नासा येवतीकर

Comedy Drama

3  

नासा येवतीकर

Comedy Drama

निरागस नामा

निरागस नामा

5 mins
617


हरिपूर नावाच्या गावात राधा आणि मोहन मोलमजुरी करून आपले जीवन जगत होते. त्यांच्या परिवारात आजपर्यंत मुलगी जन्माला आलीच नाही. यांनी देखील मुलगी व्हावी म्हणून सहा मुलांना जन्म दिले. राधा सातव्यांदा गरोदर होती, किशनला खात्री होती की यावेळी नक्की मुलगी होईल. पण हाय रे देवा, यावेळी देखील मुलानेच जन्म घेतला. सातवा पुत्र ज्या दिवशी जन्मला तो वार शनिवार होता. घरातले सर्वचजण मुलगा जन्मला म्हटल्याबरोबर नाक मुरडले, आणि त्या मुलाचा तिरस्कार करू लागले. त्याच्या जन्मसोबत अनेक प्रश्न देखील जन्मास आले. मुलगी होण्याऐवजी मुलगा का जन्माला आला? असे प्रश्न त्याच्या आईला आणि त्याला रोज विचारले जात. त्यामुळे ते दोघे खूपच कंटाळले होते. त्याचे नाव नामदेव असे जरी असले तरी घरातले सारेचजण त्याला शनी म्हणूनच बोलावत होते. तो घरात कोणाचाच आवडता नव्हता, दिसायला सुंदर ही नव्हता त्यामुळे सर्वचजण त्याचे तिरस्कार करायचे. तो एकटाच खेळायचा, एकटाच फिरायचा आणि एकटाच रडत बसायचा. कोणताच भाऊ त्याला जवळ घेत नव्हते, तेच जर बहीण राहिली असती तर सारेचजण खूप प्रेम केले असते, जीव लावला असता असे अनेकांचे बोल तो ऐकत असे. यात माझा काय दोष ? म्हणत तो रडत बसायचा.


त्यांच्या आळीतला शिवा नावाचा एक त्याच्याच वयाचा मुलगा मित्र बनला होता. शिवालासुद्धा घरात अशीच वागणूक मिळत होती, त्यामुळे तो देखील नेहमी दुःखी राहायचा पण नामा आणि शिवा यांची मैत्री झाली तसे दोघेजण खूप वेळ एकत्र राहू लागले, खेळू लागले, एवढेच नाही तर दंगामस्ती देखील करू लागले. कोणाचे वस्तू पळावयाचे, लपवून ठेवायचे असे नाना प्रकारचे कृत्य करून सर्वाना या दोघांनी भंडावून सोडले होते. दोघांमध्ये एक गोष्ट समान होती, ती म्हणजे, कोणी ही कोणतेही काम सांगो ते पूर्ण करायचे. या एका बाबीमुळेच कोणीही त्यांना काही बोलत नसे. नामा आणि शिवा आता मोठे झाले होते. आळीच्या बाजूला असलेल्या सरकारी शाळेत ते दोघे शिकायला जाऊ लागले. तिथे ही त्यांची दंगामस्ती काही कमी झाली नाही. शाळेतल्या पोरांसोबत गुरुजींना देखील या दोघे त्रास देत होते.


पाचवी पास होऊन ते दुसऱ्या गल्लीच्या खाजगी शाळेत गेले. तिथे खूप कडक शिस्त होती. तिथे मात्र यांना काहीच करता येत नव्हते. त्या शाळेत देखील नामाने एक कारनामाँ केला ज्यामुळे तो सगळ्या शाळेत ओळखला जाऊ लागला. त्याचे एका मॅडमने त्याला एक काम सांगते. ऑफिसमध्ये अलमारी आहे, तिथे माझ्या नावाचा एक कप्पा आहे, त्यांच्यामध्ये एक पुस्तक ठेवलेलं आहे, ते घेऊन ये. नामा ऑफिसमध्ये जातो, आलमारीवर नाव शोधतो, हेच आहे कप्पा समजून तो चुकून दुसऱ्या शिक्षकांचा कप्पा उघडतो. पुस्तकांचा शोध घेतो तेंव्हा चार पाच रजिस्टरखाली एक रंगबिरंगी पुस्तक दिसते. हेच पुस्तक असावं म्हणून तो पुस्तक घेऊन बाहेर पडतो. काही अंतर चालून जातो न जातो शाळेचे मुख्याध्यापक समोरून येतात आणि त्याला अडवतात. "नामा तुझ्या हातात काय आहे?" "सर पुस्तक आहे, मॅडमनी आणायला सांगितलं" "बघू कोणतं पुस्तक आहे ?" मुख्याध्यापक पुस्तक पाहून चक्रावून जातात. " कोण सांगितलंय तुला हे पुस्तक आणायला?" "आमच्या मॅडमनी सांगितलं" त्याला काही कळले नाही पण ते रंगबिरंगी पुस्तक पाहून मुख्याध्यापक खूपच रागात आले आणि म्हणाले, "मॅडमला, ऑफिसमध्ये बोलवलं म्हणून सांग "नामा वर्गात जातो. "नामा पुस्तक कोठे आहे?" "मॅडम, मुख्याध्यापक सरांनी ते पुस्तक घेतलंय आणि तुम्हांला ऑफिसमध्ये बोलावलं" असे सांगतो. मॅडमला प्रश्न पडतो की, मुख्याध्यापकांनी मला कशाला बोलवले असेल? तर मुख्याध्यापकांना प्रश्न पडतो की, मॅडमला या पुस्तकाबद्दल कसं बोलावं?


