Vasudeo Gumatkar

Thriller


1  

Vasudeo Gumatkar

Thriller


नैवेद्य रात्रीचा

नैवेद्य रात्रीचा

1 min 2.7K 1 min 2.7K

पावसाळ्याचे दिवस होते. मुसळधार पाऊस पडत होता. रोज संध्याकाळी नैवेद्य घेऊन जायचो. आज मात्र पावसामुळे उशीर झाला होता. मंदिर नदीच्या पलीकडे आडवळणावर होते. तिथे जाण्याचा रस्ता स्मशानाजवळून होता. मी नैवेद्य दाखवून परत फिरलो. नदीच्या दिशेने निघालो. अचानक किंचाळण्याचा आवाज झाला. टिप टिप पाऊस

असतानाही घाम सुटला. मी जोरात चालू लागलो. काळ्या लांब सावल्या

दिसू लागल्या. मागे माझ्या धावू लागल्या. मी पळू लागलो. पाय पकडल्याची जाणीव झाली. मी धपकन पडलो. पाय जोरात ओढू लागलो

पाय काही सुटेना. मी खूप घाबरलो. आपलं काही खरं नाही. घामाने ओलागच्च झालो.

स्मशानातून किंचाळण्याचा आवाज वाढला. तसा जीव खालीवर

होऊ लागला. तसाच बेशुद्ध पडलो. सकाळी जाग आली. जिवंत असण्याची जाणीव झाली. मागे वळून पाहिले तर पाय वेलात अडकलेला होता. पाय काढला अन् घरी पळून आलो.


Rate this content
Log in

More marathi story from Vasudeo Gumatkar

Similar marathi story from Thriller