Sneha Bawankar

Abstract

3  

Sneha Bawankar

Abstract

माझी सुरुवात नववर्षाचा

माझी सुरुवात नववर्षाचा

4 mins
277


आज १ जानेवारी २०२१.

नव वर्ष उजाळल पण झोप काही लागत नाही हो आज मला..........

नुकतेच आई बाबांचे भांडण झाले, त्यांना समजावता-समजावता मी त्रासून गेली पण ते काही समजायला तयार नाही. चिडून मी रागात बाहेर आली आणि क्षणातच गच्चीवर गेली.........एक कोपरा पकडुन रडत बसली आणि विचार करायला लागली.

काय चूक झाली असेल ग तुझ्याकडून की यांचा स्वभाव एवढा बदलला?

काय चूक झाली असेल ग तुझ्याकडून की यांना सर्व टेंशन स्वतःच घ्यावं वाटते?

काय चूक झाली असेल ग तुझ्याकडून की यांच्या हास्याला कळा लागला?

काय चूक झाली असेल ग तुझ्याकडून की मला समजावणार, मला का नाही समजत?

काय चूक झाली असेल ग तुझ्याकडून.....?

"""""""""""""दीर्घकाळ रडत बसली"""""""''""""

क्षणभरात माझी मला चूक आठवली,

का बरं दिलं होत मी टेंशन माझ्या आई बाबांना?

का बरं माझं जगण्याचं कारण माझ्या आई बाबांसोबत कुणी आणखी सुद्धा होत?

का बरं भटक्या मनाची झाली होती मी?

कुठे न कुठे मीच चुकली खरं तर ?

पण का बरं ?

रडता-रडता विचार करतच होती की तिथेच बाबा आले व म्हणाले, " चल खाली ".

हट्टी स्वभावाची मी....... जरा रागात म्हटले," कशाला तरी येऊ मी खाली, तुमची खरी खोटी ऐकायला".

जरा रागात म्हणतात ते मला, " तू खाली चलते की मी जाऊ.....".

मी नाही म्हटले व ते तिथून रागात निघून गेले.

रडतच बसली होती की हळूच मला गेटाचा आवाज आला, खाली येऊन बघितले आणि तशीच मी गेटा बाहेर धावली.........कारण माहित होत मला की बाबा रागात जरा बाहेर गेले की .............

धावत गेली तर मुळलेल्या वाटेवर ते दिसले........ धावून त्यांच्या जवळ गेली व हात पकडुन घरी खेचत आणले. त्यांना म्हटल, " जर मी असली असती तर मलाही असच समजावलं असत काय झगडून ?" ..... जरा हसऱ्या स्वरात म्हणाले, "तशी गोष्ट नाही बाई , मी किती वेळा सांगितलं तिला पण ती काही ऐकायला/ समजायला तयार नाही तर माणसाला राग येणार नाही का?"..........मी म्हटले," जर ही चूक मी केली असती तर मलाही असाच समजावलं असत काय तुम्ही ?"

त्यांचं मन शांत झालं थोड आणि तोंड पण.....

उगीच मन भांभाळून गेलं आहे त्यांचं अस वाटते आता तर मला पण याच खरं कारण तर मीच आहे ना.....!!

जर मी त्यांचे मन दुखावले नसते तर कधीच त्यांना एवढे विचार आणि टेंशन आल नसत पण माझ्यामुळे झालं की सार्थक हे सुध्दा........


घरी आल्यावरही यांची तुतू मे मे काही थांबत नव्होती तर मी यांना जरा उंच स्वरात ओरडुन म्हटले," माझं जगण्याचं कारण तुम्ही आहात, तुम्ही माझी शक्ती आहात, तुम्ही माझं प्रेम आहात, तुम्ही माझ्या हसण्याचे कारण आहात......., मग का बरं तुम्ही असे झगडता, का बरं नाही समजून घेत की तुम्ही नाही राहाल तर मी जगून काय करू?, माझ्याकडे काहीच कारण नाही जगण्याचं आज तरी, *तुम्ही आहे तर मी आहे; तुम्ही नाही तर मी कशी राहिलं.*

एवढे बोलताच

मनाला जरा शांती भेटली वाटल पण

जगण्याचं कारण नाहीस भासल

जीवन आज माझं काय शोधत बसल

मन माझं स्वत:च्याच प्रश्नांमध्ये फसल

आज माझेच शब्द मला समजायला अवघड झाले पण मी काय लिहीत आहे याचा अर्थ माझ्या मनाला खूप चांगल्यानी माहीत आहे, म्हणून तर फार अवघड होत आहे गळ्यातून एक-एक शब्द घसरायला.

मी कधीच कुणाशी ओरडुन बोलत, कुणासोबत वरचढ बोलत नाही.......मैत्रिणी म्हणतात," तुम्ही माझा घ्यायला खूप आवडते कारण तू काही बोलत नाही", पण यांच्याशी मला वरचढ बोलावं लागत, न आवडणार कृत्य त्यांच्यापुढे करावं लागत, कधी-कधी त्यांना बोलता-बोलता मला स्वतःचीच लाज वाटायला लागते पण मला बोलावं लागते कारण हेच शेवटी माझ्या जगण्याचं कारण आहे.

माफ करा मला, मी जास्तच बोलायला लागली तुमच्या पुढे पण मी करू तरी काय आता ?

हे नव वर्ष कसे जाणार मला माहिती नाही पण त्या आठवी विसरणे माझ्याकडून होणार नाहीच हो...!!

जरा अवघड आहे मनाला शांत करने पण खोटे नाही बोलत मी. तरीही जे शब्द माझे आहेच नाही त्याला माझं म्हणून मला खोटं ठरवल जाते, का बरं ?

मी खोटी नाही हो

प्रेम करावं पण कस करावं, जरा अवघड आहे आज मला स्वतः लाच समजावणे. लोक म्हणतात, मी खरी आहे व मी बरोबर करत आहे पण.......

सत्याचा मार्ग असून मला रडच का बरं येते देवा ?

नाही माहित मला काय होईल ते पण मी जशी आहे तशीच राहील फक्त जे तुम्ही मला वाईट ठरवता न, ते मी नाहीच; हे मला स्वतःला सांगायची गरज नाही, कारण हे माझं सत्य आहे एक न एक दिवस तुम्हालाही मान्य करावाच लागणार.

बराच वेळ झाला लिहिता-लिहिता, आता थोड फार मी झोपण्याचा प्रयत्न करते.....काय माहित की झोपल्या नंतर माझा दिवस पुन्हा उजाडेल व हे दृश्य, स्वप्नच होऊन राहील.

शेवटी म्हणजे

*नव वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा,*

*तुम्हाला हे वर्ष सुख समृद्धी व आपुलकी घेऊन लाभो.*

नव  वर्ष  आज  माझी

झोप      घेऊन     गेल

पण विश्वास फक्त एकच

शेवटी प्रेम घेऊन आल

नव  वर्ष  आज मनात

विचार    घेऊन   आल

पण विश्वास फक्त एकच

शेवटी त्रास घेऊन गेल

नव वर्ष आज जीवनात

प्रश्न      घेऊन     आल

पण विश्वास फक्त एकच

शेवटी उत्तर देऊन गेल

नव वर्ष आज डोळ्यात

अश्रू     घेऊन     आल

पण विश्वास फक्त एकच

शेवटी सुख देऊन गेल



Rate this content
Log in

Similar marathi story from Abstract