TEJASWINI MAHATUNGADE

Others

2  

TEJASWINI MAHATUNGADE

Others

महिला दिन विशेष कथा

महिला दिन विशेष कथा

5 mins
981


अनु, इंदू, सावित्री आणि  ब-याच जणीं  लायब्ररीत बसलेल्या पूनमच लक्ष्य काही वाचनात लागत नव्हत. आज ठरविलेला कार्यक्रम व्यवस्थित पार पडेल का? ज्यांचा सत्कार करण्यासाठी बोलवल आहे त्या  सा-याजणी नक्की येतील का? आणि असेच बरेच प्रश्न तिच्या मनात तांडव करीत होते.... इतक्यात तिकडून "काय होतोय का अभ्यास"? हे सीमाचे शब्द कानावर पडताच पूनम भानावर आली.. कू कूठ काय अभ्यासात लक्ष्यच लागत नाही आहे. आजच्या कार्यक्रमाच्या सूत्रसंचालनाच टेन्शन आलय मला. अरे टेन्शन कशाच तयारी तर पूर्ण झालीच आहे ना? मग घाबरायच का?... हा आवाज मागून आला म्हणून पूनम ने मागे बघीतल तर सुनिता येता-येताच हे बोलत होती..  "आणि आम्ही सुध्दा आहोतच ना तुझ्या सोबत" असं म्हणत निलवंती ही सुनिताच्या मागे मागे तिथं आली. 

पुनम - आपली तयारी नक्कीच झाली आहे पण ज्यांना आपण बोलवलय त्यांच आदरातिर्थ योग्यरितीने आपण करू शकू ना?..त्यापैकी कोणी डॉक्टर आहे तर कोणी या शहरातील चांगल्या बिजनेस वुमन.."

हो हो आणि परब मॅडम तर चांगल्या वकील आहेत. पण पुनम त्यात एवढं टेन्शन घेण्या सारखं काय आहे"? असं विचारत अमृताही तिथं आलीच.  आता या पाच जणी एकत्र आल्या तर त्यांच्या ग्रुप मधली नेहा कशी काय लांब राहाणार. तीही तिथं हजर झालीच की...या सहा मैत्रिणी पार्ट टाईम जॉब करत - करत स्पर्धा परिक्षेची तयारी सुध्दा करीत होत्या आणि म्हणूनच त्या लायब्ररीत सुध्दा एकत्रच यायच्या. ८ मार्च जागतिक महिला दिन निमित्त त्यांच्या आॅफिसमध्ये काही प्रतिष्ठित महिलांचा सन्मान करण्याच ठरविल होत. त्याच बाबतीत चर्चा आता लायब्ररीत सुरू आहे.  

नेहा - आपण ज्यांना आमंत्रित केलं आहे त्या तर याच शहरातील महिला आहेत.

पुनम - मग काय आपण जिजामाता, इंदिरा गांधी, यांना बोलवू शकतो का?  

सिमा- हं यांना नाही पण निदान डॉ. राणी बंग, डॉ. मंदाकिनी आमटे किंवा डॉ. भारती आमटे यांना जरी बोलवू शकलो असतो तरी आपलं किती छान झाल असत... 

निलवंती- अगदी बरोबर यांनी जे काम केल आहे ते करण्याच धाडस आपल्या सारखी करूच शकणार नाही... कारण घरी सर्व सूखसुविधा असताना देखिल आदिवासी भागात राहून रोग्यांची सेवा करणे. हे काही साधं काम नाही. 

पुनम - जेव्हा आपल्याला शक्य होईल तेव्हा नक्कीच आपण जाऊ. हेमलकसा - सेवाग्राम - शोधग्राम या ठिकाणांना भेट देऊ. 

सर्वजणींना पुनमच म्हणन पटलं होत म्हणूनच एकसाथ थम्सअप् चा सिंम्बाॅल करून होकार दिला होता. 

सुनिता - हो पण आपण ज्यासाठी येथे आलो आहोत तो विषयच बाजूला राहीला आहे.  

पुनम - अरे हो हि लायब्ररी आहे आणि आपण अभ्यासासाठी येथे आलो आहोत, चला-चला अभ्यासाला सुरूवात करा.

