लेखणी माझी झिजावी..
लेखणी माझी झिजावी..


लेखक आणि वाचक यात एक समान धागा असतो तो म्हणजे त्या दोघांच अतूट नातं असतं. दोघांनाही सामाजिक भान, साहित्याची जाण आणि सच्ची रसिकताही, आणि सर्वात महत्वाचं म्हणजे संवेदनशील मन असतं. लेखक आणि रसिक याच्यात फरक जर कोणता असेल तर तो हा की; घटीत घटनांना लेखक शब्दबद्ध करू शकतो तसे वाचक करू शकत नसला तरी त्याच्याजवळ असलेलं संवेदनशील मन, रसिकता आणि स्वच्छ, निर्मळ मन यामुळे तो लेखकाच्या कलाकॄतीच उत्स्फुर्त दाद देतो. म्हणूनच लेखकही पुढे लिहीत राहतो. म्हणजेच लेखकांपेक्षांही वाचकांची भूमिकाही साहित्य निर्मिती प्रक्रियेत महत्वाची असते असे मला वाट्ते. फेसबुक, व्हाट्स अप सारख्या माध्यमातून मी अनुभवल आहे की, नविन लेखन करणारी मंड्ळी खूप सकस लिहतात पण त्यांची शाबासकीची , कौतुकाची थाप दिल्याने आपलं महत्व कमी होईल की काय असं प्रस्थापीत मंड्ळींना नाहक भीती वाटत असते. काही लेखक, लेखिकांना तर वाटते की, आम्हाला लाईक केलेच पाहीजे तो आमचा अधिकारंच आहे पण तुम्हाला लाईक करण्याची तुमची लायकी नाही. मी पणा त्यांच्यात ठासून भरला आहे. पण सच्चा कलावंत हा अगोदर चांगला माणुस असणं आवश्यक असतं माझे मी पण गळून पडावे. काही लोक तर फेसबुकवर नुसते फिरतात , चेहरे पाहून लाईक करतात . तर काही नुसते उणिवा शोधतात कारण मोठे मन, त्यांना चांगल्याला चांगलं म्हणणं जड जातं. अर्थात काही अपवाद आहेत त्यात मधुकर धाकराव सरांसारखे मोठे मनाचे लेखक नेहमीच कौतुक करतात. लेखंक , कविंना लिह्ण्याची प्रेरणा देतात.
लेखक, कवी आणि वाचक यांच्यात एक समान धागा हा आहे की, समाजात वावरतांना जे काही वाईट आहे त्याचं दुःख, चांगलं, सकारात्मक घडतं त्याचं नेहमीच स्वागत करण्याची भूमिका सारखीच पार पाडत असतात. समाजात काही माणसं असेही असतात की मनाचा खुजेपणा त्यांना गप्प बसू देत नाही. आपल्याला लेखक, कवीसार
खं का लिहता येत नाही? म्हणून ते लोक तुम्ही बसा यमकं जुळवीत, कविता करतात रिकामटेकडे लोक असंच समजून हेटाळ्णी करतात. पण त्यांच्या मनाचा खुजेपणा त्यांना लेखकांपर्यंत त्यांच्या अंतःकरणाचं दर्शन घडू देत नाही. आणि त्यांना या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे. ही कवीची साद ऐकू येत नाही. आणि समाजाचं भलं व्हाव ही भूमिकाही लक्षात येत नाही. परंतु अशा लोकांमुळे खचणारे किंवा क्षणिक प्रसिध्दी, प्रशंसेने लेखक, कवि अति उत्साहीत होत नाही. ते कधी कुणी चांगलं म्हणाव, पुरस्कार मिळावे म्हणूनही लिहीत नाहीत, किंवा कुणावर राग काढावा असंही त्याला वाट्तं नाही. जे खटकंलं ते तो शब्दात मांडतो. जे चांगले त्याचे मनस्वी स्वागत करतो. म्हणूनच तो शतकानुशतके जनसामान्यांच्या मनावर अधिराज्य गाजवतो. लिखाणामुळे, नंतर त्याला पुरस्कार, प्रसिध्दी मिळते ते स्विकारतो ती त्याच्यावर प्रेम करणा-यांची प्रेमाची भेट असते म्हणून ते तो स्विकारतो. हा भाग वेगळा. पण ते सर्व समोर ठेवून तो लिहीत नाही आणि तसं समोर ठेवून लिहणा-याला ते मिळतीलंच असेही नाही. वाचकाला जे काही वाटतं तेच लेखक मांडत असतो म्हणून ते वाचकाला आवडतं, मनाला भावतं.
वाचक लिखाणाला डोक्यावर घेतो. कारण त्याचं जीवन दुःख, न्यून्य, आनंद, अपेक्षा, आशा, निराशा, सर्व भावना ह्या माझ्याच तर आहे असे वाटून तो स्वतःला त्या लिखाणातून शोधत असतो. त्यातूनच त्याला निर्भेळ आनंद मिळतो. समाजाची प्रगती होण्यासाठी संवेदनशील मनाची माणसं घडवणे आवश्यक आहे. अशी माणसं घडवण्याचं काम हे साहित्य करीत असतं. चांगली माणसं घडविण्याचे काम, निकोप समाज मन घडविण्याचे महान कार्य साहित्य व पर्यायाने साहित्यिक निस्वार्थ भूमिकेतून करीत आला आहे. इतिहास साक्ष आहे ज्या समाजाने बुध्दीवंतांची, कलावंताची कदर केली नाही तो समाज लयास गेला आहे.