मोकळा श्वास अन् ती
मोकळा श्वास अन् ती
आपण म्हणतो स्त्री म्हणजे शक्ती...
आदिमायेचे रुप,कळीचे रूप, सरस्वतीचे रूप मग अश्या पूजनीय देहाची ही अशी विटंबना होताना पाहिली की,तळपायाची आग मस्तकात जाते..महिला दीन आपण
खूप आनंदात साजरा करतो खरा,पण वर्तमान पत्र व दूरचित्रवाणीवर दिसणाऱ्या,महिलांवरील होणाऱ्या अत्याचारांच्या बातम्यांनी मन विषण्ण
होत....आजची स्त्री स्वकृत्ववान स्वतःच्या पायावर खंबीरपणे उभी राहिली, पैसे कमावू लागली, तरी आजही ती पुरुषी अहंकाराचा बळी होताना दिसते अशा या जगात ती पुरुषी नजरांमुळे बाहेर काय किंवा घरात काय अहो इतकच काय पण ती मातेच्या गर्भात ही सुरक्षित नाहीये ती लहानगी मुलगी असो किंवा वार्धक्याकडे झुकलेली स्त्री असो, पुरुषांचा स्त्रीकडे बघण्याचा दृष्टिकोन हा केवळ एक उपभोग्य वस्तू असाच असतो... तिच्यावर शारीरिक अत्याचार हा स्त्री आयुष्य उध्वस्त करणारा असतो... जोपर्यंत अशा नराधमांना त्वरित व कडक शासन केले जाणार नाही, तोपर्यंत अशा बलात्काराच्या संख्येत वाढच होत राहील...
सरकारी पातळीवर किती प्रयत्न केले, अगदी 'मुलगी शिकली प्रगती झाली' तरीही काही बदल होणार नाही... महिला दिन खऱ्या अर्थाने तेव्हा साजरा केला जाणार आहे, जेव्हा महिलांच्या,
' स्व ' चा मान राखला जाईल....स्त्रीकडे
पाहताना पुरुषाला आपल्या आया बहिणींची आठवण होणार... छत्रपती शिवाजी महाराजांनी स्त्रियांचा कशाप्रकारे सन्मान ठेवला, ते आदर्श आपल्यासमोर हवेत....
आपण आशा करूया की, स्त्रियांवरील अत्याचार, बलात्कार, स्त्री भूषण हत्या थांबतील, आणि स्त्रियांना समाजात मानाचे स्थान मिळेल.. आजची स्त्री ही पुरुषाच्या बरोबरीने वाटचाल करत पुढे चालली आहे... आजची स्त्री ही चंद्रावरही जाऊन पोहोचली आहे....
आता ती फक्त 'चुल आणि मुल' यापूर्तीच मर्यादित राहिलेली नसून ती... आकाशात ही उडू लागली आहे... उंच भरारी घेऊ लागली आहे... आता कुठे जरा तिला तिच्या मनासारखे वागतात येऊ लागले आहे.. त्यामुळे तिला आता कोणीही रोखू नये, आणि तिला मोकळा श्वास घेऊ द्या.
मोकळ्या आकाशात उंच उंच उडू द्या..
तिच्या पंखांना पाठबळ द्या. मग बघा स्त्री कशी... मोकळा श्वास घेते ते...