Sneha Bawankar

Inspirational

3  

Sneha Bawankar

Inspirational

क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले

क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले

1 min
353


प्रिय आई,

       आई.....! तुला सांगतांनी मला आज खंत वाटते कारण तू आमच्यासाठी एवढा संघर्ष केला, समानतेचा हक्क मिळवून दिला, आमच्या शिक्षणासाठी हक्क बजावला... पण काय अर्थ त्याचा ? कधी १२ वी झाली खूप शिकवलं मुलीला म्हणून शिक्षण सोडावं लागत तर कधी १२ वी नंतरही शिकून लग्नाची वेळ आली म्हणून सोडावं लागत.....यात मुलीचे स्वप्न कुठे पूर्ण होत आहे आई ? मुलीला शेवटी चालावं तर मुलामागेच लागत आहे ना ! मग इथे समानतेचा हक्क कुठे राहिला आई ? मी असे नाही म्हणत की मला त्यांच्या पुढे चालयच आहे,......पण समानतेनी तर जगू शकते ना मी आई..... कधी कधी वाटते की स्त्री चरित्रात जन्मुन काही चूक तर झाली नाही ना..... "मग विचार करते तर मनात उत्तर मिळते नाही , स्त्री जन्म माझा अभिमान आहे आणि समानतेच व्यक्तीव माझा हक्क." पण गोष्टी गोष्टीमध्ये राहिली आता समानता....... अस्तित्वात तर फक्त शब्द राहिले.

      जीवनात आमच्याकरिता एवढा संघर्ष केला, मारेकर्यांशी लढली, कधी लोकांच्या गोष्टी ऐकल्या..... कश्यासाठी आई ! अश्याच या शब्दासाठी की अस्तित्त्वात समानता मिळावी यासाठी....आजपर्यंत असे घडत आले आई पण आजच्यानंतर नाही होऊ देणार मी.....मी पण तुझी लेक आहे , तुझी दिलेली शिकवण आणि संघर्षाला कधी वाया जाऊ देणार नाही. समानता प्रत्येकाचा हक्क आहे, त्याला मिळवणे माझा निर्णय .



Rate this content
Log in

Similar marathi story from Inspirational