स्वादआस्वाद komal's kitchen's

Romance Inspirational

4.0  

स्वादआस्वाद komal's kitchen's

Romance Inspirational

मी खंबीर झाले म्हणून...

मी खंबीर झाले म्हणून...

6 mins
307


        आधुनिक काळातील स्त्रीच चूल आणि मुलं यातच आयुष्य होतं. कारण तशी बंधने स्त्रीला लागू केलेली होती,आणि त्याबरोबरच शिक्षणाचा अभाव होता. त्यामुळे स्त्रियांकडून तशीच अपेक्षा ठेवली जात होती. प्रिया ही तशीच होती.संसारात रमणारी जेमतेम शिक्षण झालेली मध्यम वर्गीय मुलगी.

शांत, सुशील मुलगी आणि तिला साथ देणारा राहुल तिचा जोडीदार तिचा प्राण होता. दृष्ट लागण्यासारखा संसार दोघे करत होते. राहुल ही हुशार कर्तृत्ववान, चांगले शिक्षण झालेला त्याचा खूप मोठा व्यवसाय होता.


राहुल हुशार असल्यामुळे प्रिया ही कधी व्यवसायात पडली नाही. त्यामुळे तिला व्यवसायतले कसलेच ज्ञान नव्हतं. कारण तिलाही कधी तशी वेळ आली नाही. राहुल तिला हाव नको ते सगळं तिच्यासाठी करत असे. तिला कशाचीही कमतरता भासत नसे. घरात खाण्यापिण्यासाठी काही कमी नव्हतं, असेच त्यांचे दिवस आनंदात चालेले होते. एक दिवस प्रियाला खूप अस्वस्थ वाटत होतं. सारखी मळमळ आणि उलटी सारख होत होतें . तसं ती नवऱ्याला म्हणजे राहुल सांगतेही.


        राहुल लगेच डॉक्टरना फॅमिली डॉक्टरांना घरी बोलवतो. प्रिया ला दिवस गेल्याच समजत पण डॉक्टर काळजी घेण्याचं सांगतात. प्रिया आणि राहुलला बातमी समजताच दोघेही खूप आनंदी होतात. राहुल आता प्रिया चे सगळे लाड पुरवत असतो. तिला जे खायचय ते तिला आणुन देत असतो. एक दिवस गावावरून राहुल चे आई वडील सुनेला भेटायला, तिच्या तबेतीची चौकशी करण्यासाठी येतात. प्रिया ही राहुलच्या आई वडिलांची एकुलती एक लाडकी सून असते. सासू सासऱ्यांना पाहताच प्रियालाही खूप आनंद होतो . त्यांना दारात पाहून त्यांचा लगेच आशीर्वाद ही घेते. तिच्या सासू सासर्यांचे दिवस मजेत जात असतात. त्यांच्यासाठी रोज नव नवीन पदार्थ ती करत असते. त्यांच्यासाठी करायला ती कधीच थकत नसते. ते दोघेही सुनेचे कौतुक करायला थकत नसत . त्याचेही दिवस आनंदात जात होतें.


सासू ही प्रियाला घरातील कामाला हातभार लावत असत . तिची काळजी घेत असत .दोघी मायी लेकीसारख राहत होत्या , पण तिच्या सासू सासर्यांना दोघांना शहरांत करमत नसे. शहरांत त्यांना कोंडतल्यागत होत असे, आणि त्यांना मोकळ्या वातावरणlत राहायची सवय होती.

त्यामुळे त्यांनी परत जाण्याचा निर्णय घेतला. प्रिया जरा नाराज झाली, दोघांनी तिची समजूत काढली, परत येऊ नातवाला पाहायला असेही ते बोलले. प्रियालाही हसू आलं, त्यांच्या पाया पडून त्यांचा आशीर्वाद घेतला आणि त्यांना हसून निरोप दिला.ते गावाला निघून गेले.


प्रिया ला बघता बघता नववा महिना लागला होता , आता ती खूप स्वतःची काळजी घेत होती. योगा मेडिटेशन ही करत होती. तिला आता खूप दडपण आल्यासारखं होत होत. कारण डिलिव्हरी ची तारीख जवळ आली होती. मधून अधून तिला आता अस्वस्थ वाटत होतं . राहुल ने ही घरात कामाला बाई ठेवली. जेणेकरून प्रिया वर ही लक्ष राहील, आणि तिला आराम ही मिळेल. संध्याकाळी 7वाजता तिच्या खूप पोटात दुखू लागलं. तिला काय कराव काही सुचत नव्हतं. कामवाली बाई नुकतीच घरी गेली होती.


