Prabhawati Sandeep Wadwale (Nandedkar)

Horror Inspirational Others

2  

Prabhawati Sandeep Wadwale (Nandedkar)

Horror Inspirational Others

मुलींना जगू द्या

मुलींना जगू द्या

1 min
159


आपण लैंगिक गुणोत्तर सुधारले पाहिजे. भारतीय संस्कृतीत स्त्रियांना देवीचा दर्जा दिला जातो. आई वडिलांमध्ये आईला जास्त महत्त्व असतं. असं असूनही आपल्याला मुलगी नको असाच अनेकांचा पवित्रा आजच्या आधुनिक जगात सुद्धा असतो. मुलगी नको असण्याचं मोठं कारण म्हणजे हुंडा पद्धती. आज हुंडा पद्धत कायद्याने बंद असूनही लग्नाच्या वेळी वधूच्या पालकांकडून मोठ्या प्रमाणावर हुंडा घेतला जातो. मग घरात दोन तीन मुली असतील तर,,,!!


       आपल्या मुलींना उजवताना मुलीच्या बापाचं कंबरडं मोडून जातं. एवढं करून सुद्धा मुलीच्या सासरच्या लोकांचे मान मरातब आयुष्यभर पाळावे लागतात. तेच मुलाच्या म्हणजे वराच्या घरचे लोक भारीच तोऱ्यात असतात. त्यांना मुलीकडचे लोक विशेष करून आईवडील हे तर आपले नोकरच आहेत असं वाटतं.  


      त्यांच्या मुलीचं आपल्या मुलासोबत लग्न करतोय म्हणजे जणू काही त्यांच्यावर उपकारच करत आहोत असा अहंगंड त्यांना असतो. अशा उपकाराखाली दबलेला बाप मग त्यांची हवी ती मागणी पूर्ण करायला नेहमी झुकलेला असणारच, 


      त्यांची मागणी त्याला काहीही करून पूर्ण करावी लागणारच, मग तो कर्जात बुडो की स्वत:ला विको याची मुलाकडच्या लोकांना तमा नसते. मुलींचा बाप असणं गुन्हा आहे. का वागवले जाते. ज्या मुलीला तिचा बाप लहानचं मोठं करतो. तिच्या लग्नासाठी खूप काही करतो.स्वतः ला नको त्या वेदना देतो. मुलींच्या सुखासाठी बाप खूप काही करतो.पण लग्न झाल्यावर तुला सुखानं जगू पण दिल जात नाही.मुलीला स्वतःचे स्वप्ने बाजूला ठेवून त्यावर पांघरून घालून जगावं लागतं. माझं एक म्हणणं आहे मुलीला मोकळया मनाने जगू द्या, तिच्या मनाविरुद्ध काही नका करू!!!!


Rate this content
Log in

Similar marathi story from Horror