेगळ्या करून त्याबाबत सासूबाईंना विचारलं त्यावर सासू बोलली " या वस्तू कचऱ्यात किंवा भंगारात टाकून दे " त्यावर तिने " उपयोगी craft वस्तू बनवू का? " म्हणुन सासूला विचारलं त्यावर सासूनेही परवानगी दिली. तिने मग थोडी स्वतःची कला वापरून आकर्षित पेन स्टॅन्ड, पायपुसणी, पिशवी असं बऱयाच गोष्टी बनवल्या. त्यावर सासू व नवरा राजन दोघेही खूष झाले. नवरा ने वंदू ला व्हिडिओ बनवून youtube channel अपलोड करायचा सल्ला दिला आणि त्याबाबत मदत केली.

बनवलेल्या वस्तू खूपच आकर्षक आणि उपयोगी असल्याने दुकानदाराने चांगल्या दरात विकत घेतल्या. हळूहळू वेळ मिळेल तस ती craft बनवताना व्हिडिओ बनवायची तिला आता तो छंद लागला होता.

घरातील सर्व जबाबदारी ती पूर्ण करत होती त्यामुळे नवरा आणि सासूला काहीही हरकत नव्हती. पाहता पाहता 7-8 महिन्यात तिचे 1 लाख व्हिडिओ पाहणारे आणि 50 हजार likes सोबत 5000 subscriber झाले. तिला आता youtube कडून जाहिरात मिळाल्याने तिला income चालू झाले. पुढील 2-3 महिन्यात तिचे 1 लाख subscriber झाल्या मुळे तिला youtube कडून golden अवॉर्ड मिळाला त्यामुळे तिच्या आई वडिलांना आणि नवरा व सासूला खूप आनंद झालता बघता बघता लग्नाला 1 वर्ष पूर्ण झाले आणि नवीन पाहुण्याची चाहूल लागल्याने कुटंब आनंद दिवगुणित झाला.

वंदनाने शेवटी सिद्ध केल की इचछा शक्ती प्रबळ असेल व प्रयत्न प्रामाणिक असतील तर आपण आपली स्वप्न पूर्ण करू शकतो व स्वतःची ओळख निर्माण करू शकतो.



Rate this content
Log in

Similar marathi story from Fantasy