मॅडम ऑफिसमध्ये येतात, " सर, कसे काय बोलावलंय ? " सरांनी मॅडमकडे हातातील रंगीबेरंगी पुस्तक दाखवत, "मॅडम, असे पुस्तक वाचताय तुम्ही" मॅडम ते रंगीबेरंगी पुस्तक पाहून क्रोधीत होतात आणि म्हणतात, "हे पुस्तक माझं नाही, कोणी दिलाय तुम्हांला?" "आता नामा हे पुस्तक घेऊन तुमच्याकडे येत होता, तुम्ही आणायला सांगितलं असे तो म्हणाला" "सर, हे माझे पुस्तक नाही." मॅडम आपल्या कप्प्याकडे जाते आणि त्यातून गोष्टीचे पुस्तक काढते" हे पुस्तक आणायला सांगितलं होतं, त्याने कोठून आणलं मला माहित नाही." "ठीक आहे, तुम्ही वर्गात जा आणि नामाला पाठवा" मॅडम वर्गात जाते आणि नामाला ऑफिसमध्ये पाठविते. "पुस्तक कुठून काढलं?" मुख्याध्यापक त्याला विचारतात. तेव्हा तो आलमारीच्या एका कप्प्याकडे बोट दाखवितो, जे की मॅडमच्या बाजूला दुसऱ्याच शिक्षकांचे असते. त्याला वर्गात जाण्याची सूचना देतात. त्या शिक्षकांना ऑफिसमध्ये बोलावून त्यांची कानउघाडणी करतात. हे नामामुळे उघड झालंय हे ही सांगायला विसरत नाहीत. त्यामुळे नामासंपूर्ण शाळेत प्रसिद्ध झाला होता. मात्र त्या गुरुजींची गोची झाली होती. असा हा नामा लहानाचा मोठा होऊ लागला. दहावीपर्यंतचे शिक्षण हसत खेळत मजेत पूर्ण झाले होते. अडल्यानडल्या सर्वाना तो कामाला पडत असे त्यामुळे लोकांनी त्यांचे नाव सरपंच असे ठेवून टाकले. सरपंच म्हणून हाक मारताच नामाची छाती फुलून जायची आणि अवघड - सोपी सारीच कामे पूर्ण करायचा.


असेच एकदा गावातील किसन नावाचा माणूस त्याच्या हातात एक पिशवी देतो, ज्यात शृंगारिक साहित्य असते. "सरपंच, इकडे या जरा, हे पिशवी आमच्या दुसऱ्या घरी देऊन ये" किसनला लग्नाची एक आणि बिन लग्नाची एक असे दोन बायका होत्या. नामाने पिशवी घेतली आणि लग्नाच्या बायकोला दिली. "मालकाने दिलंय" असे म्हणून तो निघाला. किसन इकडे पत्त्याच्या डावात रंगून गेला होता. दुसऱ्या बायकोला एका कार्यक्रमाला जायचे होते म्हणून ती सामानाची वाट पाहत होती. ती फोनवर फोन करून त्याला तंग करत होती. "नामाला पाठविलोय येईल थोड्याच वेळात, पुन्हा फोन नको करुस", अशी तंबी दिली. पत्त्याच्या मोठा डाव चालू होता, एक पत्ता आला तर किसन दहा हजार जिंकणार होता, तेवढ्यात मोबाईलची घंटी वाजली, पुढच्याने डाव जिंकला, तसे किसन रागाने लालेलाल झाला. रागात फोन उचलला, "मर तिकडं, फोन करू नको म्हणून सांगताना फोन केलीस, गेले सारे पैसे ...!" लगेच फोन बंदही केला. किसनच्या या वागण्याचा तिला खूपच राग आला. ती कार्यक्रमाला गेलीच नाही. सायंकाळी किसन तिच्या घरी गेला. ती खूपच रागात होती. सामान मिळालेच नाही हे त्याला कळल्यावर अजून राग आला. तेथून सरळ घरी आला. घरी बायको आज खूपच आनंदात होती. कधी नव्हे ते, एवढं सामान तिला पाहायला मिळालं. तिने खूप वेळ विचारलं त्याला पण त्याने काही एक सांगितलं नाही. तेव्हा तिला पक्का विश्वास बसला. आजपर्यंत तिला सत्य वाटत नव्हतं, मात्र आज सत्य पटलं होतं. रागारागाने ती आपल्या घरात गेली आणि आतून कडी लावून घेतली. किसन मात्र आपल्या कपाळावर हात मारून बसला होता. नामामुळे आज किसनचा भंडाफोड झाला होता. असा हा नामा दुसऱ्याला मदत तर करत असे मात्र त्याच्या मदतीमुळे एक नवा प्रश्न निर्माण होत असे.


Rate this content
Log in

Similar marathi story from Comedy