पहिला सिनेमा...
पहिला सिनेमा...


अश्या फार कमी आठवणी आहेत ज्यात मी आणि मित्र एकत्र. कारण लहानपणापासूनच अभ्यासापुरतेच मित्र काय असतात हे माहीत होतं. म्हणजे मदत करतो तो मित्र ही एक साधी मित्राची व्याख्या. पण बारावीनंतर कॉलेज बदललं संगत बदलली तसेच मित्रही बदलले मुळात मित्र म्हणजे नक्की काय हे कळू लागलं. पाहिल्या वर्षी तसाच मी मित्रांपासून लांब पण कॉलेजचे संस्कारच म्हणावे लागतील की त्यांनी मला कधीच लांब नाही ठेवलं. कॉलेजच्या दुसर्या वर्षापासुन मित्रांसोबत राहणं वाढू लागलं आणि हळूहळू एक कुटुंबच तयार झालं आमचं.
तशीच एक आठवण म्हणजे सहामाही परीक्षा झाल्यावर आम्ही पुन्हा एकत्र भेटलेलो. परीक्षा झाली होती एवढचं निमित्त, पण भेटायचं होतं. काय करायच काहीच ठरलं नव्हतं म्हणुन शेवटी सगळ्यांना मी माझ्याच घरी बोलावलं आईने सुंदर दहीवडे बनवलेले. घरचा पाहुणचार झाल्यावर आम्ही ठरल्याप्रमाणेच सिनेमा बघायला गेलो. आता सिनेमा बघायला जाणं हे आत्ताच्या जमान्यात काही वेगळं नाहीच पण माझ्यासाठी खूप स्पेशल होतं कारण मित्रांसोबत बघितलेला तो माझा पहिला सिनेमा होता. त्यामुळे ही आठवण आयुष्यभर मनाच्या एका कोपर्यात कायम असेल.