Jyoti gosavi

Comedy

4.0  

Jyoti gosavi

Comedy

लाजाळू सुनबाई

लाजाळू सुनबाई

1 min
323


जुन्या काळातले दिवस आठवा मंडळी, त्या काळामध्ये घरात सगळ्यात शेवटी जेवायला घरातल्या सुना बसत असत.  म्हणजे सगळा चांगला चांगला स्वयंपाक करायचा, पण तो आधी इतरांना वाढायचा, त्याच्यानंतर काय उरलंसुरलं असेल तर ते त्या बायकांच्या वाट्याला येत असे.  कधी कधी तर बिचार्‍यांना शिळेपाके देखील खावं लागे. अशासाठी काही चांगल्या नवऱ्यांनी एक युक्ती देखील केली होती .ती म्हणजे नवर्‍याच्या उष्ट्या ताटात बायकोनी जेवायला बसायचं. म्हणजे एक तर जे काही चांगलं चांगलं पक्वान्न असेल ते बायकोसाठी ताटामध्ये राखून ठेवत असत. शिवाय त्यांना दोन ताटे घासण्याऐवजी एकच ताट घासायला लागेल. त्यासाठी हा विभाग रिवाज असावा.  पण एक अशा सुनबाई पाहणीत आल्या, त्यांना कोणीतरी विचारलं "बाई! पोटभर जेवलीस का? त्यावर त्या सुनेने काय उत्तर दिलं बघा. 


अरे रामचंद्रा

 पायलीच्या पंधरा

 न्याहारीला दहा

 दुपारच्या वीस

रात्रीच्या तीस

 ठेवणीला 5 कोर 

तरी मामाजीला लाजले आणि उपाशीच निजले. 


तर अशा ह्या लाजाळू सुनबाई, पायली म्हणजे पाच किलो. म्हणजे पायलीच्या पंधरा .

एकूण पाच किलोमध्ये पंधराच भाकरी केल्या. म्हणजे एका किलो मध्ये तीन भाकरी, अशा पंधरा भाकरी, तिने न्याहारीला दहा खाल्ल्या ,दुपारी वीस खाल्ल्या, संध्याकाळी तीस खाल्ल्या, रात्री अपरात्री लागला तर पाच चतकोर ठेवल्या, तरी बिचारी मामंजी म्हणजे सासर्‍याला लाजून उपाशीपोटी निजले


Rate this content
Log in

Similar marathi story from Comedy