अमृता - तू कर तुझा अभ्यास आम्हाला जेव्हा करायचा होता तेव्हा केला आम्ही भरपूर...  

पुनम- करायचा होता म्हणजे आता काय परिक्षा सोडण्याचा विचार आहे का?  

निलवंती- बोला अनुताई काय विचार आहे तुमचा अभ्यासा बद्दल (आतापर्यंत जी व्यक्ति अमृता म्हणून बोलत होती ती अनुताई झाली)             

अनुताई - आता काय बोलू मी? व्हनर्याक्युलस परिक्षा, प्राथमिक शिक्षण प्रमाणपत्र परिक्षेत प्रथम क्रमांकानं पास होऊन, हुजूर पागा स्कूल मध्ये नोकरी करत बी. ए पास झाले. ४० वर्षोंहून अधिक वर्ष समाजकार्य केलं 'कोसबाडच्या टेकडीवरून' सर्व काही सांगितल तरी महिला दिना दिवशी सुध्दा आमची आठवण कोणाला येत नाही.... खंर आहे ना पंडिताबाई... हे शब्द ऐकूण (सुनिताच्या रूपात असलेल्या पंडिता रमाबाई बोलू लागल्या )                

पंडिता रमाबाई रानडे- खंरच अनुताई म्हणजे अनुताई वाघ बाई आपल्याला शिक्षण घेणं किती कठिण होत माहिती आहे ना? तरी घरच्या लोकांचा विश्वास आणि मदत आपल्याला होती म्हणूनच तर आपण व्यवस्थित शिकू शकलो - - एकट्या एकट्या परदेशी जाऊ शकलो. आता टेक्नोलॉजी कितीही पूढे गेली असली तरी मानसिकता खुंटली आहे. बघा ना. माझ्या वडीलांनी समाजाचा विरोध पत्करून मला माझ्या आईला संस्कृत आणि हिंदू शास्त्रांचा अभ्यास शिकविला त्याचा मला किती फायदा झाला.... आई-वडीलांच्या निर्वतनानंतर लहान भावासोबत बिनधास्त संपूर्ण हिंदूस्थान फिरू शकले आजकालच्या दिवसात ते सहज शक्य नसत झाल. खंरतर सन - १८८०-८२ च्या दरम्यान मी बोलले होते "आपल्या देशाची प्रगती करायची असेल तर स्त्रियांची स्थिति सुधारली पाहीजे".... तेव्हा मला काही चांगल्या माणसांची साथ होती म्हणूनच लहान मुलीला घेऊन मी परदेशात राहू शकले... खंरतर शारदा सदन, मुक्ति सदन, म्हटलं तर माझी आठवण येऊ शकते पण महिला दिना दिवशी कोणाला माझी आठवण येत असेल अस नाही वाटत मला.... हो की नाही सावित्रीबाई.... (मघापासून जी सिमा होती ती आता सावित्रीबाई म्हणून बोलू लागली).    

सावित्रीबाई फूले - तुम्हीं कोणाला माहिती नसाल पण मी मात्र प्रसिद्ध आहे प्रत्येक ठिकाणी माझी आठवण आल्या बिगर राहत नाही जशा तुम्हीं माझ्या लेकी तशाच आताच्या पण सर्व स्त्रियां माझ्याच लेकी आहेत.... मला समाजात बराच तिरस्कार सहन करावा लागला पण महात्मा फूलेंची साथ मला लाभली हे माझं नशीबच... मला आठवण येते ती आमची सोबती असलेली ताराबाई शिंदे यांची त्यांनी तेव्हाच म्हटलं होत "जर बायकोला नवरा देव तर नव-याची वागणूक देखील देवा प्रमाणेच पाहिजे". त्यांच ते बोलणं अजूनही कित्येकांना समजलं नाही... हो ना इरावतीबाई? बोला तुम्हाला काय वाटत? तुम्ही तर माणसांच्या खोपड़ीचा अभ्यास केलाय.   

