STORYMIRROR

Anil Patil

Action

3  

Anil Patil

Action

कन्फर्म रेल्वे टिकट

कन्फर्म रेल्वे टिकट

2 mins
123

रेल्वेने दररोज करोडो लोक प्रवास करीत असतात. रेल्वे प्रवास करताना कन्फर्म तिकीट मिळण्यासाठी 120 दिवस आधी तिकीट काढावी लागते. तुम्हाला एक दिवस अगोदर कधीही कन्फर्म तिकीट मिळणार नाही. तात्काळ तिकीटाने जादा पैसे भरून तातडीचा प्रवास करता येत असतो. अशा परिस्थितीत आरएसी आणि कन्फर्म तिकीट धारकांसाठी काही नियम आहेत. अपर बर्थच्या प्रवाशांसाठी देखील वेगळे नियम आहेत. ते असे की,


रेल्वे प्रवाशांना सणासुदीच्या काळात, विशेषत: ऑक्टोबर आणि नोव्हेंबरमध्ये ट्रेनची तिकिटे आधीच बुक करावी लागतात. मात्र, अनेक प्रवाशांना कन्फर्म तिकिटांसाठी शेवटच्या क्षणापर्यंत प्रतीक्षा करावी लागते. कन्फर्म तिकीट असलेले प्रवासी ट्रेन येईपर्यंत, ज्या व्यक्तीचे तिकीट कन्फर्म झालेले नाही, असे प्रवासी अपर बर्थवरून प्रवास करू शकतात. पण अपरच्या बर्थच्या प्रवाशासाठी काही नियम आहेत.


कन्फर्म तिकीट असलेल्या प्रवाशांना कोणत्याही समस्येचा सामना करावा लागू नये यासाठी भारतीय रेल्वेने अनेक मार्गदर्शक तत्त्वे लागू केली आहेत. ट्रेनच्या थर्ड एसी क्लास आणि स्लीपर सेक्शनमध्ये प्रत्येक केबिनमध्ये आठ आसने असतात. यातील दोन आसने एका बाजूला असून सहा आसने समोरासमोर असतात. अशा परिस्थितीत प्रवाशांसाठी काय नियम आहेत ते पाहू यात.


ट्रेनमध्ये झोपण्याची वेळ रात्री 10 ते सकाळी 6 पर्यंत असते


ट्रेनमधून रात्रीचा प्रवास करण्यासाठी स्वतंत्र नियम आहेत. भारतीय रेल्वेने रात्री 10 ते सकाळी 6 पर्यंत झोपण्याची वेळ निश्चित केली आहे. म्हणजे ट्रेनच्या खालच्या सीटवर बसलेले लोक बर्थवर या वेळेत झोपू शकतात. अर्थात खालच्या आसनांवर कन्फर्म तिकीट मिळालेल्या प्रवाशांच्या संमतीशिवाय कोणीही खालच्या बर्थ वापर करू शकत नाहीत.

सकाळी 6 ते रात्री 10 वाजेपर्यंत वरच्या बर्थवरील व्यक्ती खालच्या सीटवर बसू शकते-

समजा ट्रेनचा प्रवास करताना प्रवाशाला वरच्या बाजूच्या अपर बर्थ कन्फर्म केला आहे आणि खाली बाजूच्या खालच्या सीटवर असलेल्या इतर दोन प्रवाशांना RAC तिकीट मिळाले आहे. लोअर बर्थवर प्रवाशांना बसण्यासाठी पुरेसी जागा नसते. येथेही हाच नियम लागू आहे. सकाळी 6 ते रात्री 10 वाजेपर्यंत वरच्या बर्थचा प्रवासी खालच्या सीटवर बसू शकतो, मात्र केवळ दोन RAC तिकीटधारकांना बसण्याची परवानगी आहे.🙏🌷


Rate this content
Log in

Similar marathi story from Action