Exclusive FREE session on RIG VEDA for you, Register now!
Exclusive FREE session on RIG VEDA for you, Register now!

TEJASWINI MAHATUNGADE

Abstract


5.0  

TEJASWINI MAHATUNGADE

Abstract


मन्याच प्रेम

मन्याच प्रेम

2 mins 541 2 mins 541

जुई वडीलांच्या नोकरी निमित्त आई-वडीला सोबत गावातून शहरात राहायला आली आहे.जुई दिसायला सुंदर, गोरी, रूपवान तसेच गुणानी गुणवान ही आहे.... काॅलेज मध्ये शिकत असली तरी स्वयंपाक करणे हि तीची आवड आहे.... नाॅनव्हेज शिजवण व खाण दोन्ही तिला मनापासून आवडत तिच्या घरी नेहमी म्हणजे अगदी रोज म्हणायला हरकत नाही मटण, चिकन किंवा मासे शिजत असतात. आणि मग ते शिजतानाचा खमंग सुवास घरातच नाही तर खिडकीच्या बाहेर आसपास ही पसरतोच.....

राज त्याच सोसायटीत राहणारा एक देखणा, रुबाबदार तरुण म्हणजेच हॅण्डसम मुलगा (गाय).....

त्याच सोसायटीत राहणारा 'मन्या' पूर्ण सोसायटीचा लाडका आणि आवडता मांजर (बोका) सोसायटीतील सर्वांकडच खाउन खाउन मस्त गुटगुटीत झालेला, गोरा गुमटा म्हणजे रंगानी पांढरा शूभ्र पाहता क्षणिच कोणिही त्याच्या प्रेमात पडेल असाच आहे.... कोणा ना कोणाच्या घरी रोज त्याची नॉनव्हेज पार्टी सुरूच असते.

एकदा जुई स्वयंपाक करत असताना तिच्या लक्षात येत की, खिडकीच्या बाहेर मन्या बसला आहे. इतक्यात तिची आई तिला हाक देते. मी किचनच्या बाहेर गेले तर मन्या चिकनचा तुकडा घेऊन जाईल असा विचार तिच्या मनात येतो, म्हणून ती खिड़की बंद करते.... तेव्हा मात्र मन्याला तिचा खूप राग येतो.... मनातून काहीबाही तिला बडबडत निघून जातो.... पण पुढेही त्याचे नॉनव्हेज चोरण्याचे प्रयत्न तो सुरूच ठेवतो.

इकडे राजचेही जुईला पटविण्याचे प्रयत्न सुरू असतात.... कधी बेडरुमच्या बाल्कनीतून तर कधी किचनच्या खिड़कीतून नेहमी जुईला पाहण्याचा आणि तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न तो करत असतो.

मन्या रोज खिडकीच्या बाहेर बसून ती खिडकी उघडूदे म्हणून देवाला विनवनी करत असतो.... आणि एक दिवस अचानक जुई खिडकीच दार उघडते आणि मन्याला मटणाचे तुकडे खायला देते... तेव्हा मन्या खूष होवून आनंदाने नाचू लागतो आणि राजकडे पाहून त्याला चिडवू लागतो.... त्यानंतर मात्र जेव्हा केव्हा जुई कडे नॉनव्हेज शिजेल तेव्हा तेव्हा मन्याला दिल जात.

राज मात्र यश येत नाही. जुई त्याच्याशी बोलायच तर सोडा त्याच्याकडे पहातही नसते... आता तो रोज तिच्या मागे मागे तिच्या कॉलेजलाही जात असतो...

एकदा जस अचानक मन्याला मटण दिल तसच राजला जुईचा मेसेज येतो.... सोसायटीच्या शेजारच्याच कॉफी शॉपमध्ये भेटायला बोलवल्याचा... राज सुध्दा मन्या सारखाच खूप खूष होतो नाचू गावू लागतो...

कॉफी शॉपमध्ये येताना राज छान तयार होवून तर येतोच सोबत एक गुलदस्ता आणि i love you लिहिलेले कार्ड ही आणतो... आणि बोलता बोलता अगदी रोमान्टिक मूडमध्ये गुलदस्ता व कार्ड जुईला देतो... जुई काही बोलणार इतक्यात (त्याच कॉफी शॉपमध्ये दुसरे जोडपे एकमेकाना लव यू चे कार्ड देत असतात त्यातल एक कार्ड मन्या चोरतो.) जुईच्या समोर i love you too चे कार्ड मन्या ठेवतो आणि तिच्या कडे पहात बसतो.


Rate this content
Log in

More marathi story from TEJASWINI MAHATUNGADE

Similar marathi story from Abstract