अन् एकता महाराष्ट्रात
अन् एकता महाराष्ट्रात


माझा भारत महान या विषया वरचा निबंध बंटी वाचत होता "आपल्या देशात अनेक जाती, भाषा, प्रांत असूनही आपण एक आहोत म्हणजेच अनेकते मध्ये एकता आहे." हे वाक्य वाचून बंटी आईला म्हणजे मेघाला म्हणाला अनेकते मध्ये एकता म्हणजे काय ग आई?
मेघा सोबत बसलेली शेजारची निशा बंटीला समजावते.. अरे बंटी जसे आपण मराठी, पटेल अंकल गुजराती तर नारायण काका कन्नड़... तिला थांबवत,
बंटी - आणि गुरमीत अंकल पंजाबी !
निशा - अगदी बरोबर असेच अनेक भाषेचे लोक आपल्या देशात एकत्र राहतात.
बंटी - हो ताई समजल.
संध्याकाली निशाला कोल्हापूरच्या छाया काकींचा फोन आला. (निशा नोकरी निमित्त कोल्हापूर, रत्नागिरी, मुंबई, पुणे शहरात राहिली होती)
निशा - हॅलो काकू कशा आहात?
काकू - मला काय धाड भरते तू सांग तू कशी हाईस? सम्ध ठिक हाय न्हव्ह?
(अशी मराठी ऐकून बरेच दिवस झाले होते)
निशा - हो काकू मी मस्त घरी सगले बरे आहेत ना?
काकू - व्हय सर्व बरेच हाईत तू कधी येतीस आमास्नी भेटाया
निशा- हो काकू नक्की येईन
(इतक्यात काकूंच्या मूलाने हाक दिली म्हणून घाईने फोन ठेवत)
-बर निशे ठेवतो ग. रां....... चा कुट उंडगत व्हता
निशाने बरबर म्हणत फोन ठेवला काकूंच ते स्वतःच्या मूलाला शिव्या देवून बोलण निशाला नविन नव्हत पण पुण्यात कोणी अस बोलल तर.......
कोल्हापूरची भाषाच नाहितर जेवण तांबडा पांढरा रस्सा आणि तिथल रांडग जीवन किती वेगल..... बंटीने अनेकते बद्दल विचारलेल तिला आठवल रत्नागिरीच्या सावंत काकींच चौकस रहाण त्यांच कोकणी जेवण उकडीचे मोदक. गणेश चतुर्थीची तबला टाल वाजवून केलेली आरती तिला आठवली ती आरतीत मग्न झालि इतक्यात,
अग निशा कुठ हरवली आहेस? या प्रश्नाच्या आवाजाने भानावर आली.
निशा - सावंत काकींची आठवन आली.
मेघा- रत्नागिरीच्या?
निशा- हो तिकडचा गणेशोत्सव आठवला.
मेघा - हो तिकडे वेगल्या पध्दतिने होतो ना?
निशा - तिकडची मराठी ही वेगली वाटते... कोल्हापूरची वेगली पुण्याची वेगली.
दोघी हसून वेगली असली तरी मराठीच !
मेघा - अजून अर्धच महाराष्ट्र पाहिलय आपण.
निशा - हो तुमच महाराष्ट्र बरच मोठ आहे
मेघा - पण तूमच म्हणून तू आम्हला परक केल असलस तरी कानडी टोनिंगची तुझी मराठी ही आम्ही आमचीच मानतो.
निशा - हिच ती अनेकते मध्ये एकता
दोघी - अशी ही अन् +एकता महाराष्ट्रात