आदरणीय आधार
आदरणीय आधार
सुमन व पांडूचा 10 वर्षाचा संसार पण गेल्याकाही वर्षांपासून दोन मुलांचा बेजबाबदार बाप पांडू, बाई आणि दारूच्या आहारी गेल्यामुळे 10 वर्षाचा संसार मोडकळीला आलता. पांडुची बायको सुमन आता सततच भांडणाला कंटाळी होती, तिचे नवरा सुधारण्यासाठी सारे प्रयत्न थकले होते. पण दोन मुलांसाठी तिला जगायचं होतं ती स्वतः जेमतेम 12 वी शिकलेली होती. नवरा मात्र 9वी पास असूनही सरकारी नोकरी होती. त्यामुळे घरच्यानी तिच्या मनाविरुद्ध जास्त शिकू न देता लग्न लावल. लग्नाची पहिली 7-8 वर्ष छान मजेत गेली. तिचं ही संसारात मन रमत होतं. नवरा ही आदराने वागवायचं नंतर मात्र संसारात रोजची भांडण वादीवाद कंटाळवाणा आयुष्य झालं तो रात्रीच्या मित्राकडे जायचा व रात्री उशिरा यायचा. हळूहळू पिन चालू झालं तिला तो जुमनात नव्हतं.तिला ही सर्व त्रास आता असह्य होऊ लागला . एकदा तर बाईला घरी आणलं, सुमनने तिला खूप मारलं झोडलं व घराबाहेर हाकलून दिलं. पण मुलांची शपथ देऊन सुमनने नवरयाला परत घरी आणलं .नवराच्या वाईट सवयी मात्र सुटत नव्हत्या. अचानक सुमनला एक दिवस बाजारात 12वीतला वर्ग मित्र रमेश भेटला. जों कॉलेजला असताना खूप हुशार होता. तो आता नामवंत वकील झालता, सुमनला रमेश कॉलेजला असताना खूप आवडायचा पण कधी जास्त बोलणं होतं नव्हत. त्याचं लग्न झालत पण बायको कॅन्सर मुळे 1 वर्षापूर्वीच वारली होती. तो तिला बोलला " कधी वेळ मिळालं कि भेटायला यें " म्हणून त्याने तिला व्हिसीटींग कार्ड दिलं, त्यावर तिने हसून मान डोलावली. पुढे काही दिवस अचानक पांडू आणि सुमनची कडाडून भांडण झाली, बाजारू बाईसाठी त्याने सुमन व मुलांना घरा बाहेर हाकलून दिलं.
सुमन मुलांना घेऊन बाहेर पडली. मग वकील मित्र रस्त्यात भेटला व तिला चिंतीत पाहून स्वतःच्या घरी घेऊन गेला. सुमनने मुलांना जेवण घालून मांडीवर झोपवलं, घडलेली सर्व हकीकत सांगितली त्यावर रमेश बोलला " काळजी करू नकोस आज निवांत झोप उद्या सकाळी बघू काय करायचं ते " त्याच्या आधाराने तिला हायस वाटलं व आपुलकीचा आधार, दुसऱ्या दिवशी सकाळी रमेश व सुमनला घरी गेल्यावर कळलं कि नवरयाला बाजारू बाईच्या खुनाच्या आरोपा खाली जेल झाली. दारूच्या नशेत असल्याने त्याला रात्रीच काहीच आठवत नव्हतं पुरावे सगळे त्याच्या विरोधात होते. मित्र वकील खूप प्रयत्न केला पण काहीच उपयोग झाला नाही. शेवटी कोर्टाने त्याला फाशीची शिक्षा सुनावली. जेलमध्ये गेल्यावर, सुमन, मुलं आणि वकील रमेश शेवटचं भेटायला गेलते. सुमन व मुलं खूप रडत होती. सगळं होत्याच नव्हतं झालत. पांडूने सुमनची अंतःकरणपासून माफी मागितली आणि पांडूने आपली शेवटची इचछा रमेशला बोलून दाखवली " साहेब माझ्या बायको मुलांना तुमच्या पदरात घ्या त्यांना अंतर देऊ नका त्यांची काळजी घ्या" . यावर रमेशने पांडूला वचन दिले. पांडुच्या मृत्यूनंतर मुलांवरच रमेशच प्रेम पाहून मग सुमनने स्वतःला सावरत रमेश सोबत पुनरविवाह करून संसारची सुरवात केली.
