मनी वसे ते स्वप्नी दिसे...
मनी वसे ते स्वप्नी दिसे...


मनी वसे ते स्वप्नी दिसे हे जरी खरं असलं तरी माझ्या बाबतीत मात्र फार कमी वेळा असं घडतं. एकदा असच थंडीचे दिवस होते आणि सगळं काही नियमीत सुरू होतं. तशी तितकी थंडी अजून पडली नव्हती. दुपारी दोनच्या दरम्यान कॉलेज मधून निघालो आणि ट्रेन पकडली. कॉलेज माटुंग्याला असल्यामुळे तसा अर्ध्या पाउण तसाच प्रवास ठरलेलाच आणि त्यात माझ्यासारख्या व्यक्तींना घोरायला रात्र कुठे लागते म्हणा. जिथे वारा तिथे झोप. तसं ट्रेन मध्ये झोपून झोपून अगदी वेळेवर बोरिवलीला जाग यायची सवय झालेलीच आता. तशीच लगेच बसल्या बसल्या झोप लागली. आणि का कुणास ठाऊक ट्रेन दोन स्टेशन पुढे जाण्यापूर्वीच मी परदेशात जाऊन पोहोचलो सुद्धा.
मी एकटाच एक कपड्यांची पिशवी घेऊन घरातून बाहेर निघा
लो तो थेट जाऊन पोहोचलो हिमालयात. एका एका स्टेशनच्या वेगाने तिथले एकेक दिवस सरत होते. पाच सहा दिवस होताच अचानक फार एकटं वाटू लागलं आजुबाजूला कुणीही नव्हतं प्रत्येक दिवसागणिक सोबतची माणसे कमी होत चाललेली, झाडं गायब होत होती, प्राणी नव्हते, पक्षी नव्हते, होतो तो फक्त मी. डोक्यावर आभाळ आणि पायाखाली कोरडी जमीन वर्षभर पाणी न मिळाल्यासारखी. आता नुसता विचार करूनही अंगावर काटा येतो कधीकधी. एका घरात होतो मी तिथे आणि त्या घरातून बाहेर पडल्यावर कुणीच नाही. रात्रीचा काळोख नाही सकाळचा उजेड नाही आणि मग अचानक धडकन जाग आल्यावर सगळं तसच होतं. बाजूला माणसं होती सोबत सूर्य होता. घासही कोरडा पडलेला त्या स्वप्नाने. अजूनही आठवतात अशी विचित्र स्वप्नं कधी कधी एकांतात.