STORYMIRROR

Anil Patil

Others

3  

Anil Patil

Others

मीच कृष्ण, मीच कंस.

मीच कृष्ण, मीच कंस.

1 min
208

अप्रतिम चित्रे काढणारा एक चित्रकार होता. लोक त्याच्या चित्रकलेचे कौतुक करायचे.


एके दिवशी कृष्ण मंदिरातील भक्तांनी त्यांच्याकडे कृष्ण आणि कंसाचे चित्र बनवण्याची इच्छा व्यक्त केली.


चित्रकाराने मान्य केले. शेवटी हे देवाचे काम आहे, पण त्याने काही अटी घातल्या.

तो म्हणाला, कृष्णाच्या चित्रासाठी एका खोडकर मुलाला आणा आणि कंसासाठी एक क्रूर व्यक्ती आणा.

मला पात्र व्यक्ती हव्या आहेत, त्या सापडल्या तर मी चित्र सहज काढेन.


एका भक्ताने एक सुंदर बालक आणले. चित्रकाराने त्या मुलाला समोर बसवले. बाल कृष्णाचे सुंदर चित्र काढले.


आता कंसाची पाळी होती. पण क्रूर भावना असलेली व्यक्ती शोधणे थोडे कठीण होते.


जी व्यक्ती कृष्ण मंदिरातील लोकांना आवडली, ती चित्रकाराला आवडली नाही. त्याला हवे ते भाव त्याच्या चेहऱ्यावर नव्हते...!


वेळ निघून गेली.


अखेरीस, अनेक वर्षांनंतर, ते त्या चित्रकाराला तुरुंगात घेऊन गेले, जिथे जन्मठेपेची शिक्षा भोगणारे गुन्हेगार होते.

त्यातील एक गुन्हेगार चित्रकाराला आवडला. त्याला समोर बसवून त्याने कंसाचे चित्र काढले.


कृष्ण आणि कंसाचे ते चित्र आज कित्येक वर्षांनंतर पूर्ण झाले.

...ते चित्र पाहून कृष्ण मंदिरातील भाविक मंत्रमुग्ध झाले.

त्या गुन्हेगारानेही ते चित्र पाहण्याची इच्छा व्यक्त केली.

जेव्हा त्या गुन्हेगाराने ते चित्र पाहिले तेव्हा तो ढसढसा रडू लागला.

ते पाहून सर्वांनाच आश्चर्य वाटले.

चित्रकाराने त्याला याचे कारण विचारले तेव्हा तो गुन्हेगार म्हणाला,

"कदाचित तूम्ही मला ओळखले नाही. मी तोच मुलगा आहे जो तुम्हाला बऱ्याच वर्षापूर्वी बालकृष्णाच्या चित्रासाठी आवडला होता.

आज मी माझ्या कुकर्मामुळे कंस झालो, या चित्रात मी कृष्ण आहे, मीच कंस आहे.

*मित्रांनो, आपली कृतीच आपल्याला चांगली आणि वाईट व्यक्ती बनवते..!!*🙏🌷


Rate this content
Log in