कुठे मी चुकले?
कुठे मी चुकले?
लहानपणी आई - बाबाने
तरूणपणी पतीराजाने
म्हातारपणी लेक-सुनेने
पदोपदी बंधनी जखडले
शिकून- सवरून कमावती झाले
तूच सांग कुठे मी चुकले?
डांबून ठेवले कुणी
कुणी जिवंत जाळले
उमलण्याआधी कुणी कुस्करले
तरीही मी गप्पच बसले
अनावर भावना मनी दाटल्या रे
तूच सांग कुठे मी चुकले ?
p>
पायीची दासी तर
कधी उपभोग्य वस्तु?
कुणी पायद्ळी तुडविले
झाले तेवढे खूप झाले
सोबत चालतांना कधी न अडखळले
तूच सांग कुठे मी चुकले?
घराचं दारचं करतांना नाकीनऊ आले
सांगेन म्हटले कित्येकदा
शब्दच माझे ओठांवर थिजले
त्वचेलाही फुटेल वाटलं शब्दांची धुमारे
तूच सांग कुठे मी चुकले?