किशोर राजवर्धन

Romance

5.0  

किशोर राजवर्धन

Romance

मनी मल्हार #5

मनी मल्हार #5

5 mins
645


5(I)

अनंत चतुदर्शीच्या दिवसानंतर मनी मल्हार वेगळे होऊन आठ महिने झाले होते. त्याने जणू स्व:ताच्या आयुष्य गाणचं स्टॉप केलं होतं. प्रेमाची साक्ष देणा-या मनीच्या आठवणीत तिने घेतलेल्या निर्णयाच्या कारणांची कल्पक मांडणी करुन त्या आठवणीत अडकुण कोणाशी काही न बोलत नुसत गप्प गप्प राहु लागला होता.. कोणतीच नवीन ऑर्डर घेतली नाही किंवा तो घराबाहेरही पडत नव्हतां. त्याने स्व:ताला स्व:ताच्या रुममध्ये बंद करुन जणु काही जगाशी संबंधच तोडला होता. त्याला विरहातुन बाहेर काढण्यासाठी आई, नातेवाईक , मित्र मंडळी सर्वच प्रयत्न करत होते. पण मल्हार मनीला मोबाईलवर कॉल रिडाइल करुन-करुन तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न करत असे, की कधीतरी ति कॉल उचलेल आणि त्याच्याशी बोलेल. पण तसं काही घडत नव्हतं. शेवटी त्याला ह्या विरहातून बाहेर काढण्यासाठी संघर्षीने त्याला भेटण्याच ठरवलं…..

आज संघर्षी मल्हारच्या घरी आली. तिने मम्माला मल्हार बदल विचारलं त्यांचे डोळे ओलावले होते. त्यानी काही न बोलता मल्हार रुम मध्ये असल्याचा इशारा केला. तिने नॅक करुन गोड स्मित करत त्याच्या रुम मध्ये प्रवेश केलां. तिने मनीचा फोटो पाहत अश्रू गाळत असलेल्या मल्हारकडे पाहिलं. त्याच्या जवळ जात त्याचा हात हातात घेत त्याच्या अश्रू मुखाकडे पाहिल त्याची मनोवृत्ती पराभुत झाली होती. त्याच्या चेह-यावर आत्मविश्वासाचा अभाव होता. त्याला ह्या नकारात्म विचारांच्या गर्ततेतुन बाहेर काढण्यासाठी तिने त्याच्याशी संवाद सुरु केला. ती म्हणाली

“ मल्हार प्लिज… बाहेर पड ह्या विरहातुन… मनी आता पुन्हा येणार नाही..” मल्हारने तिच्याकडे को-या नजरेनं पाहिल. आणि पुन्हा मोबईलवर मनीच्या फोटेकडे पाहु लागला. ति पुढे बोलु लागली “ मी मनीच्या घरी गेले होते. पण तिथे आता ते राहत नाही. त्यांच्या शेजा-याकडून कळलं की, त्यांनी मुबंईतलं घर विकलं आणि आता ते कोल्हापुरात त्यांच्या गावी शिफ्ट झाले आहे. मनीच सहा महिन्यापूर्वी एका सॉफ्टवेअर इंजिनिअर मुलाशी लग्न झालं आहे. लग्नानंतर ते दोघे ही न्युयॉर्कला शिफ्ट होणार होते. येव्हाना झाले ही असतील. तिच्या लग्नाबद्दल तुला कळु नये म्हणुन तिने कोणत्याही मित्र – मैत्रिणीला कळवलं नाही. अगदी मला सुध्दा..! , मी तिचा फोन ट्राय केला पण स्विच ऑफ आहे. कदाचित तिने नंबर चेंज केला असेल..”

मल्हारने संघर्षीला पाहण्यासाठी नजर उचली आणि रडक्या स्वरात म्हणाला

“संघर्षी मी नाही जगू शकत तिच्या शिवाय… मी तिला म्हंटल होत की, घरच्यांना सांग ह्या बदद्ल… आम्ही नात्यात खुप पुढे निघुन आलो होतो..पण मध्येच…हे असं झालं..”