सावित्रीबाईंचे हे शब्द ऐकून सर्वांना हसू आलं (सहाजिकच त्या सहा मैत्रिणी मधील एक म्हणजे निलवंती आता इरावती कर्वे होती )    

इरावती कर्वे - -(हसतच ) मी तर सध्या कोणाला माहिती असेन अस वाटत नाही.... म्हणूनच महिला दिना दिवशी सन्मानची अपेक्षा करण चूकीचच वाटतयं मला... माझे सासरे महर्षी कर्वे हे तसे सर्वांना माहित असतीलच.... कुटुंबाची साथ होतीच मला म्हणून तर माणसांच्या डोक्याच्या कवटीचा अभ्यास मी करू शकले तेही बर्लिन विद्यापीठातून.... त्या बद्दल स्वतःचाच अभिमान आहे मला... आता सोडा पण त्या दिवसात बाईला घरातून बाहेर पडण शक्य नसताना मी हे करू शकले.... सावित्रीबाई तुम्ही म्हणालात तसा मी खोपड़ीचा अभ्यास केला असला तरी शांताबाई शेलकेनीं मानवी भावभावनांचे यथार्थ चित्रण त्यांच्या कवितांमधून केले आहे. त्या तरी लक्षात राहायला हव्या आहेत हो की नाही गोदूताई (हे ऐकूण नेहा म्हणजे गोदावरी परूलेकर बोलू लागल्या )

गोदावरी परूलेकर - बरोबर आहे इरावतीबाई आपणच नाही तर आपल्या सारख्या अनेक स्त्रियां होऊन गेल्या इतिहासात ज्यांचा सध्याच्या पिढीला विसर पडला आहे... विसर म्हणन योग्य नाही कारण स्पर्धा परिक्षेचा अभ्यास करणा-याच आपण माहीत आहोत हे ही तितकच खंर आहे. मध्यंतरी डॉ. जोशी म्हणजे आनंदीबाई यांच्या जीवनावर चित्रपट निघाला होता म्हणून त्या लोकांच्या नजरेत आल्या नाहीतर तुम्ही - आम्ही लिहीलेली पुस्तक कोणाला माहीतच नाहीत. आजकल पुस्तक कोणी वाचतच नाही म्हणा.... जस मी वारली समाजत राहून काम केल तसच इंदू ताई पटवर्धनानीही आदिवासीची सेवा केली. त्या तर अलिकडच्या सालातल्याच होत्या.

"जेव्हा माणूस जागा होतो" हे माझं पुस्तक पण अजूनही माणूस जागा झालाय का? हा प्रश्न पडतोच.... (त्यांना मध्येच थांबवत )

पुनम- अंग तुम्ही हे सर्व काय बोलत आहात?... तुम्ही आता जी नांव घेत आहात त्या सर्वजणीं मला माहीत आहेत. आपणच वाचलय त्यांच्या बद्दल पुस्तकांतून....   

अमृता - अनुताई वाघ - हो तुला आम्ही सर्व जणी परिक्षे पुरत्या आठवतो पण. आज ८ मार्च जागतिक महिला दिन रोजी निदान स्वतःच्या भाषणात तरी आमचा उल्लेख करणार होतीस का?

त्यांच्या या प्रश्नांच उत्तर पुनम देणार इतक्यात अलार्म वाजला आणि पुनम झोपेतून जागी झाली.. पहाटेचे ५ वाजले होते. म्हणजे ती आता पर्यंत स्वप्न पहात होती हे तिच्या लक्ष्यात आलं पण जे स्वप्नात पाहील तेच आज सत्यात आणायचा तिने निर्धार केला. पटापटा आवरून तयार झाली आणि बाकीच्या पाच जणींना फोन करून स्वप्नात तिने ज्या महान कर्तृत्ववान स्त्रियांची व्यक्तिरेखा पाहिल्या होत्या त्याच वेश-भूषा करून यायला तीने सांगितले आणि आज जागतिक महिला दिना दिवशी इतर महिला सोबत त्या पाचजणी ज्या व्यक्तिरेखाची वेशभूषा करून आल्या होत्या त्या सावित्रीबाई फूले, पंडिता रमाबाई, अनुताई वाघ, इरावती कर्वे, गोदावरी परुलेकर यांचा परिचय स्वतःच्या भाषणात करून देऊन त्यांचा सन्मान ही केला.

    'जागतिक महिला दिनाचा गौरव झाला '             

                       



Rate this content
Log in