STORYMIRROR

Anil Patil

Children Stories

3  

Anil Patil

Children Stories

जन्म...

जन्म...

1 min
182

जिथे जन्माला कोणत्या घरात यावं आणि जगाचा निरोप केव्हा घ्यावा हे सुद्धा आपल्या हातात नाही...!

आयुष्यात माणसं कशी भेटतील, मार्ग दाखविणारे की मार्ग अडविणारे हे सुद्धा आपल्या हातात नाही...!

ज्या पैशाच्या जोरावर आपण अहंकार करतो तो पैसा कायमच असेल असे नाही, ज्या चेहऱ्याची सुंदरता आपण आयुष्यभर मिळवितो कालांतराने त्याला सुद्धा सुरकुत्या पडतात...!

ज्या शरिरावर आपण गर्व करतो त्याला सुध्दा वयाच्या मर्यादा आहेत.

ज्या मुलांचा आपल्याला अभिमान असतो ती सुद्धा उतार वयात आपली काळजी करतीलच असे नाही...!

ज्यांना आपण आयुष्याभर आपले समजतो ते सुद्धा पडत्या काळात सोबत नसतात...!

वेळ चांगली असली तेव्हा मातू नका आणि वेळ खराब असली तेव्हा रडू नका...!

आयुष्यात बऱ्याच गोष्टी आपल्या हातात नसतात तरि सुध्दा आपण Attitude दाखवितो, चांगले कर्म तेवढे आपल्या हातात आहे आणि चांगल्या कर्माचे फळ चांगलेच मिळते. म्हणून आहे ती माणसे गमावू नका, एकमेकांशी प्रेमाने रहाणे, वागणे, यातच खरा आनंद आहे...!

 हेच जीवनाचे अंतिम सत्य आहे...!


Rate this content
Log in