तिने पटकन राहुल ला बोलवून घेतलं. तिला दुखणं आता सहन होत नव्हतं. तीचे डोळे रडून सुजलेले होते. राहुल ला बघून तिला जरा बर वाटलं.

तिला लगेच हॉस्पिटल मध्ये ऍडमिट करून घेतलं. डिलिव्हरी ची वेळ सकाळची 5 वाजताची दिली. रात्रभर प्रियाला खूप त्रास होत होता. रात्र कधी संपते ती याचीच वाट ती बघत होती.अखेर सकाळी 4.30 वाजता तिची डिलिव्हरी झाली . तिला जुळे मूल झाली होती.


एक मुलगा आणि एक मुलगी. दोघांनाही जुळी मुलं बघून डोळ्यात आनंदाश्रू आले . दोघेही खूप खुश झालें. नॉर्मल डिलिव्हरी मुळे तिला लगेच घरीही सोडण्यात आले. आता जुळ्या मुलाचं संगोपन करताना दिवस कसे पटापट जात होते.


प्रिया आता घरातल्या कामातच गुंतली गेली होती, पण आता रोजच्या कामामुळे तिला कंटाळा आला होता. तिची चिडचिड ही खूप वाढली होती.

आता तिची मुलं 3वर्षाची झाली. त्यांना आता शाळेमध्ये टाकल्यामुळे तिला आता जरा निवांत वाटत होते. मुले आता मोठी होत होती. प्रिया आता चांगली संसारात रमलेली. तिला आता घर म्हणजेच स्वर्ग वाटत होत. त्यामुळे ती घर मुले, नवरा यामध्येच ती तीच कर्तव्य छान पार पाडत होती. दिवसेंदिवस संसार छान फुलत होता.


दोघांचे एकमेकांवरील प्रेम थोडेही कमी झालें न्हवते. पण या संसाराला कुणाची तरी दृष्ट लागली. एक दिवस अचानक कॉल आला. राहुल च्या कारला जोरात ट्रक ची धडक बसली,आणि त्याच्या डोक्याला खूप मार लागला आहे. C.T हॉस्पिटल मध्ये त्याला ऍडमिट केलय. प्रिया धावतच हॉस्पिटल मध्ये गेली. तीच भान जाग्यावर राहिलेलं नव्हते. रडून डोळे सुजलेले होते . तिला काय कराव सुचत नव्हतं. ती डॉक्टरांना राहुल बदल विचारायला जाते. पण डॉक्टर त्याची वाचण्याची शक्यता कमी असे सांगतात, तरी आम्ही प्रयत्न करू. डॉक्टर च्या अशा बोलण्याने तिची पायाखालची जमीन सरकते. ती हॉस्पिटल मध्ये गणपती च्या फोटो ला हात जोडते, देवाला विनवण्या करते कि माझ्या नवऱ्याला वाचव.


दुसऱ्या दिवशी सकाळी सहा वाजता राहुल च मेंदूच ओप्रेशन असत. इकडं प्रिया अजून दैवाचा धावा करत असते. सकाळी ऑपेरेशन करून डॉक्टर बाहेर येतात. प्रिया पळतच डॉक्टरांकडे जाते.

प्रिया, "राहुल कसा आहे, डॉक्टर

डॉक्टर, "ऑपेरेशन यशस्वी झाले, पण राहुल ला शुद्ध आली कि समजेल .. !


संध्याकाळी 7वाजता राहुल ला शुद्ध येते. पण तो वेगळंच काहीतरी बरळत असतो. त्याला बायको मुलं ही आठवत नाही. प्रिया त्याच्याकडे जाते तर तिलाही ओळखत नाही. त्याची परिस्थिती पूर्ण बदलेली असते. प्रिया समोर नवीनच संकट उभं राहत. त्याला घरी सोडतात पण तो पूर्ण वेड्या सारखा वागत असतो. प्रिया त्याला खूप आठवन करून देण्याचा प्रयत्न करते, ते पूर्ण निष्फळ ठरते. प्रिया पूर्ण खचलेली असते. तिला आता तिचा संसार, मुलं आणि नवरा यांचा सांभाळ करायचा असतो. तिच्यावर खूप मोठी जवाबदारी येऊन पडलेली असते. तिला कसलंच व्यवहारी ज्ञान, नवऱ्याचा व्यवसाय यातला काही माहित नसत.


