Sneha Bawankar

Inspirational Others Children

2  

Sneha Bawankar

Inspirational Others Children

मुली डोक्यावरचं ताण असते काय?

मुली डोक्यावरचं ताण असते काय?

2 mins
156


    अनेक वर्षापासून चालत आहे, आधी फक्त एवढच होत की मुलीचं शिक्षण नव्होत आणि आज शिक्षण आहे पण त्याचाही अर्थ कुठे आहे दुनियेच्या नजरेत...!!

मुलगी शिकत आहे, फक्त एवढच काय? समाज म्हणतो,"आम्ही मुलींना समानतेचा हक्क मिळवून देत आहोत, त्यांना प्रत्येक क्षेत्रात जागा मिळवून देत आहोत." पण खरं सांगा, प्रत्येक मुलीला मिळत आहे काय स्वतंत्र/ समानता?

आज हा प्रश्न मी विचारात आहे, उद्या कुणी दुसरी विचारणार......कारण समानता आजही प्रत्येकाला मिळत नाही आहे.

मुलीच्या लग्नाची वय १८ नंतरची आहे, पण खरं सांगा बरं....खरंच मुलीला घर सांभाळण्याची बुद्धी आहे काय १८ व्या वयात. आजही कित्येक लोकांची मानसिकता हीच आहे की शिक्षण करून काय करणार मुलगी, शेवटी चालायचं तर तिला तिच्या नवऱ्या मागेच आहे ना...! म्हणून १० वी/ १२ वी झाली, भरपूर झाले शिक्षण. बघा की मुलीसाठी एखादे स्थळ, लग्न करून आम्ही मुक्त होतो.

मान्य करते की काही मुलींची इच्छा नसतेच शिक्षणाची, त्या वेळी मुलीशी विचारपूस करून आपण निर्णय घेतो; पण 

*प्रत्येक मुलगी हाच विचार करते काय?*

*त्यांची कुठलीच इच्छा नसते काय?*

*तीच जीवन कुठला खेळ असते काय?*

*मुली डोक्यावरचं ताण असते काय?*

एवढ्यात नसते हो मुलींचे जीवन......

काही मुलींना म्हटल्या जाते; तुला १२ वी नंतर २/३ वर्षांचा वेळ आहे, त्यांनतर आम्ही थोडा पण वेळ देणार नाही,.....

खेळ समजल आहे काय आमच्या जीवाला? की एवढा वेळ आहे तुझ्याकडे मग आमची इच्छा चालणार. मुलगी थोडी फार हुशार असली व शिकण्याची इच्छा असेल तर काय? तिची जॉब करण्याची इच्छा असेल तर काय?

मी तर या परिस्थितीमध्ये हेच म्हणतांनी ऐकलं आहे की तुला चांगल स्थळ मिळत आहे, मग तुला काम करायची गरज काय...! शेवटी तुला तुझ्या नवऱ्या मागेच चालायचं आहे न, शेवटी सांभाळायचं तुला घराचं आहे न...; मग तू चिंता कशाची करते, जेव्हा तुला एवढ सगळ मिळत आहे तर .....पण खरं सांग देवा, आमचा आत्मसन्मान नसतो काय?

आता पर्यंत गोष्ट शिक्षण आणि तिच्या इच्छेबद्दलची होती पण पुढची परिस्थिती बघा.....

जर मुलगी बोलचाल करणारी नसली तर तिच्यात खूप अहंकार आहे, अनोळखी व्यक्तीशी बोलली तर आगाऊ, कुणा मुलाशी जर मुक्तपणे बोलचाल करतांनी दिसली तर त्याच-तिचं काहीतरी प्रेम प्रकरण/ लफड चालू आहे.

प्रत्येक गोष्टीमध्ये कारण हवंय या दुनियेला, चूक तर नेहमी मुलीचीच असते ना.....

या सर्व गोष्टींचा विचार न करता कधीं तिने आपल्या इच्छेला महत्त्व दिले तर खूप वरचढ झाली ही मुलगी, हिच्यामध्ये काही संस्कार नाही; पण *नेहमी चुकीच्या मुलीचं असतात काय?*

तिला अस नाही करायला हवं,

तिला तसं नाही करायला हवं।

मग तुम्हीच सांगा हो,

मुलीने आपल्या इच्छेला मारून टाकायला हवं।।

हो न

*!!.....वाह रे दुनिया.....!!*

हे लिहिता-लिहिता बरेच प्रश्न आले माझ्या मनात, ज्याला शब्दात मांडणे अशक्य आहे. एवढेच म्हणू इच्छिते, एकदा स्वतः ला प्रश्न विचारून बघा.

*मुली डोक्यावरचं ताण असते काय?*


Rate this content
Log in

Similar marathi story from Inspirational