मी महात्मा गांधी बोलतोय....
मी महात्मा गांधी बोलतोय....


मी, गांधी. कोणी महात्मा म्हणतं, कोणी बापु. मिस्टर गांधी म्हटलेलं मला जास्त आवडायचं कारण हे संबोधन दिले होते ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी. मला वाटायचं मी राष्ट्रपिता, मी बापु पण अस्पृश्यांचा खरा बाप होता तो बाबा साहेब. याची प्रचिती मला आली ती १९३२ ला. याच वर्षी माझा पुनर्जन्म झाला असे मला वाटते.
माझे उपोषण शस्त्र मी आंबेडकरांवर पुणे करारा साठी वापरले, मात्र ते माझा अखेर करणार की काय असे वाटत होते. मात्र डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी करारावर स्वाक्षरी केली आणि मी स्वातंत्र्य पाहण्यासाठी जीवंत राहीलो.
भारताला स्वातंत्र्य देण्यासाठी प्राथमिक हालचाल म्हणून गोलमेज परिषदा लंडनला होत होत्या. दुसरी गोलमेज परिषद संपली. आंबेडकरांनी अस्पृश्य समाजासाठी विविध मागण्या मांडल्या मतदानाचा अधिकार मागीतला. मला वाटलं मी या समाजाला हरिजन नाव दिल्याने समस्या सुटतील मात्र खरी जाणीव होती ती आंबेडकरांना.
अस्पृश्यांचा बाप- आमचा बाप, आमच्या साठी काही घेवून आला म्हणून २९ जाने. १९३२ ला मुंबई बंदरात देशवासीयांनी काय गर्दी केली होती! लंडन पर्यंत ही राजकीय बाब गेली अन् निवाडा साठी लंडनहून लॉर्ड लोथियन आले. लोथियन समितीने देशभर दौरा केला अन बाबासाहेब त्याच वेळस देशाचे बाबा झाले. प्रत्येक ठिकाणी त्यांचा जयजयकार होत होता.
त्यांच्या महत्वाच्या मागण्या होत्या अस्पृश्यांना दुहेरी मतदान अधिकार आणि स्वतंत्र
मतदार संघ. जर त्या समितीने या मागण्या मान्य केल्या तर..
राजकिय वातावरण तापले, पुढे मला केले अन् १९ सप्टेंबर १९३२ ला पुण्यात उपोषण सुरु करण्या आधी आंबेडकरांना या मागण्या मागे घेण्याची विनंती केली, करारी आंबेडकर समाजापुढे व देशापुढे कोणाचाच विचार करणार नव्हते. २० सप्टेंबर ला मी उपोषण सुरू केले वयामुळे प्रकृती ढासाळली वातावरण तापले. तीनच दिवसात अस्पृश्य समाजावरही हल्ले होवू लागले. अखेर समाजच राहीला नाही तर?
बाबासाहेबांना २४ सप्टेंबरला शनिवारी पुणे करारावर स्वाक्षरी करावी लागली. १४८ जागा राखीव व आणखी १०% जागा निश्चित झाल्या. निघताना आंबेडकर मला "या वयात शरीराला त्रास देवू नका." म्हणाले. मी हारलो होतो का? माझीही एवढी काळजी? राष्ट्रभक्त हेच तर होते अन् माझी काळजी घेवून माझेही ते बाबा झाले.
काळाच्या ओघात स्वातंत्र्य मिळून माझा खून झाला तेंव्हा सर्वाधिक दुःख याच बाबाला झाले होते. असो. माझ्या आयुष्यात असे अनेक प्रसंग आले राजकीय दबावात निर्णय घेताना खरंच मी चुकलो का? मात्र आज वाटतं काळ बदलता आला असता तर?
त्या मागण्या मी मान्य केल्या असत्या तर. त्या त्या वेळचे तसे निर्णय घ्यावे लागतात.
आज तुम्हीं माझा जन्म दिन साजरा करताय, त्या गडबडीत मला नव्या जन्माची देणगी देणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची ही आपण आठवण ठेवावी म्हणून मन मोकळं केलं, आता बरं वाटतयं.