Anuja Dhariya-Sheth

Classics Inspirational

4.1  

Anuja Dhariya-Sheth

Classics Inspirational

लाल परी...

लाल परी...

4 mins
940


रेवाला लहान असल्या पासून गणपती बाप्पाचे खूप वेड, बागेत जाऊन बाप्पाला आवडतात म्हणून जास्वंद, दूर्वा सर्व काही गोळा करायची... फुले धुवून त्याचा हार करायचा, दूर्वांच्या जूड्या करायची.. गणपती भक्त होती ती.. बाप्पाला आवडतो ना लाल रंग म्हणून मला आवडतो.. तिच्या आजीला तिचे खूप कौतुक वाटायचे... तिची गणपतीवरची अफाट श्रद्धा, पाठ असलेले गणपती स्तोत्र, अथर्वशीर्ष ती रोज खणखणीत आवाजात बोलायची.. तेव्हा तर तिची आजी तिच्या चेहेऱ्यावरून हात फिरवायची कौतुकाने बोटं मोडायची..


रेवा हळूहळू मोठी होत होती.. बुद्धीने खूप हूशार.. जणू काही बुद्धीदाता गणरायाचा वरदहस्तच होता तिच्यावर... सगळ्यात पहिला नंबर.. गोरी गोरी पान त्यात लाल रंग आवडीचा म्हणून तीच छटा असलेले ड्रेस घालायची खूप मोहक दिसायची... आजी तर तिला जास्वंदीच फुलच म्हणायची... आई लाल परी म्हणायची...


आता रेवा १३ वर्षाची झाली होती... आई विचारच करत होती.. शरीरात होणारा बदल तिला कसा सांगावा... अन् ती वेळ लवकरच आली.. दोन-तीन दिवसापासून रेवाचे पाय दुखत होते, पोट दुखत होते.. सकाळी सकाळी ती उठली तेच आईला जोर जोरात हाक मारत... अगं आई हे बघ काय? आई हसुन म्हणाली.. अगं लाडू घाबरू नको.. आता तू मोठी झालीस... माझी लाल परी आता मोठी झाली... आईने आजीला सांगितले.. आजीनं तिला न्हाऊ-माखु घालायला सांगितलं... आई रेवाला खूप छान प्रकारे अंघोळ घालत होती.. पाय दुखतायत का? पोट, कंबर दूखते का? या दिवसात कशी स्वच्छता ठेवायची, कशी काळजी घ्यायची आई सर्व काही अंघोळ घालता घालता सांगत होती... तोपर्यंत आजीनं बाहेर मस्त गोड शिरा केला..


रेवा बाहेर येताच, आजीनं तिला छोटासा सोन्याचा दागिना दिला, गळ्यातील चेन... आजीनं स्वतःच्या हाताने घातली.. शिरा भरवला सगळं कस छान वाटत होते.. सगळेच काळजी घेत होते.. या एका लाल रंगाने रेवाचे आयुष्य बदलून जाणार होते... पहिलीच वेळ त्यामुळे कोडकौतुकात गेली... नंतर मात्र हळु हळू होणाऱ कौतुक कमी झाले...


रेवाला हा लाल रंग मात्र नकोसा वाटू लागला.. कारण आजी खूप सोवळे-ओवळे असायचे, तिला जास्वंदीला पण हात लावू द्यायची नाही आजी... आईने खूप समजावल रेवाला... अगं बाळा, तू जरी मोठी झाली असे मी म्हणाले ना तरी तुझे बालपण अजून जगायचं आहे ग तुला... मातीत, चिखलात खेळताना ते डाग लागले म्हणून घाबरून जातेस का नाही ना? तसाच हा डाग पण नैसर्गीक आहे बाळा...


