मनीचे वादळ....
मनीचे वादळ....
तू दूर का......??
मी असा मजबूर का.....??
मनाला मनाची....
खरी ओढ राही....
अलबेल सारे....
तरी गोड नाही....
पाहण्या तुला मन हे....
आतुर का.....??
दोन प्रेमी युगुल जरी एकमेकांपासून दूर जरी असेल, तरी त्यांच्यातील प्रेमाचे नाते मात्र घट्ट विणलेले असते.....एकमेकांपासून अनभिज्ञ असलेले.... एकमेकांनप्रती असलेले खरे प्रेम....कधीही न झालेली भेट....कधीही एकमेकांना न पाहिलेले.... न बोलता.... तरीही एकमेकांबद्दल असलेले अतूट प्रेम.....
एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडालेले वेडे प्रेमी युगुल.....भेटण्याची प्रचंड ओढ असलेले....एकमेकात हरवून गेलेले.... न पाहताच झालेले वेडे प्रेम....जणू प्रेमाचे वेडच....विरहात बुडालेले....मनात प्रेमाचे वादळ सुरू असलेले प्रेमी.... एकमेकांपासून खूप दूर असूनही मनाच्या अगदी जवळ असलेले वेडे प्रेमी युगुल.... मनात प्रचंड काहूर माजलेले.....
दूर असेल तरी मनाने एकमेकांच्या जवळ, एकमेकांच्या सहवासातच असलेले जणू काय....जसे की, दोन शरीर पण एकाच जीव असलेले.....मनीच्या अंतरी प्रेमाचे वादळ दाटलेले...... एकमेकांच्या आठवणीत आकंठ बुडालेले.....कधीही भेट होणार नाही, माहित असून देखील प्रचंड झालेले वेडे प्रेम.....जसे मनीचे वादळच होते...मनाची
होणारी घालमेल....एकमेकांना सलत असते.....तरीही प्रेम मात्र किंचितही कमी होत नाही....असे हे वेडे प्रेम....मनात असलेले जणू वादळच.....!!!
मनातले वादळ....मनीचे वादळ...!!

