सार्थ
सार्थ
मला नेहमी असं वाटत की निर्णय घेण्यापेक्षा तो सार्थ ठरवण्यात जास्त वेळ घालवावा. माझ्याही आयुष्यात असे अनेक प्रसंग ज्यातून पुढे गेल्यावर कळलं की मी हा निर्णय का घेतला याच उत्तरच नाहीये माझ्याकडे. पण तो निर्णय योग्य ठरविण्यासाठी योग्य वेळ आणि प्रयत्न देता आले तर मग कधीच खंत वाटत नाही. विचार न करता घेतलेल्या त्या निर्णयाचा.
मी असा घेतलेला निर्णय म्हणजे बारावी नंतर जी वेळ सगळ्याच विद्यार्थ्यांसाठी कठीण आणि महत्वाची असते. परीक्षा संपून महिना झाला तरी माझं काही ठरत नव्हतं. म्हणजे तसे पर्याय बरेच होते आणि माझे माझे असे ठरवूनही झालेले पण पुढे काय ह्या प्रश्नातून मिळणारं उत्तर समाधानकारक नव्हतं. वाणिज्य शाखेतून बारावी दिलेली. त्यात मी आधीच ठरवलेलं की काही झालं तरी बारावी नंतर मोठ्या कॉलेज मध्येच जायचंय. आणि सुदैवाने मार्कसुद्धा तसे बरे मिळाले. मग मोठ्ठ कॉलेज हव चांगले मित्र हवे म्हणुन आयटी ला प्रवेश घेतला. पुढे काय कसं काहीच माहित नव्हतं पण ठरवून झालेलं. पण आता मागे वळून पाहताना खूप बर वाटत. तसा अजून बराच पल्ला गाठायचा बाकी आहे पण त्या कॉलेज मुळे चांगले शिक्षक चांगले मित्र मिळाले आणि महत्वाचं म्हणजे छंद जोपासायला प्रोत्साहन मिळालं. त्यामुळे घाईघाईत घेतलेला तो महत्त्वाचा निर्णय नेहमीच लक्षात राहील.