एक अनामिक भीती
एक अनामिक भीती


फिरायला जाण्याचा निर्णय ठरला. ही वार्ता ऐकून सर्वांना आनंद झाला. कपडेलत्ते घेऊन
सर्वजण निघालो. मध्येच आईने अडविले. म्हणाली, अमावस्या आली. विज्ञान युगात विश्वास ठेवतेय कोण? सर्वजण गाडीत बसले. चौघेजण निघालो. थंड हवेचे ठिकाण आम्ही निवडले होते. जंगलातल्या घरात राहायची सोय झाली. बंगला थोडा चित्रविचित्र दिसत होता. रात्र झाली होती. रातकिड्यांचा आवाज खूप वाढला होता. मनात थोडी भीती वाटायला लागली. हवेची थंड
झुळूक येऊ लागली. दुसऱ्या दिवशी आम्ही खूप फिरलो. संध्याकाळ होऊ लागली. आम्ही माघारी फिरलो. वाटेत येताना एक लहान मुलगी दिसली. ती खूप रडत होती. आम्ही तिला विचारले का रडतेस? काय झालं? ती रडतच म्हणाली, मी या जंगलात हरवले. माझे आईबाबा त्या टेकडीवर आहेत. आम्ही तिला तिकडे नेलं. वडीलांना शोधू लागलो. अचानक ती मुलगी
जोरात पळू लागली. पप्पा! मम्मी! पप्पा! म्हणून जोरात पळाली. आम्ही अडवायचा प्रयत्न
खूप केला पण ती थांबली नाही. तेवढ्यात ती दरीत कोसळली.
आम्ही खूप घाबरलो. अचानक हे काय घडले. आम्हाला कळलेच नाही. परंतु मनात एक
भीती निर्माण झाली. अनामिक भीती...
आम्ही तसेच घरी आलो. आम्हाला घाबरलेला पाहून चौकीदाराने चौकशी केली. त्याला घडलेली घटना सांगून टाकली. तो म्हणाला, तुम्हाला पण दिसली ? म्हणजे! एकमेकांकडे बघून म्हणालो. चौकीदार म्हणाला, काही वर्षांपूर्वीचं ती अपघातात वारली. ती अधूनमधून दिसल्याचे
सर्वजण चर्चा करतात.. ते दृश्य पाहून खूप घाबरलो. मनात एक अनामिक भीती निर्माण झाली
पण थोडसं दुःखही झाले त्या अपघाताविषयी....