नाश्त्याच्या टेबलावर
नाश्त्याच्या टेबलावर
सकाळपासूनच आईची नुसतीच धावपळ सुरू होती.कारण आज रीनाला पहायला मुलाकडचे येणार होते. पोहे,कचोरी,शिरा सर्व नाश्ता आईने स्वतः बनवला होता...
मुलाकडची मंडळी आली.रिना आतमध्ये तयार होत होती.. तेवढ्यात आईने सर्वांना सांगायला सुरुवात केली की,रीना कशी सुगरण आहे,किती हुशार आहे ते.. रीना बाहेर आली.सर्व विचारपूस झाली.आणि मुलाची आई लगेच बोलली मला तर मुलगी आवडली आहे.. लगेच रीना बोलली
"ते ठीक आहे..पण हा सर्व नाश्ता मी बनवला नाही.
चहा आणि मॅगी शिवाय मला काहीच येत नाही.."
लगेच मुलगा मध्येच बोलला "स्वतः हुन खरे बोलणारी मुलगी मला पसंत आहे."
त्याच नाश्त्याच्या टेबलावर लग्नाची पुढची बोलणी सुरू झाली...
