अत्याचार
अत्याचार


एका गावात एक छानसं कुटुंब असतं. आई-वडील आणि मुलगी यांच छान चालू असतं. एक दिवस कुटुंबावर मोठं संकट कोसळतं. त्या छोट्याशा मुलीची आई वारते. ती मुलगी आईच्या दुःखात खूप रडते. तिचे बाबा दुसरं लग्न करतात. काही वर्षे सुखात जातात. तिच्या आईला दुसरे मुल होते. तसे तिचे वर्तन बदलू लागते. ती तिच्या मुलाला जीव लावून त्या
मुलीचा छळ करते. घरातली सर्व कामे त्या मुलीला करावे लागतात.
दिवसेंदिवस अत्याचार वाढू लागतात. पोळी करपली तर हाताला चटके देते. काम पूर्ण झालं नाही तर खूप मार मारते. तिच्या वडीलांकडून
>काहीच मदत मिळत नाही. खायला पुरेसं अन्नही मिळत नाही. मिळालेल्या शिळ्या तुकड्यावर जगते. असेच एक दिवस लहान मुलाला खेळवत
असताना ते बाळ पडते. त्याच्या डोक्याला खूप लागते, रक्त वाहते. तिच्या सावत्र आईला ते कळते. तिला खूप राग येतो. त्या मुलीला खूप मारते.
गरम तव्यावर तिचा हात ठेवते. पाठीत फटकारे मारते. ती बिचारी उपाशी
गच्चीवर जाते. आई! आई! आई! आई! तिच्या सख्या आईला हाक मारते
तशीच चक्कर येऊन पडते आणि तिचा प्राण निघून जातो.
अजूनही त्या घरात गेले की आई! आई! आई! असा आवाज घुमत राहतो.