vaishali vartak

Children

2  

vaishali vartak

Children

निश्चय

निश्चय

2 mins
44


 " ए आई ,उद्या हरतालिका ना? आम्ही मुली उद्याच्या पूजेची पत्री आणावयास जाऊ का.?

  हो जा .एक पिशवी घेऊन जा.

  आणि दुर्वा ..पण आणा बर का!

 तसेच आघाडा पण आणा ..कसा ओळखायचा माहीत आहेना ?

 हो आई माहित आहे .पाने वरील भाग हिरवा व खालचा पांढरट ...ठीक आहे तर

 आई, आम्ही जातो ग म्हणत तनया व तिच्या जोडीच्या मैत्रिणी बरोबर निघाल्या

   तनया 5/6 वर्षाची . बरोबरीच्या पण 6/7वर्षाच्या.

  आधी सोसायटीच्या बंगल्या बाहेर डोकवत असलेली काही फूल झाडांची पाने एक एक करुन तोडली. पुढे सोसायटी च्या बागेत गेल्या .तेथे दुर्वा दिसताच .सा-या जणी दुर्वा खूडायला बसल्या.....थोड्या नीट खुडल्या ..मग एक जण म्हणाली

 अग, असा किती वेळ जाईल ...मी तर उपटून च घेते ...घरी जाऊन तीन तीन दल वेगळे करीन ..मग सर्वच जणींनी तसेच केले ..

 जमिनी तून दुर्वा उपटल्या मुळा सकट. ...किती त्या उपटाव्यात ..त्याला काही सीमा.. .हवरटा सारख्या.उपटल्यात आणि घातल्या पिशवीत .

   पुढे फूले झाडे दिसली ....सदा फूलीची रोपे बहरली होती .आधी एक एक फूल घेता घेता.. मग दांडी सकट फूलांचे गुच्छ च तोडले...व टाकलेत पिशवीत .असे करत मग कण्हेर.. जाई.. शोभेची फूले.. सर्व फुल झाडांची तशीच फूले गोळा केली. .. तिच गत पानांची ..म्हणजे पत्रीची.. चला झाली ग पत्री गोळा करणे..पत्री घेऊन घरी आल्या. आई समोर पिशवी रिकामी केली.

  आईने पहिले व लगेच बोलली

  " अग, तनया ही पत्री आणली का झाडेच उपटलीत?"

  अग,आई किती वेळ घालवायचा ..पटकन काम करण्यासाठी आम्ही पाना फूला सकट च तोडली.तूच म्हणतेस ना चेंगट सारखे काम नको करु.

 "अग पण अशाने त्या रोपाचे ..झाडाचे काय?"

  "पहा तू मुळा सकट गवत उपटले आता उद्या तेथे दुर्वा कशा येतील "

 "आणि फूले घेतांना किती कळ्या पण तोडल्या.. ..ह्या कळ्या उद्या ची फूले ...तुम्ही त्यांना पण उमलू दिले नाही ... हे असे बरोबर नाही .."

 " अशाने आपल्या निसर्ग संपत्तीचा नाश होतो. सुंदर पर्यावरण बिघडते.  आणि महत्वाचे झाडात पण जीव असतो ..तुम्हा ला विज्ञानात पुढे शिकावयास येईल ..त्यांना पण जीव असल्याने दुखापत होते. ..ती पण आपल्या सारखी श्वास घेतात. .आपणास प्राणवायू देतात.. झाडे रोपे यांचे निसर्ग सृष्टी त फार महत्त्व आहे. "

  "तुझा हात पिरगळला तर दुखतो ना .?.तसेच झाडाचे रोपांचे असते."

   तनया आईचे लक्ष देऊन ऐकत बसली होती.

   "ठीक आहे आई ,आता मला समजले .आता मी मनाशी पक्की गाठ बांधते. तू म्हणते तशी ,मी कधीच रोपे अशी उपटणार नाही ...फूल झाडांना.. प्रेमाने एक एक करुन घेईन.आजच्या ह्या तून मी निश्चय करते यापुढे मी झाडांची रोपांची काळजी घेईन.

  खर आहे ग बाई .तूझा निश्चय अगदी योग्य आहे.


Rate this content
Log in

Similar marathi story from Children