STORYMIRROR

प्रणिता प्रणिता

Others

2  

प्रणिता प्रणिता

Others

अंधारातून प्रकाशाकडे...

अंधारातून प्रकाशाकडे...

1 min
35

"फिटे अंधाराचे जाळे, झाले मोकळे आकाश....,

दरी खोऱ्यातून वाहे, एक प्रकाश प्रकाश"


आपण आज एकविसाव्या शतकात राहत आहोत....आज आपले शास्त्रज्ञ चंद्रावर गेले आहेत...एवढे जग पुढे गेलेले असताना,आजही आपल्या भारतात ,  

अंधश्रध्देच्या नावाखाली नरबळीसारखे प्रकार होतात....


आत्ताचे ताजे उदाहरण म्हणजे, 'गावीत बहिणी ' त्यांनी मुलांचे अपहरण करून नरबळी देऊन ते शव पिशवीत घेऊन रस्त्यावर उघडपणे ' वडापाव ' खात होत्या....आजही लोक जमिनीतील खजिना मिळविण्यासाठी नरबळी सारखे प्रकार करतात....


तर ह्या सर्व अंधश्रद्धा आहेत..कोणाचाहीजीव मारून तुम्हाला आयुष्यात कधीच काही मिळणार नाही....म्हणून माणूस बनून जगा....या पृथ्वीचे आपल्यावर कर्ज आहे...तिने आपल्याला या धरतीवर जीवनदान दिले...म्हणून जोपर्यंत मृत्यू येत नाही, तोपर्यंत होईल तेवढे जगाचे भले करण्याचा प्रयत्न करावा....


मुलांना चांगले शिक्षण द्या.... त्यांना जती पाती मध्ये बांधून ठेऊ नका...नवीन नवीन संशोधन करण्याचे प्रयत्न करा.. जगात आपल्या भारत देशाचे नाव उज्ज्वल करा...


"अज्ञानृपी अंधराकडून ज्ञानरूपी प्रकाशाकडे वाटचाल करू....!!"


Rate this content
Log in