जय हनुमान... जय विश्वश्वर...
जय हनुमान... जय विश्वश्वर...
हनुमंताच्या गळ्यातील जानवे हे ब्राह्मतेजाचे प्रतीक असून, हनुमंत हा महादेवाचा अवतार असल्याने त्यात लय करण्याचे सामर्थ्य आहे. रामभक्ती करतांना त्याच्यात विष्णुतत्त्व आल्यामुळे त्यात स्थितीचेही सामर्थ्यही आले. हनुमानामध्ये ब्राह्मतेज व क्षात्रतेज दोन्ही असल्याने युद्धावेळी आवश्यकतेनुसार तो त्यांचा वापर करत असे, असे सांगितले जाते.*
*महाभारत युद्धात श्रीकृष्णाने हनुमंताला अर्जुनाच्या रथावर स्थान दिले. तेव्हा हनुमंताने रथ व अर्जुन यांच्यावर येणारी अस्त्रे व शस्त्रे हवेतच नष्ट केली होती.
हनुमान शक्ती, सामर्थ्यासाठी जेवढा प्रसिद्ध आहे, तेवढाच बुद्धीसाठीही तो प्रसिद्ध आहे. लहानपणी हनुमानाने गुरुकुलात जाऊन अनेक विद्या आत्मसाद केल्या. वानरांची युद्ध करण्याची विशिष्ट पद्धतीही त्याने शिकून घेतली. वेद, उपनिषदे त्याने लहानपणीच तोंडपाठ केली होती.
हनुमानाला अनेक भाषा येत होत्या. म्हणूनच राम-लक्ष्मणाची खबर काढण्यासाठी सुग्रीवाने हनुमानाला पाठवले होते. तसेच सीतेचा शोध घेण्यासाठी हनुमाला पाठवण्यात आले होते. तसेच समुद्र लांघणे, समुद्र सेतू उभारणे, राक्षसांचा नाश, लक्ष्मणासाठी संजीवनी आणणे, यातून हनुमानाच्या शक्तीची प्रचिती येते. जन्मत:च मारुतीने सूर्याला गिळण्यासाठी उड्डाण केले अशी जी कथा आहे, त्यातून वायूपुत्र मारुति तेजतत्त्वाला जिंकणारा होता, हे लक्षात येते.*
*हनुमान चिरंजीवी असल्याने तो आजदेखील अस्तित्वात असल्याची मान्यता भाविकांमधे आहे. हनुमानाला लावण्यात येणारा शेंदुर अत्यंत पवित्र मानला जातो. शरीर सौष्ठव कमविण्याची आवड असणाऱ्यांनी हनुमानाची आराधना करावी, असे मानले जाते. हनुमान स्तोत्र व हनुमान चालिसा म्हणणाऱ्यांना आत्मिक समाधानाची प्राप्ती होते, असे म्हटले जाते.
साडे साती सुरू असलेल्या व्यक्तींनी दररोज किंवा किमान प्रत्येक मंगळवारी व शनिवारी मारूतीचे दर्शन घ्यावे, असे सांगितले जाते. हनुमानाला शक्ती, स्फुर्ती आणि ऊर्जेचे प्रतिक मानण्यात आले आहे.