त्याला पाहून तिचा ही ऊर भरुन आला. आणि डोळ्यात पाणी दाटून आले. पण स्व:ताला सावरत ति त्याला म्हणाली

“ हे.. बघ..! एक व्यक्ती आयुष्यातुन गेल्यामुळे आयुष्य असं थांबत नाही. तु कधी विचार केलास का..? तुझ्या अशा वागण्यामुळे मम्माला किती त्रास होतोय आणि तुझ्या शिवाय दुसरं कोण आहे का..? आता..! ”

त्याला धीर देत तिने पॉकेट मधुन विझिटिंग कार्ड काढलं. ते त्याला देत म्हणाली

“ हे..आमदार आहे. ह्यांना भेट…! त्यांना वाढदिवसाची पार्टी ऑर्गनाइज् करण्याकरिता ऑर्गनाइज्र हवा आहे.. तुझ्या करियरच्या दृष्टीकोण पाहता.. ही योग्य संधी आहे… प्लिज बाहेर पड ह्यातुन..”

मल्हार तिच्या पासुन दुर होत म्हणाला “नाही..! संघर्षी तुला कळत कसं नाही.. माझं म्हणं…”

“ प्लिज तु जा….! मला एकट सोड… ”

संघर्षीला जाणवल की मनी सोडून गेल्यामुळे मल्हारच्या मनात त्या दु:खाची मुळे फार खोलवर रुजली आहेत. तिचा ऊर भरुन आला आणि डोळ्यात दाटुन आलेल्या अश्रुचा बांध फुटला. त्याच्याकडे पाहत ती म्हणाली “ तुला असं जळताना पाहुन , मी कशी जगु…! ”

मल्हारने तिच्याकडे प्रश्नार्थक नजरेनं पाहिलं..

संघर्षीच्या डोळ्यातुन अश्रुधारा वाहात होत्या त्या थांबवतं तिने त्याच्या प्रेमाने पाहिलं आणि बोलण्यास सुरुवात केली

“ मल्हार माझं तुझ्यावर प्रेम आहे…! केव्हापासुन माहित नाही. तुला आठवतयं लहानपणी मला सायकल चालवायला येत नसायची. सर्व मला चिडवायचे. मी रडु लागले की , तु माझे अश्रु पुसत माझ्यात सायकल चालवण्याबाबत विश्वास निर्माण करायचा आणि म्हणायचा की, तुला एक दिवस ह्या सर्वांन पेक्षा चांगली सायकल चालवायला येईल. पण ति कधी आलीच नाही. सायकल चालवाताना माझा अपघात झाल्यापासुन तु माझी स्व:तापेक्षा जास्त काळजी घ्यायला लागलास. कॉलेजच्या पहिल्या दिवसापासुन तु मला तुझ्या बाईकवर सोडवायला आणि कॉलेज सुटायच्या आगोदर मला घरी नेण्यासाठी उभा राहयचास. नंतर आमच्या मुलींचा ग्रुप झाला आणि मीच तुला म्हंटल नको येत जाऊ करियरकडे लक्ष दे…आणि तु ते गुमान ऐकलसं त्यानंतर तु येण बंद केलस. तुझ्या DJ च्या ब्रँडसाठी तु प्रयत्न करुन ही तुला ऑर्डर मिळत नव्हती. मी पप्पांना सांगितलं आणि तुला जयंतीची ऑर्डर मिळवुन दिली. त्या दिवशी तु मला मिठी घेतलंस आणि म्हंटल “संघर्षी युअर माय बेस्ट फ्रेंड.. तुझ्यासाठी काहीपण…. ” मी आपल्या बालपणी आठवणींचा मागोवा घेत हळूहळु तुला समजुन घेउ लागले आणि तु मला आवडू लागलास. पण मनी आणि तुझी भेट झाली आणि तु तिच्या प्रेमात वाहत गेलासं.. तुम्हां दोघांना जेजुरी गडावर उतरताना पाहुन मला पहिल्यांदा ह्याचा भास झाला आणि माझ्या जिवलग मैत्रिणी बदल मला जेलेसी वाटु लागली. मी त्याकडे दुर्लक्ष केलं आणि तुम्ही दोघ खुष आणि आनंदी राहावे म्हणुन मी दोघांपासुन दुर होत गेले आणि स्व:ताला अभ्यासात गुंतुन घेतलं….पण असं अनपेक्षित काही घडेल, असं वाटल ही नव्हतं. मी मनीला ओळखते. तिने हा निर्णय घेण्या आगोदर विचार केला असणार , तिच्या ह्या निर्णयामागे नक्कीच काहीतरी कारण असेल…….” तिचे शब्द थांबले आणि हुंदके देत पुन्हा तिच्या डोळ्यातुन अश्रू वाहू लागले.. ते पुसत ती मागे वळून रुम मधुन बाहेर निघाली.. मल्हार तिच्या जाण्याच्या वाटेकडे एकट पाहत होता…