रेवा म्हणाली हो ना... मग् आजी मला का ओरडते? जास्वंदीचा हार पण करून देत नाही... माझा बाप्पा माझी वाट बघत असेल की? आईला हसायला आले.. तिचे हे वाक्य ऐकून... काय बोलावे विचार करत असताना आजी आली.. आजीनं खूप छान समजावल रेवाला.. ती म्हणाली, अगं हो ग.. खूप वाट बघत होता बाप्पा तुझी... रुसून बसला होता.. रेवाच्या हातचा जास्वंदीचा हार हवा मला, असे म्हणत होता... आजी असे बोलताच रेवा अजून फुगून बसली... नाक लाल झालं अगदी जास्वंदी सारख... अन् म्हणाली, गप्प बसं ग आजी बाप्पा कधी बोलतो का?

आजी प्रेमाने म्हणाली, नाही ग बाळा, पण खरच स्वप्नात आला होता बाप्पा... रेवा म्हणाली, काय खरच....!!!


आजी हसली.. अन् सांगू लागली, हो.. तो म्हणाला, रेवाला किती त्रास होतो ते ४ दिवस त्यामुळे तिला माझे कोणतेच काम सांगायच नाही... तिला आराम करू द्यायचा... थोडे रेवाचे ऐकून घेताना आजीनं हळूच स्वतःची बाजू सुद्धा बाप्पाचा आधार घेत तिला समजावली... जबाबदारीने वागण्याचा सल्ला दिला.. स्त्रीच्या आयुष्यात येणारा हा प्रसंग म्हणजे, पण.. रेवाचे सार लक्ष आता बाहेर तिच्या मित्र-मैत्रीणींमध्ये होते तें आजीच्या लक्षात आल्यावर, आजीने मात्र हसत हसत सांगितलं, आग बाप्पाने मला हे पण सांगितलंय की हे चार दिवस रेवाला घरीच खेळायला ठेवा कुठे बाहेर जाऊ देऊ नका.. कारण धावपळ करताना जर हा लाल रंग बाहेर आला ना... तर तिला खूप त्रास होईल...


रेवाला सारं खरच वाट्त होते, आजीने मस्त आयडिया केली त्यामुळे आई अगदी गालातल्या गालात हसत होती... ते दिवस संपले, रेवाने लवकर उठून जास्वंदीची फुले काढली, मोठा हार केला आणि गणपती बाप्पाची मनोभावे पूजा केली.. लाल रंगाचा ड्रेस आज बऱ्याच दिवसांनी घातला... किती छान दिसतंय माझे जास्वंदीचे फुल असे म्हणत आजीने बोटं मोडली... लाल परी माझी खुश दिसते म्हणत आईनं काळा तीट लावला... मग् रेवा सर्वांना जास्वंदीची फुले वाटायला निघून गेली...


अहो आई, किती छान समजावून सांगितलं तुम्ही तिला, खरच.. मला तर टेन्शनच आले होते... आजी म्हणाली, आग नैसर्गिक गोष्ट आहे ही.. विटाळ वगैरे जुने झाले आता... सगळे समजते ग.. पण संस्कार झिडकारून नाही टाकता येत ग.. पोर हिरमूसली मलाच वाईट वाटले, एक मन म्हणाले करू दे तिला हार... पण आमच्या‌वर झालेले संस्कार ग मन नाही तयार झाले, तुला सांगू वाईट विचार पहिले येतात ना ह्या मनात... मन म्हणाले, पोरीचं काही वाईट झालं तर नको... मग् अशी शक्कल लढवली... खोट बोलले ग मी तिच्या सोबत...


असू दे हो आई... पोरगी हसली ना मनापासून मग् चालतंय की... लाल परी आपली किती दिवसांनी अशी मनमोकळी हसली बघा... नाहीतर पाळी विषयी भलतच काही मनात घेऊन बसली असती बघा... दोघींची नजर घराच्या बागेत गेली... दोन्ही जास्वंदी अगदी मस्त डोलत होत्या...


Rate this content
Log in

Similar marathi story from Classics