ती एक मध्यम कुटुंबातील मुलगी असते. चूल आणि मुलं यापलीकडे तिने जग कधी पाहिलंच नसत. आता ती पूर्ण घाबरून गेलेली असते. सासू सासरे तिच्या बरोबर असतात, तिला ते धीर देतात. ती राहुलचा व्यवसाय सांभाळण्याचा निर्णय घेते. सुरुवातीला तिला खूप त्रास होत असतो. तिला राहुल ने घेतलेले लोन , तसेच त्यांने खूप जणांना पैसे उधार पण दिलेले असतात, त्याचा बँक बॅलन्स, याबाबत तिला काहीच माहिती नसते. तसेच लोकांचा, समाजाचा तिच्याकडे बघण्याचा दृष्टीकोन ही बदलेला असतो .


सुरुवातीला तिच्या भोळ्या स्वभावामुळे तिची पैशाच्या बाबतीत खूप फसवणूक होते. व्यवसाय करताना कोणाकडे काय मागवायचे...! बिल कस चेक करायचं...!, पैसे मोजणे या छोट्या गोष्टीही तिला खूप अवघड वाटत असतात. काही दिवसाने राहुल चा जवळचा मित्र वरून भेटायला येतो . राहुल ची अवस्था बघून त्याला रडू आवरत नाही. तो राहुलचा लहानपणीचा लंगोटीयार होता. दोघे शाळेत, कॉलेज ला एकत्र होतें. प्रिया त्याच्यासाठी पाणी घेऊन आली . तशी प्रियाची आणि त्याची दुसऱ्यांदा भेट होती. त्याला बघून प्रियाला ही रडायला आलं. त्याने प्रियाला समजावून,धीर देऊन शांत केलं . तिने त्याला मदत मागितली होती . तिला व्यवसाय सांभाळताना किती त्रास होतोय, हेही ती त्याच्याशी बोलली.


त्यामुळे वरून ने 2 दिवस थांबण्याचा निर्णय घेतला होता. त्याने तिला व्यवसाय, बँकेची माहिती प्रिया त्याच्याकडून शिकून घेते. दोन दिवसांनी वरून त्याच्या गावी निघून जातो. प्रियाला त्याच्यामुळे जरा आत्मविश्वास आलेला असतो. तिच्या पाठीशी सासू सासरे पण खंबीर उभे राहतात. ती आता आत्मविश्वासाने व्यवसाय सांभाळत असते, आणि काही दिवसात ती आत्मविश्वासाने घर मुलं सांभाळून मोठी बिसिनेस वूमन होते. तिलाही तिच्यावर विश्वास बसत नाही. आपण साधी गृहिणी आपण एवढे मिळवले.


तिच्या डोळ्यात आनंदाश्रू येतात.ती पळतच नवर्याकडे जाते आणि त्याच्या गळ्यात पडून खूप रडते. पण त्याला जराही शुद्ध नसते. तो त्याच्याच विश्वात रमलेला असतो. ती मनातच बोलते "राहुल किती खुश झाला असता....!!"मला असं पाहून.


राहुल त्याच्याच तंद्रीत असतो, त्याला पूर्ण जगाचा विसर पडलेला असतो. तिला नवऱ्याची अशी अवस्था पाहून आणखीनच रडू कोसळते. आयुष्य म्हणजे सुख दुःख चा चढउतार . कधी कोणते वळण घ्यावे लागेल सांगता येत नाही. पण प्रत्येक वेळेस स्त्री ला खूप खंबीर राहण्याची गरज आहे. आज नवरा जरी घर चालवत असला तरी तो कशाप्रकारे कुटुंबाला चालवण्यासाठी झगडतो.हे स्त्री ने पहिले पाहिजे. यात मला एकच सांगायचं आहे कि स्त्री ने चूल आणि मुलं यात व्यस्त न होता, चौकस बुद्धीने घरातील व्यावहारिक ज्ञान घेतले पाहिजे. काही समजत नसेल तर नवऱ्याला विचारावे. कशा प्रकारे नवरा आर्थिक प्रश्न सोडवतो हे ही पहिले पाहिजे आणि नवऱ्याने पण बायकोला विश्वासात घेऊन सगळे व्यवहार, बँकेचं संपूर्ण माहिती दिली पाहिजे. यामुळे भविष्यात कोणत्याही अडचणीवर मात करण्यासाठी याचा नक्कीच वापर होईल..


Rate this content
Log in

Similar marathi story from Romance