Sneha Bawankar

Romance

3  

Sneha Bawankar

Romance

"काहीतरी सांगायचं राहून गेलं"

"काहीतरी सांगायचं राहून गेलं"

2 mins
259


गेल्या काही दिवसापासून माझ्या मनात ही गोष्ट आहे, जणू ती मला टोचून बोलते की..........

    एवढे वर्ष निघाली सख्या पण तुला सांगायची हिंमतच झाली नाही. 

*काहीतरी सांगायचं राहून गेलं तुला*

    एवढे मी त्याला फोन करून म्हटले व मला भेटायचे आहे म्हणून फोन कापला..........

    मी स्वतःचाच हात मुर्गळत शेतात गेली व विचार करू लागली की सांगू तरी कशी सांगू त्याला.......

    प्रेमात काय काय करावं लागत आणि काय काय नाही हे जणू कळवले मला त्यांनी, पण मी कधी त्याला सांगू शकली नाही की.......

    क्षणात क्षण जात होते, माझ्या कपाळावरच पाणी थेंबा थेंबांनी खाली झरत होत, हळव्या मनाची खूप हिंमत करून एक निर्णय घेतला की आज मी नक्की सांगणार त्याला........एवढे ठरवताच तो माझ्या पुढे आला, मी हात मुर्गळत- मुर्गळत त्याच्याशी बोलायला सुरुवात केली पण हळव्या मनानी काही साथ दिली नाही.

    सतत फक्त एकच गोष्ट म्हणत होता की तुला काही सांगायचं राहिलं, तुला काही सांगायचं राहिलं,.........आणि ते कपाळावरच पाणी अश्रू होऊन डोळ्यातून वाहायला लागलं.

   (तो रागवेल, मला सोडून देईल, माझं प्रेम खोटं ठरेल या भीतीने कधी हिंमत झाली नाही आणि आज केली तर अश्रू सांगण्याची परवानगी देत नव्होते.)

    त्यांनी मला हळूच जवळ घेतले व म्हणाला, ' सखे प्रेम आहे आपल, मग कशाला घाबरतेस; मी आहे तो पर्यंत तुझी प्रत्येक चूक मला मान्य आहे, मला तुझ्यावर प्रेम आहे सखे.....म्हणून तुला जे काही सांगायचं तू सांग, पण अशी रडू नकोस. मी तुझा राग सहन करू शकते पण कधी तुझ्या डोळ्यात अश्रू बघू शकत नाही.' एवढे म्हणताच मी त्याचा हात पकडला व हळूच रडणे थांबवून त्याला अखेरीस म्हंटले....

*काहीतरी सांगायचं राहिलं तुला*

    तुझ्या प्रेमाची मला हिंमत दिली की ही गोष्ट मी तुला सांगावं.....!



Rate this content
Log in

Similar marathi story from Romance