महत्वाचं फक्त ...
महत्वाचं फक्त ...
कुणी होतो धावचीत तर कुणी पायचीत, कुणी करतो व्यर्थच पायपीट. कुणी यष्टीचीत, कुणाचा जातो कधी कधी अलगद झेल.
काहींना वेळ गेल्यावर कळ्ते आपण तर सपशेल फेल. जीवन म्हणजे क्रिकेट राजा कुणी जिंकले कुणी हारले
ना चालते इथे फेकाफेकी, ना नेह्मीच चालते ठोकाठोकी. टायमिंग नी लयही गवसावीच लागते, ना इथे परिश्रमाविना भागते
कधी कधी नडतो अती उत्साह तर कधी फाजील आत्मविश्वास. जीवन म्हणजे क्रिकेट राजा कुणी जिंकले कुणी हारले
पीच बघूनंच खेळ करावा, जोडीदाराशी ताळ्मेळही असावा. चौकार- षटकारांबरोबरंच सिंगल, ड्बलही असावेच लागते
धावा करण्याइतकंच धावा वाचवाव्याही लागतात. जीवन म्ह
णजे क्रिकेट राजा कुणी जिंकले कुणी हारले.
शक्ती आणि युक्ती वापरून निकराने झुंजावे लागतं. टायमिंग साधत चौफेर फट्केबाजीही करावीच लागते.
शून्यावर बाद होऊनही कधी-कधी मैन औफ दी मैच होता येतं. जीवन म्हणजे क्रिकेट राजा कुणी जिंकले कुणी हारले.
खेळ म्हटलं की हार जीत आलीच, चुकांची सजाही भोगावीच लागते. क्रिकेट आणि जीवन थोडासा फरक, क्रिकेट असतो केवळ एक खेळ
जीवन म्हणजे बालपणापासून ते म्हातारपणापर्यंतचा अखंड प्रवास. क्रिकेटमध्ये हार जीत असते, जीवनात मात्र कुणी विचारत नाही
हारलात की जिंकलात ते महत्वाचं फक्त कसं जगलात ते कण्हत कण्हत की गाणं म्हणंत..