कविता
कविता


मी अकरावीत असल्या पासून लिहायला सुरुवात केली. अकरावीत मी कॉलेजच्या वार्षिक अंकासाठी एक चार कडव्यांची कविता लिहिली होती. तेव्हापासुन मग हळूहळू एकेक कविता लिहीनं सुरूच झालं.
एक दिवस असंच गाणी ऐकता ऐकता सलील कुलकर्णींच एक प्रसिद्ध गाणं रेडियो वर लागलेलं ते म्हणजे 'दमलेल्या बाबांची कहाणी' . मी अक्षरशः रडलेलो गाणं संपल्यावर. आणि का माहित का पण त्या गाण्यात वेगळं असं काहीच नव्हत आणि कठीणही नव्हतं. साधी सरळ आपण बोलतो अशी मागणी भाषा पण व्यक्तीच्या मनाला हात लावणारी प्रचंड शक्ति आणि ह्या गोष्टी निर्माण होण्यासाठी फक्त प्रतिभाच असावी लागते. हे मी अजूनही मान्य करतो. त्यानंतर मी युट्यूब वर त्यांच्या जवळजवळ सार्या मैफिली पालथ्या घातल्या आणि त्यांचा तो भाषेचा खेळ खोलवर मनात रुजला. त्या कवितेने प्रेरित होऊन मग मीही त्याच कवितांच्या जवळ जाण्याचा अजूनही प्रयत्न करतोय