Namita Dhiraj Tandel

Romance

4.1  

Namita Dhiraj Tandel

Romance

मेहंदी लगा के रखना

मेहंदी लगा के रखना

4 mins
513


दहावी पास झाल्यानंतर प्रत्येकाला कॉलेज ह्या नव्या जगाबद्दल एक वेगळ आकर्षण असतं.. प्रेम ह्या विषया बद्दल बोलायचं झालं तर अल्लड वयात ब्रेकअप जास्त होत असतात.. पण काहींचं प्रेम हे अगदी शेवट पर्यंत बहरलेलं राहतं.. अगदी वृद्धावस्थेपर्यंत.. अगदी किशोरवयापासून एकत्र असणाऱ्या वृद्ध दाम्पत्याची प्रेमकथा..


अकरावीला असताना कॉलेजच्या कार्यक्रमा मध्ये नेहमी पुढे असणाऱ्या दहा मित्र मैत्रिणींचा एक ग्रुप तयार झाला.. ग्रुप मध्ये एकत्र राहुन मिलिंद अन् मनीषा ह्या दोंघांचे प्रेमाचे तार कधी जुळले हे कोणालाच कळले नाही.. अगदी त्यांना सुद्धा नाही. जेव्हा पाच वर्षांनी ग्रॅज्युएशन पुर्ण झालं.. तेव्हा मिलिंदने मनिषासाठी गाण्याच्या दोन ओळी गुणगुणल्या.. "मेहंदी लगा के रखना.. डोली सजाके रखना.." हे ऐकून मनीषा अक्षरशः लाजली.. कारण मिलिंदने त्याच्या घरी मनीषा बद्दल सांगितले होते.. त्याच्या घरातील लोक मनिषाला सुन करून घेण्यास तयार होते.. प्रश्न होता मनिषाच्या घरचा.. तिच्या घरी कुणाचा विरोध नव्हता.. पण तिच्या बाबांनी निरोप दिला.. "मिलिंद स्वतः व्यवस्थित कमवता होत नाही.. तो पर्यंत भेटी गाठी कमी करायच्या.." पण तरी सुद्धा दोघं कुणाच्या न कळत लपुन छपुन भेटायची.


एका मोठ्या कंपनीमध्ये मिलिंदला नोकरी मिळाली.. पाच वर्षात त्याची बढती झाली.. अधिकारी पदावर त्याची नेमणुक झाली होती.. शिवाय मनीषा बँक मध्ये क्लर्क पदावर होती.. दोघंही बऱ्यापैकी सेटल झाले होते.. म्हणून दोन्ही कुटुंबीयांनी लग्नाचा निर्णय घेतला.. कॉलेज वयीन तारुण्यातील प्रेम दहा वर्षांनी लग्नाच्या गठबंधनात बांधले गेले. लग्नाच्या पाच वर्षानंतर त्यांना मुलगा झाला.. मुलाचे शिक्षण पुर्ण झाल्यावर तो आयटी इंजिनिअर होऊन परदेशी नोकरीसाठी गेला..


नोकरीला कायम रामराम ठोकण्याची दोघांची वेळ आली.. कारण दोघांची सेवानिवृत्ती जवळ आली होती.. मनीषाचा वाढदिवस जुन महिन्याच्या पंचवीस तारखेला तर मिलिंदचा जुलैच्या पाच तारखेला.. मनीषा मिलिंद पेक्षा फक्त दहा दिवसांनी मोठी होती.. बँकेत सेवानिृत्तीचा कार्यक्रम तिच्या वाढदिवशीच होणार होता.. कुटुंबीयांसाठी जो सेवानिवृत्तीचा कार्यक्रम ठेवणार होते तो मिलिंदच्या वाढदिवशी दोंघांचा एकत्र होणार होता..


सेवानिवृत्तीच्या बँकेतील कार्यक्रमाच्या आदल्या दिवशी संध्याकाळी मनीषाला पार्लर मध्ये जायला कंटाळा आलेला होता.. कारण पावसाने हजेरी लावली होती.. त्यामुळे सगळीकडे अगदी चिंब झालं होतं.. शिवाय ट्रेनच्या प्रवासा मुळे ती थकली देखील होती.. म्हणून तिने घरी जाताना काळ्या रंगाचे डायचे मेहंदी पॅकेट घेतले.. घरी गेल्यावर ती मिलिंदला लाडात बोलली,"जेव्हा तुझ्या कुटुंबाला मी सुन म्हणून पसंत होते.. हे सांगताना तु माझ्यासाठी गाण्याच्या ओळी गुणगुणला होतास.. मेहंदी लगाके रखना.. डोली सजाके रखना.. पण आता माझ्या पांढऱ्या दिसणाऱ्या केसांना तुझ्या कडून डाय मेहंदी लाऊन घ्यायची आहे.."


