Best summer trip for children is with a good book! Click & use coupon code SUMM100 for Rs.100 off on StoryMirror children books.
Best summer trip for children is with a good book! Click & use coupon code SUMM100 for Rs.100 off on StoryMirror children books.

Meenakshi Kilawat

Romance


4.6  

Meenakshi Kilawat

Romance


मनात ला पाऊस

मनात ला पाऊस

3 mins 1.1K 3 mins 1.1K

माझ्या मनातला पाऊस कसा हरित रसरशीत हिरवळीच्या रुपात फुलांच्या रूपात मला मोहवित असतो. पशुपक्ष्यांच्या मधुर गोड आवाजात मला माझ्या भावभावनांचा विसर पडतो. भावनांच्या या महासागरातून मला हा पाऊस अलगद बाहेर काढतो. मी माझ्या मनात असंख्य स्वप्न बघते त्यात मी असंख्य क्षितिज पावसाने ओलेचिंब झालेली बघते.पावसाने पुर्ण प्रकृती कशी हिरवागार होऊन माझ्या पुढ्यात उभी राहते. मी त्याचे दर्शन करते व मनसोक्त आनंद घेते.आणि गुणगुणत अमिताभचे हे गाण नकळत ओठावर येतेय.


 "रिमझिम गिरे सावन, सुलग सुलग जाये मन

 भीगे आज इस मौसम में, लगी कैसी ये अगन"


 जेव्हा मी बघते सृष्टीत कुठे आनंद तर कुठे दु:खद परिस्थिति असते.गरीबाच्या कुडाच्या झोपडीत चहूकडे पाणीच पाणी असते, व पाय ठेवायला जागा नसते. कुठे नदीला पाणीच नाही तर कुठे काठोकाठ ओथंबून वाहते. चारीकडे पाणीच पाणी असते.कुठे कुठे रात्रंदिवस पाऊस पडतोय आणि कित्तेक दिवस पाणी कमी होत नाही तेव्हा लोकांच्या तहान-भूका मरतात. या तीरावरून त्या तीरावर जायला काहीच पर्याय नसतो तेव्हा मला प्रिय पावसाची ही करनी बाधक, कष्टदायी भासत असते. या पावसाचा मनातून राग येतो . मनातून चीढ निर्माण होत असते.हां पाऊंस जेव्हा सारी कड़े हाहाकार मचवितो पशु पक्षी तडफडून मरतात, प्राणी मात्र गोठ्यातच थिजतात, खाणेपिणे मुहाल होवून बेकारी वाढते .मजूरी मिळत नाही आणि लोकांच्या डोळ्यातून अश्रूच्या धारा पावसाबरोबर वाहून जातात तेव्हा मी 

मनातून हादरते.आणि मला "शोर"सिनेमाचे है गीत आठविते.

  "पानी रे पानी तेरा रंग कैसा

  "भूखेकी भूख और प्यास जैसा"

    ही कशी अधोगती होती आहे.आणि माझे हृदय आत्मचिंतन करीत असते .ही मेघ मल्हार मला काळासारखी भासतात मला पक्ष्यांच्या आवाजात रुदन ऐकायला येतं प्राण्यांचे जीव संकटात सापडून वेगवेगळे आवाज त्यांच्या गोठ्यातून येतात .नवीन नवीन सृष्टी किती जीव जंतूला मारून हा पाऊस सृष्टीवर चैतन्य पसरवितो या पावसाविना काहीच शक्य नसते या पावसाविना मनुष्य प्राणीमात्र काहीच करू शकत नाही.जेव्हा मनुष्यप्राणी उन्हाच्या काहिलीने होरपळून जातात तेव्हा अशे हे पृथ्वीवरचे अमृत माणवाला त्राहि-त्राहि करून सोडतात .येणाऱ्या पावसाची वाट पहात असताना नुसती दमछाक होत असते. जसजसा पृथ्वीवर पाऊस पडतो तसतसे मनात तरंग फुटतात नदी नाले खळखळ वाहायला लागतात झरणे फवारे उडू लागतात धरणे,तलाव दुथडी भरून वाहायला लागतात सागरात नद्या जाऊन मिळतात तेव्हाच खऱ्या पृथ्वीची क्षूधा शांत होत असते. जमिनीतल्या भेगा भरून भुमाता जेव्हा शांत होते तेव्हाच बळीराजा सुखावून शेती करण्यास धजावतात.तेव्हाच अन्नधान्य आपल्याला खायला मिळत असते.माझ्या मनातला पाऊस हा सारखा विवंचनेत असतोय तो सतत का येत नाही तो आपल्या सर्वांच्या मनामनाची परीक्षा का बघत असतो या सूर्याच्या उष्णतेपासून आपणास सदोदित सावली का देत नाही असे सारखे प्रश्न मी मनाला विचारत असते.

     त्याचे कारण मला सापडलेले आहे आज जिकडे तिकडे प्रगती होत आहे त्या प्रगतीच्या मार्गावर वृक्षांना आपली बली द्यावी लागत आहे हजारो वर्षा आधीचे झाडही तोडल्या जाऊन तिथे मोठमोठे बिल्डिंग्स मॉल तयार होत आहेत.चौपदरी रोड,रेल्वे रूट,कारखाने झाले आहेत.देशाची तरक्की ही होनारच आहे, त्यासाठी वृक्ष ही तोड़नारच आहेत ,आणि ही गोष्ट सर्वांना माहीत असून सुद्धा वृक्ष तोडल्याशिवाय पर्याय नाही. देशाच्या तरक्की साठी वृक्षांचा ऱ्हास होत आहे. तसेच पाऊस येण्यासाठी आपल्याला वृक्षवल्लीची खूपच गरज आहे ही गोष्ट आपले जीवन वाचवू शकते पण त्यासाठी वृक्षारोपण करावे लागेल आहे.प्रत्यकी दोन तरी वृक्ष पूर्ण निष्ठापूर्वक लावण्याचा आपण प्रयत्न करायला पाहिजे. मी कैक वर्षाआधीच वृक्ष लावायला सुरुवात केलेली आहे.ती वृक्ष आज मला भरघोस फूलेफळे देत आहे. ती वृक्षवल्ली माझ्या मनात आनंद देऊन जातात माझं सुखदुःख जाणून घेतात माझ्याशी ती बोलतात सुद्धा,मी निरनिराळी अनेक प्रकारची वृक्ष लावली आहेत. त्यात रंग बिरंगी फुले फळे लागलेली आहेत.ती वृक्ष माझ्या मनाला उल्हासाने भरतात. आणि मला भरभरून आनंद देतात. त्यांचे रोजच आभार मी मानत असते. Rate this content
Log in

More marathi story from Meenakshi Kilawat

Similar marathi story from Romance