5(II)

संघर्षी मल्हारला भेटुन दोन दिवस झाले होते. संघर्षीने दिलेल्या विझिटिंग कार्डकडे पाहत. मल्हार तिच्या बोलण्याचा आणि अश्रूंचा विचार करत असताना त्याच लक्ष समोर भिंतीवर असलेल्या पेंटिगकडे गेलं. सम्राट अशोक युध्दात विजयी झाल्यानंतर त्याचा परिणाम पाहुण बुध्दांच्या चरणी नतमस्तक झालेल्या क्षण आणि संघर्षीच्या बोलण्याचा त्याच्या मनावर परिणाम होत होता. त्याच्या मनाने विरहतुन बाहेर पडून स्व:ताच्या करिअरच्या दृष्टीकोणातुन मिळणा-या संधीचा कसा उपयोग करायचा ह्याचा विचार करण्याकडे आपल लक्ष केंद्रीत करण्यास सुरवात केली. अलगत त्याची नजर पेंटिगच्या खाली लिहिलेल्या शब्दांवर गेली. “ नि:संदेह बुध्द हा जगाचा प्रकाश आहे.” डोक्यात विचारांच्या प्रकाश पडल्याचा अनुभवत तो रुमच्या बाहेर आला. मम्मीच्या मिठीत शिरत कोमल स्वरात मम्मीला म्हणाला “मम्मा Soory…..!”

रुम मध्ये येऊन बेडवर विझिटिंग कार्डमधील ऍड्रेसकडे पाहिल. बाजुला मनी मल्हार च्या प्रेमाची डायरी त्याला खुणावत होती….त्याने डायरी हातात घेतली…..डायरीतलं पेज टॅगमधलं पानं उघडलं… मनीने पूर्ण केलेली कविता आणि त्याखाली तिने लिहिलेले शब्द फक्त तुझीच मनी त्याला बोटांचा स्पर्श करत असताना त्याच्या मनातुन अश्रूचा एक थेंब ओघळत येऊन डायरीतल्या पानामधील मनीच्या नावावर ठिपला….ति बंद करत त्याने विझिटिंग कार्ड खिश्यात ठेवुन प्लसरची किल्ली घेतली..आणि मम्माला “ मी येतो ” म्हणाला. मम्माने “संभाळून जा..!” म्हणंत त्याच्या रुपावरुन हात फिरवत त्याच कौतुक केलं. घराबाहेर येऊन त्याने पार्किंग मधुन प्लसर बाहेर काढली आणि स्टार्ट करत… विझिटिंग कार्डमधील ऍड्रेसकडे , आयुष्यात पुढे वाटचाल करण्यासाठी त्याने स्व:ताला रेस देत पुढचा गेअर बदला…………..



Rate this content
Log in

Similar marathi story from Romance