"आपका हुकुम सर आखोंपर.." असं म्हणत त्याने बाऊल मध्ये मेहंदी काढली.. व्यवस्थित ब्रशने तिच्या केसांना लावली.. वीस मिनिटांनी मनीषा केस धुऊन बाहेर आली.. तेव्हा तिने डोक्याला रुमाल गुंडाळून लावला होता.. काही वेळानंतर तिने गुंडाळलेला टॉवेल सोडला.. अन् आरश्या समोर उभी राहुन केस कोरडे करू लागली.. ओल्या लांब सडक काळ्या भोर मुलायम केसांत ती खुप खुलून दिसत होती..


"आज खुप सुंदर दिसते आहेस.." तिच्याकडे आराश्या तुन पाहतच त्याने व्यक्त केले..


"तुझ तर हे दररोजच आहे.. त्यात काय नवीन?" ती लाजतच उत्तरली..


"अरे! सुंदरला सुंदर नाहीतर आणखी काय म्हणणार? मी तारीफ केलेली तुला कधी आवडतच नाही.. " मिलिंद नाराज होत स्पष्ट झाला..


"प्रेम व्यक्त करण्यासाठी काही काळ वेळ हवा.. नेहमीच्या व सतत बोलण्याला काही किंमत राहत नाही रे.."ती त्याला चिडवण्याच्या मुड मध्ये बोलत होती..


"अच्छा !असं आहे का?" असं म्हणत त्याने पायात चप्पल घातली अन् घराबाहेर निघुन गेला..


"अरे! कुठे निघालास?लगेच रागवायचं.. ती त्याला थांबवत बोलली..


"तुला काळ वेळ हवा आहे ना.. आताच घेऊन आलो बघ.." लगबगीने मिलिंद निघुन गेला..


काही वेळानंतर तो घरी परतला.. "तु नेहमी म्हणतेस ना.. कॉलेजमध्ये असताना रोझ डेला नेहमी गुलाबांच्या फुलांचा गुच्छ द्यायचा.. आता निदान एखादा चाफा तरी आण कधीतरी.. बघ! आज गुलाब आणि चाफा दोन्ही सोबत आणलेत.. ह्या गुलाबाच्या फुलासारखी नेहमी गुलाबी, प्रसन्न, आनंदी अन् प्रेम करायला लावणारी राहा... आणि ह्या चाफ्याच्या फुला सारखा सुगंध आपल्या प्रेमाला दे... त्याची दरवळ आपल्या निरंतर आयुष्याला पुढेही पसरव.. उद्या हे गुलाब केसांच्या  फ्रेंच रोल मध्ये माळ.. छान दिसतं ते तुला" असं म्हणत मिलिंदने मनिषाच्या केसात वरच्या वर गुलाब माळले.. 


मनीषा लाजतच बोलू लागली..,"इश्श! रोझ डे कॉलेजमध्ये साजरा करून कितीतरी वर्ष पालटली.. शिवाय आता डोक्यावरचे केस देखील पांढरे झाले.. आणखीन काही वर्षांनी आपण म्हातारे दिसू.. पण तुझा हा रोमँटिकपणा काही जायचा नाही.."


"अगं! प्रेम व्यक्त करण्यासाठी कधी काळ वेळ पाहायचा नसतो.. मनात येईल तेव्हा व्यक्त करायचं असतं.. मनाच्या गाठोड्याला कधीच बांधुन ठेवायचं नसतं.. शिवाय प्रेमाला वयाच बंधन मुळी कधी नसतंच.. आणि राहिला प्रश्न पांढऱ्या दिसणाऱ्या केसांचा.. तर सेवानिवृत्ती म्हणजे वृध्द पणाची पहिली पायरीच.. पुढे आपले उतारवय आले तरी तुझ्या केसांना मेहंदी लाऊन देईल.. आणि हो तेव्हा सुद्धा तुझ्यासाठी गाणं गायीन.. मेहंदी लगा के रखना.. डोली सजा के रखाना.." मिलिंद हसत प्रेमाने व्यक्त झाला होता.. तशी मनीषा लाजत त्याच्या मिठीत शिरली...


Rate this content
Log in

Similar marathi story from Romance