Manda Khandare

Romance

3  

Manda Khandare

Romance

ललित लेखन

ललित लेखन

1 min
341


आवडते मला तुझ्या कवितेमधे रममाण व्हायला. तुझ्या शब्दां मधले अमृत प्राशन करण्यास मी आतूर पामर बेधूंद होऊन जाते. त्याच्या धुंदीत वाहवत जाण्याचा छंदच झाला माझा. मी शोधते तुझ्या कवितेतील भावनामधे स्वत:ला, त्या हळव्या नाजूक प्रणय लहरिंमधे....., गुरफटून टाकते त्यात मी माझ्या असण्या आणि नसण्या च्या सर्व जाणीवा... तू केले असतात त्या शब्दांवर प्रेमाचे संस्कार आणि ते प्रेम केवळ माझ्या साठी आहे याची शास्वती मीच मला देत असते. तुझ्या ही नकळत आणि माझ्या ही जाणीवांना ज़ाग येण्या आधिच...... जमिनिवर अंकुरण्या आधी त्याची मुळ जमिनीत खोलवर रुजतात आणि मग अंकुरतात इवली इवली पान जमिनिवर. मी ही तुझ्यात, तुझ्या शब्दांमध्ये रुजत जाते खोल खोल आणि उमलतात मग माझ्या ही कवितेत तुझ्याच शब्द वेलींवरच्या फुलांचा सुगंध घेऊन काही फुल. जी उमलण्या आधिच माझ्या मनाला सुगंधित करत जातात....तुझ्या शब्दांची किमया तुला ही ठावुक नाही आणि ते माझे दिनमान, माझे असणे-नसणे, माझे जगणे-मरणे ठरवत जातात. तू केवळ शब्दांना, मोत्या सारख्या अक्षरांना, शाई वाटे सांडवत असतो कागदावर. आणि मी त्या मोत्यांची चन्द्रमाळ धारण करुन तुझ्यात एकरूप होऊन जाते, तुझी मीरा होऊन जाते.....तुझी कान्होपात्रा होऊन जाते. तुझ्या....माझ्या अजाणतेपणातच.......


Rate this content
Log in